मी सुमित राघवनला दत्तकच घेणार होते, असं का म्हणाल्या चिन्मयी सुमित? वाचा भन्नाट किस्सा…

मराठी मनोरंजन विश्वात अभिनेता सुमित राघवन (Sumeet Raghvan) आणि त्यांची पत्नी चिन्मयी सुमित (Chinmayee Sumeet) ही जोडी ‘एव्हरग्रीन कपल’ म्हणून ओळखली जाते. वयाच्या 50व्या वर्षीही आपल्या सुमित तरुण वर्गाच्या गळ्यातील ताईत आहेत.

मी सुमित राघवनला दत्तकच घेणार होते, असं का म्हणाल्या चिन्मयी सुमित? वाचा भन्नाट किस्सा...
Chinmayee And Sumeet

मुंबई : मराठी मनोरंजन विश्वात अभिनेता सुमित राघवन (Sumeet Raghvan) आणि त्यांची पत्नी चिन्मयी सुमित (Chinmayee Sumeet) ही जोडी ‘एव्हरग्रीन कपल’ म्हणून ओळखली जाते. वयाच्या 50व्या वर्षीही आपल्या सुमित तरुण वर्गाच्या गळ्यातील ताईत आहेत. अनेकदा त्यांची पत्नी चिन्मयी सुमित यांना या संदर्भात प्रश्न विचारले जातात. तुम्हा दोघांच्या वयात खूप मोठा फरक आहे का? हा प्रश्न तर त्यांना बऱ्याचदा विचारला जातो.

अभिनेत्री चिन्मयी सुमित यांना असे प्रश्न इतक्यावेळा विचारले जातात की, आता त्यांना याची सवय झाली आहे आणि त्या त्यावर गमतीशीरपणे उत्तर देखील देतात. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या एका मुलाखतीत त्यांना असाच एक प्रश्न विचारला गेला, ज्यावर त्यांनी अतिशय गमतीशीर उत्तर दिले. चला तर जाणून घेऊया भन्नाट किस्सा…

मी सुमितला दत्तक घेणार होते!

एका रेडीओ शोमध्ये सहभागी झालेल्या चिन्मयी सुमित यांना एका श्रोत्याने असा प्रश्न विचारला की, ‘ताई तुमच्यामध्ये आणि सुमितमध्ये वयाचं किती अंतर आहे? तुम्ही मोठ्या असणार नक्की! हो ना?’ यावर उत्तर देताना चिन्मयी म्हणाल्या, ‘हो अगदी बरोबर, खरंतर मी सुमितला पाळणाघरामध्ये दत्तक म्हणून घ्यायला गेले होते. पण तिथे त्याने मला पाहिल्यावर तो माझ्या प्रेमात पडला आणि म्हणाला की, मला तुला आई म्हणून हाक नाही मारायची, तू माझ्याशी लग्नच कर.’ त्यांच्या या उत्तरावर चांगलाच हशा पिकला होता.

सुमित ऐवजी तुमचंच वय वाढतं का?

यानंतर एकाने आणखी प्रश्न विचारला की, ‘चिन्मयीजी सुमित किती तरुण दिसतो… तुमचं वय दोघांचं मिळून वाढत आहे का?’ यावर हसत उत्तर देताना त्या म्हणाल्या, ‘हो हे खरं आहे. इतके दिवस मी हे गुपित लपवून ठेवलं होतं पान आता इथे सांगतेय की, ययाती नावाचा एका राजा होता, त्याने कायम तरुण राहण्यासाठी आपल्या मुलाचं आयुष्य-तारुण्य मागून घेतलं होतं. यामुळे त्याचा मुलगा म्हातारा झाला आणि ययाती खूप तरुण झाला. असंच सुमित नेहमी माझ्याबरोबर करतो असं.. तो माझ्याकडून सतत दोन-दोन वर्ष माझी घेतोय आणि म्हणून तो तरुण दिसतो आणि मी म्हातारी दिसतेय!’

चिन्मयी-सुमित यांची लव्हस्टोरी

मुळच्या औरंगाबादच्या चिन्मयी सुर्वे नाटकात काम करण्यासाठी मुंबईला आल्या. एका नाटकादरम्यान त्यांची सुमित यांच्याशी ओळख झाली, त्या नाटकाचं नाव होतं ‘ज्वालामुखी’. या भेटीचं रुपांतर हळूहळू मैत्रीत झालं. सुमित राघवन यांचा गोड आवाज चिन्मयी यांच्या मनाला भावला. हळूहळू मैत्री वाढत गेली. मैत्रीच रुपांतर प्रेमात झालं. सुमित राघवन यांनी गाणं गाऊन चिन्मयी यांना प्रपोज केलं आणि हे नातं घरच्यांच्या संमतीने लग्नात बदललं.

(Why did Chinmayee Sumeet say that I was going to adopt Sumit Raghvan read the story)

हेही वाचा :

‘सैराट’ची आर्ची दिसणार एका नव्या भूमिकेत, ‘आशा’ बनून लढणार स्त्रियांच्या संरक्षणाचा लढा!

अनिरुद्ध देशमुखशी घटस्फोटानंतर ‘आई’ बदलणार? नव्या फोटोंमुळे चर्चांना उधाण!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI