200 Halla Ho | ‘सैराट’ची आर्ची दिसणार एका नव्या भूमिकेत, ‘आशा’ बनून लढणार स्त्रियांच्या संरक्षणाचा लढा!

ZEE5ने गुरुवारी आपला आगामी चित्रपट ‘200 - हल्ला हो’चा ट्रेलर रिलीज केला. 200 Halla Ho हा एक सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे, ज्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, अभिनेता बरुण सोबती आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

200 Halla Ho | ‘सैराट’ची आर्ची दिसणार एका नव्या भूमिकेत, ‘आशा’ बनून लढणार स्त्रियांच्या संरक्षणाचा लढा!
रिंकू राजगुरू

मुंबई : ZEE5ने गुरुवारी आपला आगामी चित्रपट ‘200 – हल्ला हो’चा ट्रेलर रिलीज केला. 200 Halla Ho हा एक सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे, ज्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, अभिनेता बरुण सोबती आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सार्थक दासगुप्ता यांनी केले आहे.

व्हर्च्युअल कार्यक्रमात या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. ‘200 हल्ला हो’ हा एक अतिशय गंभीर समस्येवर भाष्य करणारा चित्रपट आहे. ही घटना कित्येक वर्षांपूर्वी घडली होती, जेव्हा 200 दलित महिलांनी एकत्रितपणे कायदा आणि न्याय हातात घेतला होता. या चित्रपटात ‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

चित्रपटाविषयी सांगताना रिंकू म्हणते…

‘200 हल्ला बोल’ हा चित्रपट दलित महिलांविषयी आहे ज्यांना सामाजिकदृष्ट्या उपेक्षित, छेडछाड, छळ आणि अपमानित असूनही, त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या जबाबदार व्यक्तीला शिक्षा देण्यासाठी कायदा आपल्या हातात घ्यावा लागला. काय बरोबर किंवा काय अयोग्य, ही चर्चा देखील या चित्रपटात दिसून येईल. समाजात बऱ्याचदा स्त्रियांची मतं डावलली जातात. त्यातही दलित स्त्रियांचा मत व्यक्त करण्याचा अधिकार काढून घेतलेला असतो. हा चित्रपट अशाच एका कथेवर आधारित असणार आहे.

कशी आहे रिंकूची भूमिका?

या चित्रपटातील भूमिकेविषयी सांगताना रिंकू म्हणाली की, ‘ही एक अशी मुलगी आहे, जी स्वतः एका दलित कुटुंबातून पुढे आली आहे. तिने वर्षानुवर्षे स्त्रियांवर होणारा अत्याचार पाहिला आहे. इतका अत्याचार सहन करूनही या स्त्रीया गप्प का बसतात, असा प्रश्न तिला नेहमीच पडत असतो. आता ही मुलगी स्वतःच्या पायांवर उभी राहिली आहे. इतकंच नाही तर या स्त्रियांच्या आणि आपल्या हक्कासाठी जोरदार लढा देणार आहे, अशी लढाऊ आशा साकारताना मला देखील खूप छान वाटलं.’

दिग्गज कलाकारांची फौज

या चित्रपटात अमोल पालेकर, उपेंद्र लिमये, इंद्रनील सेनगुप्ता सारखी तगडी कलाकारांची फौज आहे. या सगळ्यांसोबत काम करताना खूप मजा आली आणि खूप काही शिकायला मिळाल्याचं रिंकू राजगुरू सांगते. याचा बरोबर या चित्रपटात काम करताना रिंकूने आपल्या भाषेवर आणि आशाचा स्वभाव आपल्यात उतरावा म्हणून खूप मेहनत केली आहे. आधीच सगळ्या प्रोजेक्टपेक्षा हा चित्रपट वेगळा असल्याचे देखील ती आवर्जून सांगते. येत्या 20 ऑगस्टला ‘200 हल्ला हो’ हा चित्रपट ‘झी 5’वर प्रदर्शित होणार आहे.

(200 Halla Ho Zee 5 New Movie featuring Sairat fame Actress Rinku Rajguru)

हेही वाचा :

रवींद्रनाथ टागोरांच्या रचनांवर बनलेले ‘हे’ प्रसिद्ध चित्रपट, पाहताना प्रेक्षक आजही होतात भावूक!

पत्नीच्या आरोपांवर हनी सिंहचं जाहीर उत्तर, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट, वाचा काय म्हणाला गायक…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI