AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरन्याधीश सूर्यकांत यांचं पुन्हा तरुणांवर मोठं वक्तव्य; म्हणाले, ‘जबाबदारी…’

सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी पुन्हा तरुणांवर वक्तव्य केलं आहे. यंदा मात्र सरन्यायाधीशांनी तरुणांना मोलाचा सल्ला दिला आहे.

सरन्याधीश सूर्यकांत यांचं पुन्हा तरुणांवर मोठं वक्तव्य; म्हणाले, 'जबाबदारी...'
cji suryakant Image Credit source: tv9
| Updated on: Aug 16, 2026 | 1:19 PM
Share

भारताचे मुख्यन्यायाधीश सूर्यकांत यांनी शनिवारी पुन्हा एका कार्यक्रमात तरुणांवर मोठं विधान केलं आहे. एका कार्यक्रमात संबोधित करताना म्हटलं की, देशाने आठ दशकात मोठ्या आव्हानाचा सामना केला आहे. त्यानंतरही आणखी बऱ्याच गोष्टी करायच्या बाकी आहेत. देश आणि न्यायव्यवस्थेची जबाबदारी सांभाळ्यास कायदा पदवीधर आणि वकिलांनी तयार राहा, असे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी म्हटलं.

सरन्यायाधीश यांनी तरुण वकिलांना मोलाचा संदेश सांगताना म्हटलं की, ‘स्वातंत्र्य लढ्याच्या काळापासून वकील संघटनेने जबाबदारी हाताळली आहे. आता लवकरच नव्या पिढीच्या खांद्यावर येईल. तुमच्या पिढीवर न्यायसंस्थेचे जतन करणे आणि पुढे नेत्याची जबाबदारी आहे. वकील संघटना आणि घटनापीठ तरुण वकिलांच्या विकासासाठी नेहमी तत्पर आहे. त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन आणि संधी उपलब्ध करून देईल’.

सरन्यायाधीश पुढे म्हणाले की, ‘वकिलीचा व्यवसाय अधिक स्पर्धात्मक झालाय. मला तरुण पिढीच्या बुद्धिमता आणि क्षमतेवर विश्वास आहे. नवीन पिढी ही तंत्रज्ञानासोबत वाढली आहे. त्याचा कोर्टातही उत्कृषरित्या वापर करत आहे’. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीवर भाष्य करताना म्हटले की, ‘स्वातंत्र्याचा लढा हा प्रामुख्याने सशस्त्र उठाव नव्हता. देशात महात्मा गांधी, डॉ. बी. आर. आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, मोतीलाल नेहरू, बाळ गंगाधर टिळक, लाला लजपत राय यांच्यासारखे महान नेते वकील होते. कायदा हा स्वातंत्र्य लढ्यावेळी अविभाज्य भाग होता. कायद्याचा उद्देश केवळ नियम बनवणे किंवा शासन करणे नव्हे. तर न्याय देणे आणि स्वातंत्र्याचे रक्षण करणे आणि मानवी प्रतिष्ठेचे रक्षण करणे हा आहे, असे त्यांनी सांगितले.

सरन्यायाधीशांनी पुन्हा सांगितले की, न्यायालये त्याच तत्वावर काम करत आहेत. न्यायालय असे व्यासपीठ आहे, तिथे समाजातील लोक हे घटनात्मक हक्कांचे संरक्षण करणे, कायद्यासमोर समान वागणुक मिळावी याची मागणी करण्यासाठी येत असतात’. सरन्यायाधीशांनी पुन्हा तरुणांवर वक्तव्य केल्याने चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, यावेळी सरन्यायाधीशांनी तरुणांना मोलाचा सल्ला दिल्याचे दिसून आलं आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...