माझं कुटुंब म्हणत जमवला संपूर्ण गोतावळा, ‘राणा दा’च्या नव्या मालिकेचा धमाल प्रोमो पाहिलात का?

झी मराठी वाहिनीवर सुरु होत असलेली नवी मालिका ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं?’ (Tuzhya Majhya Sansarala Aani Kay Hava) यात हार्दिक मुख्य भूमिका साकारत आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’नंतर आता हार्दिक जोशी आता ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ असं म्हणणार आहे.

माझं कुटुंब म्हणत जमवला संपूर्ण गोतावळा, ‘राणा दा’च्या नव्या मालिकेचा धमाल प्रोमो पाहिलात का?
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं?

मुंबई : छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेली ‘तुझ्यात जीव रंगला’ (Tujhyat Jeev Rangla) सद्य घडीला ही मालिका ऑफ एअर गेली असली तरी, मालिकेतील कलाकारांची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. या मालिकेतील ‘राणा दा’, ‘पाठक बाई’, ‘नंदिता वहिनी’, ‘गोदाक्का’, ‘बरकत’ ही पात्र खूप लोकप्रिय झाली होती. त्यातही ‘राणा दा-अंजली बाई’ ही जोडी छोट्या पडद्यावर विशेष गाजली. मालिका ऑफ एअर गेल्यानंतर सगळेच प्रेक्षक आपल्या लाडक्या कलाकारांना मिस करत आहेत. मात्र, आता ‘राणा दा’ एका नव्या रुपात लवकरच चात्यांचा भेटीला येणार आहे.

‘राणा दा’ साकारणारा अभिनेता हार्दिक जोशी (Hardeek Joshi) लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी मराठी वाहिनीवर सुरु होत असलेली नवी मालिका ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं?’ (Tuzhya Majhya Sansarala Aani Kay Hava) यात हार्दिक मुख्य भूमिका साकारत आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’नंतर आता हार्दिक जोशी आता ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ असं म्हणणार आहे. या मालिकेत नवोदित अभिनेत्री अमृता पवार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या नव्या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आहे.

पाहा प्रोमो

या प्रोमोत मुलगा आणि मुलीच्या लग्नाची बोलणी सुरु असल्याचे दिसतेय. मुलगी आपल्या होणाऱ्या नवऱ्याची आणि त्याच्या कुटुंबाची वाट पाहत असते. इतक्यात नवरा मुलगा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी तिथे येतो. यानंतर त्रिकोणी कुटुंब असलेल्या मुलीचे आई आणि वडील देखील तिथे येतात. मात्र, यानंतर मुलगी मुलाला विचारते तुझ्या घरून कोण येतंय? यावर मुलगा म्हणतो, माझे घरचे…आणि इतक्यात मागून काही गाड्या येतात आणि त्यातून त्याचे जवळपास 20 ते 25 जणांचे कुटुंब येते. हे पाहून मुलीला काहीसा धक्काच बसलेला आहे. तीन जणांच्या कुटुंबात वाढलेली ही नायिका आता नव्या आणि मोठ्या कुटुंबातील जबाबदाऱ्या कशा निभावणार, हे या मालिकेत दाखवले जाणार आहे.

हार्दिक जोशीचं कमबॅक

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेला आणि त्यात हार्दिक जोशी सकारात असलेल्या ‘राणा दा’ला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. ही मालिका बंद झाल्यानंतरही चाहते त्यातील कलाकारांच्या कमबॅकची आतुरतेने वाट पाहत होते. त्यामुळेच हार्दिक जोशीला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहून प्रेक्षक प्रचंड आनंदित झाले आहेत.

(Hardeek Joshi’s New Marathi Serial Tujhya Majhya Sansarala Aani Kay Hava first Promo)

हेही वाचा :

‘बिग बॉस ओटीटी’च्या घरातील हंगाम्याला भोजपुरी तडका लागणार, ‘या’ अभिनेत्रीची ग्रँड एंट्री होणार!

’10 वर्षांनी टीव्हीवर पुनरागमन करतेय…’, नव्या मालिकेच्या निमित्ताने प्रार्थना बेहेरेने व्यक्त केल्या मनातील भावना!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI