खतरो के खिलाडीनंतर या चित्रपटात दिसणार शिव ठाकरे, सलमान खान याच्यासोबत काम करण्याची सुवर्णसंधी?

टाॅप थ्रीमधून प्रियंका चाैधरी हिला बाहेर पडलावे लागले होते. त्यानंतर अनेकांना वाटले होते की, शिव ठाकरे हा बिग बाॅस 16 चा विजेता होईल. मात्र, तसे झाले नाही आणि एमसी स्टॅन हा बिग बाॅस 16 चा विजेता झाला.

खतरो के खिलाडीनंतर या चित्रपटात दिसणार शिव ठाकरे, सलमान खान याच्यासोबत काम करण्याची सुवर्णसंधी?
| Updated on: Feb 21, 2023 | 8:55 PM

मुंबई : बिग बॉस 16 चा फिनाले हा 12 फेब्रुवारी रोजी पार पडलाय. एमसी स्टॅन हा बिग बाॅस 16 (Bigg Boss 16) चा विजेता झाला. सोशल मीडियावर सतत चर्चा रंगत होती की, शिव ठाकरे किंवा प्रियंका चाैधरी यांच्यापैकी एकजण बिग बाॅस 16 चा विजेता होईल. मात्र, सर्वांना मोठा धक्का देत एमसी स्टॅन हा बिग बाॅस 16 चा विजेता झाला. एमसी स्टॅन (MC Stan) याची फॅन फाॅलोइंग जबरदस्त आहे. विशेष म्हणजे बिग बाॅसच्या घराबाहेर विजेता म्हणून आल्यावर एमसी स्टॅन याच्या चाहत्यांमध्ये कमालीची वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे. एमसी स्टॅन हा बिग बाॅस 16 मध्ये फार गेम खेळताना दिसला नाही. इतकेच नाही तर त्याने अनेक टास्क बिग बाॅसच्या घरात करणे टाळले. एमसी स्टॅन याचा गेम शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि प्रियंका चाैधरी यांच्यापेक्षा कमी होता. यामुळे एमसी स्टॅन हा बिग बाॅस 16 चा विजेता होईल, याची साधी कल्पनाही कोणी केली नव्हती. टाॅप थ्रीमधून प्रियंका चाैधरी हिला बाहेर पडलावे लागले होते. त्यानंतर अनेकांना वाटले होते की, शिव ठाकरे हा बिग बाॅस 16 चा विजेता होईल. मात्र, तसे झाले नाही आणि एमसी स्टॅन हा बिग बाॅस 16 चा विजेता झाला.

शिव ठाकरे हा जरी बिग बाॅस 16 चा विजेता झाला नसला तरीही चाहत्यांचे मन जिंकण्यात शिव ठाकरे यशस्वी झाला. बिग बाॅसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर शिव ठाकरे याचीही फॅन फाॅलोइंग वाढली आहे. मराठी बिग बाॅसचा विजेता शिव ठाकरे हा आहे.

बिग बाॅस 16 चा विजेता जरी शिव ठाकरे हा झाला नसला तरीही त्याने नशीब उजळले आहे. विशेष म्हणजे खतरो के खिलाडी या शोनंतर त्याला चक्क सलमान खान याच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली अशी एक चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे याबद्दल बोलणे देखील सुरू आहे.

रिपोर्टनुसार सलमान खान याच्या चित्रपटामध्ये शिव ठाकरे याला काम मिळाले आहे. रिपोर्टमध्ये असाही दावा करण्यात आला की, शिव ठाकरे हा लवकरच चित्रपटाच्या निर्मात्यांसोबत चर्चा करणार आहे. मात्र, नेमक्या कोणत्या चित्रपटात शिव दिसणार आहे, याची माहिती कळू शकली नाहीये.

या चित्रपटात सलमान खान हा मुख्य भूमिकेत असल्याचे कळत आहे. खतरो के खिलाडी या शोमध्येही शिव ठाकरे दिसण्याची शक्यता आहे. शिव ठाकरे आणि निम्रत कौर अहलूवालिया यांचा एक म्युझिक व्हिडीओही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिव ठाकरे आणि निम्रत कौर आहलूवालिया यांची मैत्री चाहत्यांना प्रचंड आवडली आहे.