Good News | ‘कॉमेडी क्वीन’ भारती सिंह आई होणार! व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज!

Good News | ‘कॉमेडी क्वीन’ भारती सिंह आई होणार! व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज!
Bharti-Harsh

‘कॉमेडी क्वीन’ भारती सिंह (Bharti Singh) आणि हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachiyaa) हे टीव्हीवरील लोकप्रिय आणि क्युट जोडपे आहेत. दोघेही पालक बनणार असल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. मात्र, प्रत्येक वेळी दोघेही हे वृत्त चुकीचे म्हटले. पण, आता खुद्द भारतीनेच चाहत्यांसाठी एक गोड बातमी शेअर केली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Dec 11, 2021 | 11:55 AM

मुंबई : ‘कॉमेडी क्वीन’ भारती सिंह (Bharti Singh) आणि हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachiyaa) हे टीव्हीवरील लोकप्रिय आणि क्युट जोडपे आहेत. दोघेही पालक बनणार असल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. मात्र, प्रत्येक वेळी दोघेही हे वृत्त चुकीचे म्हटले. पण, आता खुद्द भारतीनेच चाहत्यांसाठी एक गोड बातमी शेअर केली आहे. होय, भारती आता आई होणार आहे. त्यांनी ही आनंदाची बातमी त्यांच्या ‘लाईफ ऑफ लिंबाचिया’ या यूट्यूब चॅनलवर शेअर केली आहे.

व्हिडीओमध्ये भारती टॉयलेटमध्ये दिसत आहे आणि तिच्या हातात प्रेग्नेंसी किट आहे, जे पाहून ती खूप खुश होते आणि नंतर ती भावूक होते. ती म्हणते, मला 6 महिन्यांपासून मला हा क्षण टिपायचा होता आणि आता हा क्षण आला आहे. मी आई होणार आहे!

हर्षच्या आनंदालाही उधाण!

यानंतर भारती खोलीत झोपलेल्या हर्षला ही गोड बातमी देण्यासाठी जाते. यानंतर, ती स्पीकरवर मुलाच्या रडण्याचा आवाज वाजवते. तिचा आवाज ऐकून हर्ष उठतो. यानंतर भारती त्याला आनंदाची बातमी देते. सुरुवातीला हर्षचा विश्वास बसला नाही, पण नंतर किट पाहिल्यावर त्याची खात्री पटली. तो भारतीला सुद्धा विचारतो की, ती मस्करी करत आहे का? पण भारती नकार देते.

यानंतर हर्ष म्हणतो की, हो मित्रांनो आता आम्ही पालक होणार आहोत. आम्ही खूप दिवसांपासून या आनंदाच्या बातमीची वाट पाहत होतो आणि आता अखेर आम्ही या आनंदाचा आनंद घेऊ शकणार आहोत!.

पाहा व्हिडीओ :

भारतीने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आणि लिहिले, ‘हे आमचे सर्वात मोठे सरप्राईज होते.’ भारतीच्या या पोस्टवर चाहत्यांसोबतच सेलिब्रिटीही तिचे अभिनंदन करत आहेत. प्रत्येकजण दोघांनाही आयुष्याच्या या नव्या प्रवासाचा आनंद घेण्यास सांगत आहे.

कधी होणार बाळाचा जन्म?

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, भारती पुढील वर्षी एप्रिलमध्ये मुलाला जन्म देणार आहे. भारतीने याआधी एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला यावर्षी आई व्हायचे होते, पण कोरोनामुळे तिला हा प्लान रद्द करावा लागला. ती म्हणाली होती की, जेव्हा मूल जन्माला येते तेव्हा त्याला सतत आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात जावे लागते. पण आता कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये जायला भीती वाटते.

आता भारती खूप खुश आहे कारण ती आई होणार आहे. या गुड न्यूजची ती खूप दिवसांपासून वाट पाहत होती आणि आता तिला लवकरात लवकर या क्षणाचा आनंद घ्यायचा आहे.

हेही वाचा :

Ali Akbar : बिपीन रावत यांच्या निधनावर स्माईली इमोजीमुळं दिग्दर्शक अली अकबर भडकला, थेट धर्मांतराची घोषणा, हिंदू नावही जाहीर

Happy Birthday Kimi Katkar | ‘जुम्मा चुम्मा’ गर्ल किमी काटकर, मनोरंजन विश्वात आल्यावर बदलले नाव!

Aarya Season 2 Review | तिसऱ्या सीझनची वाट पाहायला लावणारा ‘आर्या 2’, सुष्मिता सेनच्या धमाकेदार अ‍ॅक्शनने जिंकलं प्रेक्षकांचं मन!


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें