Happy Birthday Pearl Puri | गर्लफ्रेंडसाठी अभिनेता बनण्याचा निर्णय घेणारा पर्ल पुरी, स्ट्रगलमुळेच झाला होता ब्रेकअप!

अभिनेता पर्ल व्ही पुरी (Pearl V Puri) आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी प्रसिद्ध आहे आणि टीव्ही जगतात त्याच्या अभिनयाची जादू दिसते आहे. अभिनेता आज (10 जुलै) आपला 32वा वाढदिवस साजरा करत आहे. पर्लचा जन्म 10 जुलै 1989 रोजी छिंदवाड्यात झाला.

Happy Birthday Pearl Puri | गर्लफ्रेंडसाठी अभिनेता बनण्याचा निर्णय घेणारा पर्ल पुरी, स्ट्रगलमुळेच झाला होता ब्रेकअप!
Follow us
| Updated on: Jul 10, 2021 | 12:36 PM

मुंबई : अभिनेता पर्ल व्ही पुरी (Pearl V Puri) आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी प्रसिद्ध आहे आणि टीव्ही जगतात त्याच्या अभिनयाची जादू दिसते आहे. अभिनेता आज (10 जुलै) आपला 32वा वाढदिवस साजरा करत आहे. पर्लचा जन्म 10 जुलै 1989 रोजी छिंदवाड्यात झाला. पर्लने ‘फिर भी ना माने बदतमीज दिल’  या मालिकेमध्ये मुख्य भूमिका सकारात मनोरंजन विश्वात डेब्यू केला होता. या शोनंतर पर्लने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. पण, पर्लला कधी अभिनेता व्हायचे नव्हते. त्याने केवळ आपल्या मैत्रिणीसाठी अभिनेता होण्याचा निर्णय घेतला होता (Happy Birthday Pearl Puri know about actors career journey and his story).

ज्या मैत्रिणीसाठी पर्लने अभिनेता होण्याचा निर्णय घेतला होता, तिनेच त्याच्या स्ट्रगल काळात त्याची साथ सोडली.

मैत्रिणीसाठी अभिनेता बनला!

पर्लने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याची प्रेयसी शाहरुख खानची मोठी चाहती होती आणि तिला पर्लनेही अभिनेता व्हावे, असे नेहमी वाटायचे. तिने पर्लला मुंबईत जाऊन अभिनेता होण्यास सांगितले होते. पर्ल आपल्या वडिलांशी भांडण करून मुंबईला आला होता. कारण त्याच्या वडिलांना वाटायचे की, आपल्या मुलाने या व्यवसायात सामील व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. पण त्यावेळी पर्लला आपल्या मैत्रिणीचे स्वप्न पूर्ण करायचे होते आणि तो मुंबईत आला. त्याला मुंबईत खूप संघर्ष करावा लागला. पैशाअभावी पाणी-पुरी खाऊन तो उदरनिर्वाह करत असे. बऱ्याच संघर्षानंतर पर्लला दोन चित्रपट मिळाले. त्यातील एक आजपर्यंत रिलीज झाला नाहीय आणि दुसरा मध्यातच बंद केला गेला.

मैत्रिणीने तोडले संबंध

चित्रपटात अपयशी झाल्यानंतर पर्लची पावले टीव्हीच्या दुनियेकडे वळली. जिथे त्याला ओळख देखील मिळू लागली. एकीकडे पर्लला ओळख मिळू लागली होती, तर दुसरीकडे त्याचे मैत्रीणीसोबत ब्रेक अप झाले. पर्लला अभिनय करायला अजिबात आवडत नव्हते, तो फक्त त्याच्या मैत्रिणीचे स्वप्न पूर्ण करत होता, जिने नंतर त्याच्याबरोबरचे सगळे संबंध तोडले. पर्लने आपल्या मैत्रिणीशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण तिने संबंध तोडले. जेव्हा, पर्लने त्याच्या मैत्रिणीला सांगितले की, मी फक्त तुझ्यासाठी अभिनय केला. यावर ती म्हणाली की, त्यावेळी मी लहान होते आणि आता मी मोठी झालो आहे. आत तू अभिनय सोडून दे. मात्र, त्यानंतर पर्ल आपल्या मैत्रिणीला कधीच भेटला नाही.

(Happy Birthday Pearl Puri know about actors career journey and his story)

हेही वाचा :

PHOTO | कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर जोशात सुरु झाले प्रियंका चोप्राचे रेस्टॉरंट ‘सोना’, सोशल मीडियावर शेअर केले फोटो!

‘तलाक’च्या घोषणेनंतर पुन्हा एकत्र दिसले आमिर-किरण, ‘लाल सिंह चड्ढा’च्या सेटवरचा स्मायलिंग फोटो चर्चेत!

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.