AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तलाक’च्या घोषणेनंतर पुन्हा एकत्र दिसले आमिर-किरण, ‘लाल सिंह चड्ढा’च्या सेटवरचा स्मायलिंग फोटो चर्चेत!

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अर्थात अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आणि किरण राव (Kiran Rao) घटस्फोटानंतरही एकमेकांसोबत काम करत आहेत.

‘तलाक’च्या घोषणेनंतर पुन्हा एकत्र दिसले आमिर-किरण, ‘लाल सिंह चड्ढा’च्या सेटवरचा स्मायलिंग फोटो चर्चेत!
आमिर खान, किरण राव आणि नागा चैतन्य
| Edited By: | Updated on: Jul 10, 2021 | 10:28 AM
Share

मुंबई : बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अर्थात अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आणि किरण राव (Kiran Rao) घटस्फोटानंतरही एकमेकांसोबत काम करत आहेत. आमिरच्या ‘लालसिंग चड्ढा’  (Lal Singh Chaddha) या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असलेला, अभिनेता नागार्जुन अक्किनेनीचा मुलगा चैतन्य अक्केनेनीने चित्रपटाच्या सेटवरून एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे (Aamir Khan And Kiran Rao seen Happy together on the set of Lal Singh Chaddha Naga Chaitanya share photo).

घटस्फोटाच्या घोषणेनंतर या दोघांचा हा पहिलाच फोटो असून, त्यात आमिर आणि किरण खूपच आनंदी दिसत आहेत. फोटो शेअर करताना चैतन्यने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “कृतज्ञ.”

पाहा पोस्ट :

पानी फाऊंडेशन आमच्या मुलासारखे!

यापूर्वी आमिर आणि किरणने आपल्या चाहत्यांसाठी एक व्हिडीओ संदेशही शेअर केला होता. दोघे या व्हिडीओमध्ये त्यांच्या विभक्ततेबद्दल बोलले आहेत. तसेच, व्हिडीओमध्ये ते एकमेकांचे हात पकडताना देखील दिसले. आमिरने या व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, “तुम्ही लोकांना नक्कीच वाईट वाटले असेल, आवडले नसते, काहींना धक्का बसला असेल. आम्ही तुम्हाला फक्त इतकेच सांगू इच्छित आहोत की, आम्ही दोघे खूप आनंदी आहोत आणि आम्ही एक कुटुंब आहोत. बदल झाला आहे तो फक्त आमच्या नात्यात…पण आम्ही एकमेकांसोबत आहोत, म्हणून तुम्ही इतर काही विचार करू नका. पाणी फाऊंडेशन हे आमच्यासाठी आमच्या मुलासारखे आहे.

आमिर-किरण होते बॉलिवूडचे पॉवर कपल!

रीना दत्तापासून घटस्फोट घेतल्यानंतर आमिरने 2005 साली किरण रावशी लग्न केले होते. त्यांना आझाद नावाचा एक मुलगा आहे आणि तो दहा वर्षांचा आहे. आझाद यांचा जन्म सरोगसीद्वारे झाला होता. किरणला गर्भवती होण्यास अडचण आल्यामुळे या दोघांनी सरोगसीचा निर्णय घेतला, त्यानंतर आझादचा जन्म 2011मध्ये झाला. आमिर आणि किरण हे बॉलिवूडचे पॉवर कपल मानले जात होते. चित्रपट निर्मितीपासून पाणी फाउंडेशनपर्यंत ते एकत्र काम करत होते. आदर्श मानली जाणारी ही जोडी आता तुटलेली दिसत आहे. मात्र, यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही.

आमिर खान आणि किरण राव यांचे पत्र

या सुंदर 15 वर्षांमध्ये आम्हाला एकत्रित आयुष्यभराचे अनुभव, आनंदाने जगता आलं. आमचं नातं केवळ विश्वास, आदर आणि प्रेम यावरच फुलले. आता आम्हाला आमच्या आयुष्यातील नवा अध्याय सुरू करायचा आहे. आम्ही आता फार काळासाठी पती-पत्नी असं न राहता, माता-पिता आणि कुटुंबाच्या रुपात राहू.

आम्ही काही काळापूर्वीच नियोजनपूर्वक वेगळं होण्याची सुरुवात केली होती. आता त्याला औपचारिक रुप दिल्यानं बरं वाटत आहे. विस्तारित कुटुंबाप्रमाणं आमचं जीवन वेगळं जगणार असलो, तरी महत्वाच्या प्रसंगात एकत्र असू.

आम्ही मुलगा आझादची जबाबदारी आई-वडील म्हणून पार पाडू, त्याचं पालन पोषण दोघेही सहकारी म्हणून करु. आम्ही चित्रपट, पाणी फाऊंडेशन आणि इतर प्रकल्पांमध्ये सहकारी म्हणून काम सुरु ठेवणार असून त्याबद्दल आम्ही भावूक आहोत.

आमच्या नात्यातील या निर्णयाला सातत्याने पाठिंबा आणि सहकार्य करणारे आमचे कुटुंबीय आणि मित्र यांनादेखील धन्यवाद देतो. कारण त्यांच्या पाठिंब्याशिवाय आम्ही सुरक्षितपणे या निर्णयापर्यंत पोहोचलो नसतो.

आम्हाला आमच्या शुभचिंतकांकडून शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळण्याची आशा आहे. आमच्यासारखं तुम्हीही या घटस्फोटाकडे शेवट नव्हे तर नव्या प्रवासाची सुरुवात आहे, अशा दृष्टीने पाहाल! – आमिर खान आणि किरण राव

(Aamir Khan And Kiran Rao seen Happy together on the set of Lal Singh Chaddha Naga Chaitanya share photo)

हेही वाचा :

Aamir Khan Kiran Rao Divorce : वेगळे झालो असलो तरी ‘या’ कामासाठी एकत्रच राहणार, आमिर-किरण रावचं मोठं पाऊल

Amir Khan Kiran Rao Divorce | अभिनेता आमिर खानचा दुसऱ्यांदा घटस्फोट, किरण रावसोबत 15 वर्षांनी काडीमोड

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.