Indian Idol 2 | सवाई भट्टच्या एलिमिनेशनमुळे चाहते संतापले, षण्मुखप्रियाच्या उपस्थितीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह!

सोनी टीव्हीचा सिंगिंग रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडॉल 12’ (Indian Idol 12) चाहत्यांमध्ये खूपच लोकप्रिय झाला आहे. एकीकडे हा कार्यक्रम चाहत्यांमध्ये खूप पसंत केला जात आहे, तर दुसरीकडे हा शो सतत वादातही अडकत आहे.

Indian Idol 2 | सवाई भट्टच्या एलिमिनेशनमुळे चाहते संतापले, षण्मुखप्रियाच्या उपस्थितीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह!
सवाई भट्ट-षण्मुखप्रिया

मुंबई : सोनी टीव्हीचा सिंगिंग रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडॉल 12’ (Indian Idol 12) चाहत्यांमध्ये खूपच लोकप्रिय झाला आहे. एकीकडे हा कार्यक्रम चाहत्यांमध्ये खूप पसंत केला जात आहे, तर दुसरीकडे हा शो सतत वादातही अडकत आहे. आता या स्पर्धेतील विजयाचा प्रबळ दावेदार असणारा स्पर्धक सवाई भट्ट (Sawai bhatt) शोमधून एलिमिनेशन झाल्यामुळे बाहेर पडला आहे. सवाईच्या एलिमिनेशनमुळे चाहते सोशल मीडियावर चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले (Indian Idol 12 Shanmukhpriya Trolled by social media users after sawai bhatt elimination).

नेटकऱ्यांनी मेकर्सवर हल्लाबोल करत पुन्हा एकदा षण्मुखप्रियाला (shanmukhpriya) ट्रोल करण्यास सुरू केले आहे. अंजली गायकवाडानंतर आता सवाई भट्ट शोमधून बाहेर पडल्याने चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. यासह हा कार्यक्रम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेला दिसत आहे. या वेळी दोन तगडे स्पर्धक-गायक सवाई भट्ट आणि पवनदीप यांची नावे सर्वात शेवट होती आणि मते कमी मिळाल्यामुळे सवाई भट्ट याला शोमधून बाहेर केले गेले.

नेटकऱ्यांचा राग अनावर!

सवाई शोच्या बाहेर गेल्याने नेटकऱ्यांचा रोष सोशल मीडियावर उफाळून आला होता. काही चाहत्यांनी असा दावा केला आहे की, परीक्षण चुकीच्या पद्धतीने केले जात आहे. अनेकांनी परीक्षकांवर पक्षपात केल्याचा आरोपही केला आहे. युजर्स म्हणत आहेत की, निर्मात्यांनी षण्मुखप्रियाला वाचवण्यासाठी आपले चांगले आणि प्रतिभावान स्पर्धकांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

दरम्यान, बरेच लोक षण्मुखप्रियाला ट्रोल करत आहेत. काही वापरकर्त्याने लिहिले आहे की, हा कार्यक्रम दिवसेंदिवस खराब होत चालला आहे, ते कुठेतरी #ShanMukhPriya चा बचाव करत आहेत आणि #SawaiBhatt बाहेर जाणे अत्यंत दयनीय आहे.

पाहा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

यापूर्वीही अनेकवेळा स्पर्धक षण्मुखप्रियाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. किंबहुना एखादा स्पर्धक शो बाहेर गेला की, याचा रोष षण्मुखप्रियावर व्यक्त केला जातो.

(Indian Idol 12 Shanmukhpriya Trolled by social media users after sawai bhatt elimination)

हेही वाचा :

Indian Idol 12 Shocking Elimination : सवाई भट्टवर प्रेक्षक नाराज? कमी मतं मिळाल्याने ‘इंडियन आयडॉल 12’मधून बाहेर!  

Munmun Dutta | ‘तारक मेहता…’च्या ‘बबिता’ला ‘व्हॅलेंटाईन्स’ दिवशीच बॉयफ्रेंडकडून मारहाण, आयुष्यातील ‘त्या’ घटनांमुळे पुरुषांबद्दल निर्माण झाला होता तिरस्कार!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI