इंडियन आयडॉल जिंकणाऱ्या स्पर्धकांना बक्षिस म्हणून किती पैसा मिळतो? जाणून घ्या…

| Updated on: Aug 16, 2021 | 12:01 PM

नुकताच ‘इंडियन आयडॉल 12’चा महाअंतिम सोहळा पार पडला. गायक पवनदीप राजन हा ‘इंडियन आयडॉल 12’चा विजेता ठरला आहे. या यशामुळे संपूर्ण भारतातील गीत-संगीत रसिक पवनदीप राजनचे अभिनंदन करत आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पवनदीप राजनला ही खास भेट मिळाली आहे.

इंडियन आयडॉल जिंकणाऱ्या स्पर्धकांना बक्षिस म्हणून किती पैसा मिळतो? जाणून घ्या...
Pawandeep Rajan
Follow us on

मुंबई : नुकताच ‘इंडियन आयडॉल 12’चा महाअंतिम सोहळा पार पडला. गायक पवनदीप राजन हा ‘इंडियन आयडॉल 12’चा विजेता ठरला आहे. या यशामुळे संपूर्ण भारतातील गीत-संगीत रसिक पवनदीप राजनचे अभिनंदन करत आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पवनदीप राजनला ही खास भेट मिळाली आहे.

या कार्यक्रमाचे परिक्षक सोनू कक्कर, अनु मलिक आणि हिमेश रेशमिया यांच्या व्यतिरिक्त, विशाल दादलानी, ग्रेट खली या सेलिब्रिटींनी या फायलन सिझनमध्ये आपला सहभाग नोंदवला. इंडियन आयडॉल 12 च्या सहा फायनलिस्ट्समध्ये चांगलीच चुरस रंगली होती. मात्र सर्व पाच स्पर्धकांना मागे टाकत इंडियन आयडॉलच्या 12व्या सिझनच्या ट्रॉफीवर पवनदीप राजनने आपलं नाव कोरलं. या यशामुळे पवनदीपचे संपूर्ण भारतभरातून स्वागत केले जात आहे.

विजेत्याला ट्रॉफी व्यतिरिक्त, रोख बक्षीस आणि करार!

‘इंडियन आयडल 12’ च्या विजेत्याला ट्रॉफी (Indian Idol 12 Prize Money) व्यतिरिक्त देखील अनेक बऱ्याच गोष्टी मिळतात. रिपोर्ट्सनुसार, विजेत्याला यावेळी 25 लाख रुपये बक्षीस रक्कम देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त, एका संगीत कंपनीसोबत एक करार देखील केला जातो. त्याच वेळी, ‘टेली चक्कर’ मधील एका अहवालानुसार, ‘इंडियन आयडॉल 12’ चे विजेते आणि तसेच सर्व अंतिम स्पर्धकांना लंडनच्या वेम्बली स्टेडियममध्ये एका मैफिलीमध्ये सादर करण्याची संधी मिळेल.

‘इंडियन आयडॉल’चे आतापर्यंतचे विजेते आणि त्यांना मिळालेली बक्षीस रक्कम

इंडियन आयडॉल 1 – अभिजित सावंत

इंडियन आयडॉलच्या पहिल्या पर्वातील विजेता अभिनीत सावंत याला बक्षीस म्हणून 50 लाख रुपये आणि टी-सीरिजसोबत अल्बमचा करार मिळाला होता.

इंडियन आयडल 2 – संदीप आचार्य

इंडियन आयडॉलच्या दुसऱ्या सीझनचा विजेता संदीप आचार्य होता, ज्याने एनसी करुनियाला कडवी स्पर्धा दिली. शो जिंकल्यानंतर संदीप आचार्यला एक कोटी रुपये आणि मारुती बलेनो कार मिळाली. यासह त्याने सोनी बीएमजीसोबत म्युझिक अल्बमचा करार केला.

इंडियन आयडॉल 3 – प्रशांत तमांग

इंडियन आयडॉलचा तिसरा सीझन कोलकाता पोलिस कॉन्स्टेबल प्रशांत तमांगने जिंकला. त्याला एक कोटी रुपये आणि मारुती सुझुकी SX4 बक्षीस म्हणून मिळाले.

इंडियन आयडॉल 4 – सौरभी देबबर्मा

इंडियन आयडॉलची पहिली महिला विजेती इंडियन आयडॉलच्या चौथ्या हंगामात होती. कपिल थापाला कडवी स्पर्धा दिल्यानंतर सौरभीने पहिले स्थान मिळवले होते. तिला एक कोटी रुपये आणि टाटा विंगर कार देण्यात आली.

इंडियन आयडॉल 5 – श्रीरामचंद्र मायनामपती

इंडियन आयडॉलच्या पाचव्या हंगामाचा विजेता आज बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक आणि तेलुगु चित्रपटसृष्टीचा एक प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने शो जिंकून 50 लाख रुपये आणि एक टाटा विंगर जिंकली होती. यासोबतच त्यांनी एका म्युझिक अल्बमवरही साईन केली होती.

इंडियन आयडॉल 6 – विपुल मेहता

विपुल मेहता इंडियन आयडॉल 6 चे विजेते ठरले ज्यांना 50 लाख रुपये आणि निसान मायक्रा कार, सुझुकी हयात बाईक आणि 3 लाखांचा मॅक्स लाइफ इन्शुरन्स देण्यात आला.

इंडियन आयडॉल ज्युनियर सीझन 1 – अंजना पद्मनाभन

जेव्हा इंडियन आयडॉल ज्युनिअर सीझन 1 प्रसारित झाला, तो प्रेक्षकांमध्ये खूप प्रसिद्ध झाला. शोची विजेती अंजना पद्मनाभन होती, जिला 25 लाख रुपये आणि निसान मायक्रा कार मिळाली.

इंडियन आयडॉल ज्युनियर सीझन 2 – अनन्या नंदा

इंडियन आयडॉल ज्युनियरच्या दुसऱ्या सत्राची विजेती अनन्या नंदा हिने नित्यश्री वेंकटरमण आणि नाहिद आफरीन यांच्याशी स्पर्धा केल्यानंतर 10 लाख रुपये जिंकले होते.

इंडियन आयडॉल 9 – एलवी रेवंथ ‌

इंडियन आयडॉल 9चे विजेत पद एलवी रेवंथने‌ पटकावले. त्याला 25 लाख रुपये आणि महिंद्रा KUV100 मिळाली.

इंडियन आयडल 10 – सलमान अली

अंकुश भारद्वाज आणि निलांजना राय यांना तगडी स्पर्धा दिल्यानंतर सलमान अलीने इंडियन आयडॉल सीझन 10च्या ट्रॉफीसह 25 लाख रुपये आणि दॅटसन गो कार जिंकली.

इंडियन आयडॉल 11 – सनी हिंदुस्थानी

इंडियन आयडॉल 11 सीझन भटिंडामध्ये राहणाऱ्या सनी हिंदुस्थानीसाठी खूप भाग्यवान ठरला होता. त्याला 25 लाखांची रक्कम आणि टाटा अल्ट्रोझ कार देण्यात आली.

हेही वाचा :

सैफ अली खान- ‘हम तुम’ ते ‘तान्हाजी’… आगळ्यावेगळ्या भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता!

पवनदीपने जिंकली ‘इंडियन आयडॉल 12’ची ट्रॉफी, पाहा 12 तासांच्या ग्रँड फिनालेचे खास फोटो!