Jai Bhavani Jai Shivaji : अभिनेता विशाल निकम साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा जिगरबाज मावळा शिवा काशिद यांची भूमिका

| Updated on: Jul 17, 2021 | 10:20 AM

छत्रपती शिवरायांची भूमिका भूषण प्रधान, बाजीप्रभू देशपांडेंच्या रुपात अजिंक्य देव आणि नेतोजी पालकरांची भुमिका कश्यप परुळेकर साकारणार असून अभिनेता विशाल निकम शिवा काशिद यांची भूमिका साकारणार आहे. (Jai Bhavani Jai Shivaji: Actor Vishal Nikam will play the role of Chhatrapati Shivaji Maharaj's Mawla 'Shiva Kashid')

Jai Bhavani Jai Shivaji : अभिनेता विशाल निकम साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा जिगरबाज मावळा शिवा काशिद यांची भूमिका
Follow us on

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हे नाव जरी उच्चारलं तरी उर अभिमानाने भरुन येतो. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा छत्रपती शिवरायांनी रचला आणि या जाणत्या राजाच्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नपूर्ततेसाठी हजारो शिलेदारांनी जीव ओवाळून टाकला. याच शिलेदारांच्या शौर्याची गोष्ट सांगणारी ‘जय भवानी जय शिवाजी’ (Jai Bhavani Jai Shivaji) मालिका 26 जुलैपासून रात्री 10 वाजता स्टार प्रवाहवर सुरु होत आहे.

अभिनेता विशाल निकम साकारणार शिवा काशिद यांची भूमिका

छत्रपती शिवरायांची भूमिका भूषण प्रधान, बाजीप्रभू देशपांडेंच्या रुपात अजिंक्य देव आणि नेतोजी पालकरांची भुमिका कश्यप परुळेकर साकारणार असून अभिनेता विशाल निकम शिवा काशिद यांची भूमिका साकारणार आहे. शिवा काशिद हे स्वराज्याच्या इतिहासातलं महत्त्वाचं पान… शिवरायांचा हा जिगरबाज मावळा हुबेहुब शिवरायांसारखा दिसायचा असं म्हण्टलं जातं. महाराजांची पन्हाळ गडावरुन सुटका करण्यासाठी शिवा काशिद यांनी छत्रपती शिवरायांचं सोंग घेऊन आपल्या राजाचा जीव वाचवला होता. याच जिगरबाज शिवा काशिद यांच्या शौर्याची गाथा साकारण्यासाठी अभिनेता विशाल निकम सज्ज झाला आहे.

‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेतल्या या भूमिकेविषयी सांगताना अभिनेता विशाल निकम म्हणाला, ‘स्टार प्रवाहने दिलेल्या या संधीसाठी मी खूपच आभारी आहे. याआधी स्टार प्रवाहच्या साता जल्माच्या गाठी आणि दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. आता जय भवानी जय शिवाजी मध्ये शिवा काशिद साकारण्याची जबाबदारी आहे. स्वराज्य हे एकचं स्वप्न उराशी बाळगून हजारो मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. याच लढवय्या मावळ्यांची गोष्ट या मालिकेतून उलगडणार आहे. इतिहास जिवंत होतोय असं म्हण्टलं तरी चालेल. शिवा काशिद यांच्या शौर्याविषयी आपण ऐकलं आहे. जय भवानी जय शिवाजी मालिकेच्या निमित्ताने ते प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. मी या नव्या भूमिकेसाठी खूपच उत्सुक आहे. अशी भावना विशाल निकम याने व्यक्त केली.’

स्टार प्रवाह प्रस्तुत या मालिकेची निर्मिती दशमी क्रिएशन्सची आहे. 26 जुलैपासून रात्री 10 वाजता छत्रपती शिवरायांच्या शिलेदारांची ही गोष्ट भेटीला येणार आहे. तेव्हा पाहायला विसरु नका नवी ऐतिहासिक मालिका ‘जय भवानी जय शिवाजी’. (Jai Bhavani Jai Shivaji: Actor Vishal Nikam will play the role of Chhatrapati Shivaji Maharaj’s Mawla ‘Shiva Kashid’)

संबंधित बातम्या

Net Worth | तब्बल 14 वर्षानंतर शिल्पा शेट्टीचं मोठ्या पडद्यावर पुनरागमन, जाणून घ्या किती संपत्तीची मालकीण आहे अभिनेत्री…

Love story | एकमेकांच्या अगदी विरुद्ध स्वभावाचे होते राम कपूर-गौतमी गाडगीळ, जाणून घ्या कसे बनले ‘हमसफर’…