AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Love story | एकमेकांच्या अगदी विरुद्ध स्वभावाचे होते राम कपूर-गौतमी गाडगीळ, जाणून घ्या कसे बनले ‘हमसफर’…

अभिनेता राम कपूर (Ram Kapoor) आणि अभिनेत्री गौतमी गाडगीळ (Gautami Gadgil) हे दोघेही टीव्हीचे लोकप्रिय कलाकार आहेत. जेव्हा एखाद्या टीव्ही कार्यक्रमांमध्ये दोघे एकत्र दिसतात, तेव्हा प्रत्येकाची नजर त्यांच्यावर खिळलेली असते.

Love story | एकमेकांच्या अगदी विरुद्ध स्वभावाचे होते राम कपूर-गौतमी गाडगीळ, जाणून घ्या कसे बनले ‘हमसफर’...
राम-गौतमी
| Edited By: | Updated on: Jul 16, 2021 | 9:15 AM
Share

मुंबई : अभिनेता राम कपूर (Ram Kapoor) आणि अभिनेत्री गौतमी गाडगीळ (Gautami Gadgil) हे दोघेही टीव्हीचे लोकप्रिय कलाकार आहेत. जेव्हा एखाद्या टीव्ही कार्यक्रमांमध्ये दोघे एकत्र दिसतात, तेव्हा प्रत्येकाची नजर त्यांच्यावर खिळलेली असते. सोशल मीडियावरही दोघेही एकमेकांवरचे प्रेम व्यक्त करत असतात. दोघांच्या लग्न बरीच वर्षं झाली, पण आजही त्यांचे नाते आणि प्रेम खूपच फ्रेश आहे. चाहत्यांना दोघांच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल चांगलेच माहिती आहे. परंतु, वैयक्तिक आयुष्याबद्दल तितकेसे माहित नाही. चाल तर, आज आपण राम आणि गौतमीच्या प्रेमकथेबद्दल जाणून घेऊ…

‘घर एक मंदिर’ या लोकप्रिय कार्यक्रमात राम आणि गौतमी यांची भेट झाली. या शोमध्ये गौतमी रामच्या वाहिनीची भूमिका साकारत होती. शोमधील या दोघांच्याही पात्रांना प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती आणि या दोघांची ऑफस्क्रीन केमिस्ट्री वेगळ्या प्रकारे फुलत होती.

दोघेही पूर्णपणे विरुद्ध स्वभावाचे

दोघांनाही एकत्र राहणे फारच अवघड होते, कारण त्या दोघांचा स्वभाव वेगळा होता. रामला पार्टी आणि ड्रिंक्स करणार्‍या मुली आवडत असत, मात्र गौतमी या प्रकारची अजिबात नव्हती. पण तरीही राम आणि गौतमी एकमेकांच्या जवळ येऊ लागले.

अनेक सेलेब्सनी स्क्रीनवर ऑनलाईन रोमँटिक प्रपोज करताना आपण पाहिले असेलच, पण वास्तविक आयुष्यात या दोघांच्या बाबतीत असे काहीच घडले नाही. दोघांचा वास्तविक जीवनातील प्रपोज खूप सोपा आणि सुंदर होता. एका संध्याकाळी ते दोघे एका पार्टीत एन्जॉय करत होते, जिथे रामने गौतमीला विचारले की, ती त्याच्याशी लग्न करेल का? आधीच रामला हृदय देऊन बसलेल्या गौतमीने लगेचच रामला होकार दिला.

व्हॅलेंटाईन डेला लग्न

राम आणि गौतमी यांचे लग्न व्हॅलेंटाईन डे म्हणजे 14 फेब्रुवारी रोजी झाले. हा निर्णय गौतमीचा होता, कारण तो प्रेमाचा दिवस आहे. सुरुवातीला कुटूंबाच्या बाजूने काहीतरी समस्या उद्भवली होती, परंतु नंतर दोघांनीही एकत्र येऊन त्यांना पटवून दिले. गौतमी ही मराठी तर, राम पंजाबी आहे. पण दोघांनी आर्य समाजाच्या पद्धतीनुसार लग्न केले. दोघांचे लग्न मुंबईतच झाले. गौतमीचे हे दुसरे लग्न होते.

एकमेकांबद्दल काय म्हणतात?

एका मुलाखतीत राम म्हणाले होते, ‘गौतमीला माझी जीवन साथीदार बनवण्याचा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय होता. तीसुद्धा या मनोरंजन विश्वातील आहे, म्हणून तिला माझं काम चांगलं समजतं. तिला माहित आहे की, मला तासन् तास काम करावे लागते. जेव्हा मी कामामुळे दूर असतो तेव्हा मला गौतमी आणि मुलांची खूप आठवण येते. मला त्यांच्याबरोबर वेळ घालवायला खूप आवडतो.’

त्याचवेळी गौतमी म्हणाली होती, ‘माझा रामसोबतचा प्रवास खूपच मजेशीर, आव्हानात्मक आहे. आम्ही बर्‍याच वर्षांपासून एकत्र आहोत आणि मला त्यांचा अभिमान आहे. तो खूप कष्ट करतो आणि म्हणूनच तो आज इतका यशस्वी आहे.’

आनंदी विवाहित जीवनाचे रहस्य

त्यांच्या रिलेशनशिपची खास गोष्ट म्हणजे दोघेही आपापल्या आयुष्यात एकमेकांना महत्त्वाचे समजतात. दोघांनाही एकमेकांची, नात्याची किंमत समजते आणि हेच त्यांच्या सुखी लग्नाचे रहस्य आहे. राम आणि गौतमी आजच्या जोडप्यांसाठी प्रेरणा आहेत.

(Cute Love story of Gautami Gadgil and Ram Kapoor)

हेही वाचा :

तुम्हालाही अभिनय शिकायचाय? अक्षय कुमार देतोय सुवर्णसंधी, ‘खिलाडी’ने सुरु केले प्रोफेशनल मास्टर क्लास!

RRR Movie | भव्य सेट, आगीचे लोट, शेकडोंची गर्दी, ट्रेलरपूर्वी एस.एस.राजामौलींनी दाखवली ‘RRR’ चित्रपटाची झलक!

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.