Kapil Sharma Net Worth : ऐशोआरामाचं आयुष्य जगतो टीव्ही सुपरस्टार कपिल शर्मा, कार आणि व्हॅनिटीच्या बाबतीत शाहरुखलाही तगडी टक्कर!

कपिल एक यशस्वी टीव्ही कलाकार आणि होस्ट आहे. गायक होण्याचे स्वप्न बाळगून कपिल शर्मा बॉलिवूडमध्ये आला होते. पण, कॉमेडीने त्याला खरी ओळख मिळवून दिली आणि आज तो भारतातील सर्वात श्रीमंत कॉमेडियन आहे.

Kapil Sharma Net Worth : ऐशोआरामाचं आयुष्य जगतो टीव्ही सुपरस्टार कपिल शर्मा, कार आणि व्हॅनिटीच्या बाबतीत शाहरुखलाही तगडी टक्कर!
कपिल शर्मा
| Edited By: | Updated on: Jun 13, 2021 | 7:54 AM

मुंबई : बॉलिवूड आणि टीव्ही जगातील प्रसिद्ध कॉमेडियन-अभिनेता कपिल शर्माला (Kapil Sharma) आज कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. विनोदाच्या जगात अभिनेत्याने स्वतःसाठी एक हक्काचे स्थान निर्माण केले आहे. कपिल एक यशस्वी टीव्ही कलाकार आणि होस्ट आहे. गायक होण्याचे स्वप्न बाळगून कपिल शर्मा बॉलिवूडमध्ये आला होते. पण, कॉमेडीने त्याला खरी ओळख मिळवून दिली आणि आज तो भारतातील सर्वात श्रीमंत कॉमेडियन आहे(Kapil Sharma Net Worth actor lives luxurious life in Mumbai).

फिल्मसियप्पा डॉट कॉमच्या मते, आजच्या काळात कपिल शर्माची एकूण मालमत्ता 40 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी आहे, जी भारतीय रुपयांमध्ये सुमारे 300 कोटी रुपये होते. दुसरीकडे, मीडिया रिपोर्टनुसार कपिल शर्मा एका शोसाठी 50 लाख ते 70 लाख रुपये मानधन आकारतो. ज्यामुळे आज तो भारतातील सर्वात महागड्या कॉमेडियनपैकी एक आहे. टीव्हीच्या माध्यमातून तो लोकांच्या घरांत पोहोचला आहे. कपिल शर्माची संपत्ती दरवर्षी 15% वाढत आहे. जर आपण मागील 5 वर्षांची चर्चा केली, तर अभिनेत्याच्या नेटवर्थमध्ये जवळपास 325% वाढ झाली आहे.

कपिल शर्माचे कार कलेक्शन

मर्सिडीज बेंझ एस क्लास – 1.19 कोटी

मर्सिडीज बेंझ सी क्लास – 50 लाख

एसयूव्ही रेंज रोव्हर एव्होक – 95.53 लाख

व्हॉल्वो एक्ससी 90 – 80 लाख

कपिल शर्माचे बाईक कलेक्शन

सुझुकी हायाबुसा – 15 लाख

कावासाकी निन्जा एच 2 आर – 30 लाख

बुलेट 350 – 2 लाख

मुंबईत आलिशान फ्लॅट्स

कपिल शर्माचा लक्झरी फ्लॅट गोरेगावमधील एका भव्य इमारतीच्या 9व्या मजल्यावर आहे. या आलिशान फ्लॅटची किंमत तब्बल 15 कोटी रुपये आहे. कपिल येथे आपली आई, पत्नी आणि मुलीसह राहतो. कपिल आणि त्याची पत्नी गिन्नी अनेकदा या फ्लॅटची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर करत असतात.

कपिल शर्मा अगदी कमी वेळात बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीचा एक प्रसिद्ध अभिनेता झाला आहे. अभिनेत्याने स्वतःसाठी एक डॅशिंग व्हॅनिटी व्हॅन तयार करून घेतली आहे, ज्याची किंमत सुमारे 5.5 कोटी आहे.

(Kapil Sharma Net Worth actor lives luxurious life in Mumbai)

हेही वाचा :

Photo : ‘या’ अभिनेत्याच्या कन्येची सोशल मीडियावर चर्चा; हिच्यासमोर अंगुरी भाभी, गोरी मेमही फिक्या

सोनू सूद स्पर्धा परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण देणार, ‘या’प्रकारे अर्ज करता येणार

#BoycottKareenaKhan म्हणत नेटकरी ‘बेबो’वर संतापले, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?