AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shocking | ‘द कपिल शर्मा शो’ अचानक बंद झाल्यामुळे चर्चांना उधाण!

भारतातील लोकप्रिय शोपैकी एक असणारा 'द कपिल शर्मा' (The Kapil Sharma Show') 31 जानेवारीपासून बंद झाला आहे. 1 फेब्रुवारीला शो टिव्हीवर दाखवण्यात आला नाही.

Shocking | 'द कपिल शर्मा शो' अचानक बंद झाल्यामुळे चर्चांना उधाण!
| Updated on: Feb 02, 2021 | 12:43 PM
Share

मुंबई : भारतातील लोकप्रिय शोपैकी एक असणारा ‘द कपिल शर्मा’ (The Kapil Sharma Show’) 31 जानेवारीपासून बंद झाला आहे. 1 फेब्रुवारीला शो टिव्हीवर दाखवण्यात आला नाही. याबद्दल ‘द कपिल शर्माच्या शोमधील कलाकारांनी अगोदरच कल्पना दिली होती. मात्र, प्रेक्षकांकडून निरोप घेताना कपिलने कोणताही फिनाले ठेवला नाही यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. परंतू असेही सांगितले जात आहे की हा शो परत एकदा टीव्हीवर येऊ शकतो. पण यामध्ये शोचे जुनेच भाग दाखवले जातील. कपिलच्या शो अचानक बंद झाल्यामुळे बरेच प्रश्नही निर्माण झाले आहेत. (Fans were disappointed with the sudden closure of ‘The Kapil Sharma Show’)

कपिलच्या शोचा ग्रँड फिनाले का झाला नाही? कपिल आणि चॅनल यांच्यात सर्व काही ठीक नाही की इतर काही कारणे आहेत अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे. यापूर्वी कलर्सवरील कपिल शर्माचा शोही असाच अचानक थांबला होता. अलीकडेच एका चाहत्याने कपिलला शो बंद होण्याचे कारण विचारले होते त्यावेळी कपिल म्हणाला होता की, लवकरच आम्ही पुन्हा एकदा पालक बनणार आहोत त्यामुळे मला माझ्या पत्नीला वेळ द्यायचा आहे.

कपिलच्या शोमध्ये सलमान खान ते अक्षय कुमार यांच्यापर्यंत अनेक दिग्गज कलाकार आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले आहेत. अशा परिस्थितीत शो बंद होणार म्हटल्यावर चाहते निराश झाले आहेत. द कपिल शर्मा शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला कपिल शर्मा आता लवकरच एका वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या वेब सीरिजसाठी त्याने एक-दोन नव्हे तर 20 कोटी रुपये घेतल्याचा दावा अभिनेता कृष्णा अभिषेकने केला होता. ‘द कपिल शर्मा’ शोच्या एका भागात कृष्णाने हा गौप्यस्फोट केला होता. मात्र, नंतर ही केवळ गंमत असल्याचं नंतर सांगण्यात होते.

कपिल लवकरच वेब सीरिजच्या माध्यमातून डिजिटलमध्ये पदार्पण करणार आहे, याची चर्चा सर्वत्र आहे. परंतु कपिल शर्मा डिजिटलमध्ये पदार्पणासाठी एवढी मोठी रक्कम घेणार आहे. हे ऐकल्यावर अनेकांना धक्काच बसला. कपिल शर्माच्या अनेक चाहत्यांनी याबद्दल कपिलला विचारण्याचा प्रयत्नही केला, मात्र कपिलकडून कोणतेही उत्तर मिळू शकले नाही. कपिल शर्मा त्याच्या डिजिटल पदार्पणासाठी खरोखरच २० कोटी घेणार आहे का? याचे कुतूहल मात्र त्याच्या चाहत्यांना अजूनही आहे.

संबंधित बातम्या : 

विवेक अग्निहोत्रीचा पुन्हा स्वरा भास्करशी पंगा, म्हणतो…

अंकिता लोखंडेची बॉयफ्रेंड विकी जैनसोबत गोवा ट्रीप, सोशल मीडियावर फोटोंची चर्चा!

(Fans were disappointed with the sudden closure of ‘The Kapil Sharma Show’)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.