Video | अरे वा! कपिल शर्माची लेक आणि भारती सिंहचा मुलगा दिसले रॅम्प वॉक करताना, व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले

| Updated on: May 15, 2023 | 8:00 PM

काॅमेडियन कपिल शर्मा आणि भारती सिंह हे कायमच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच कपिल शर्मा याचा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे कपिल शर्मा याच्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना भारती सिंह ही दिसली होती. सध्या यांचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

Video | अरे वा! कपिल शर्माची लेक आणि भारती सिंहचा मुलगा दिसले रॅम्प वॉक करताना, व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले
Follow us on

मुंबई : द कपिल शर्मा शोच्या माध्यमातून गेल्या कित्येक वर्षांपासून कपिल हा प्रेक्षकांना हसवण्याचे काम करत आहे. विशेष म्हणजे कपिल शर्मा (Kapil Sharma) याच्या शोमध्ये अनेक मोठे बाॅलिवूड स्टार हे त्यांच्या चित्रपटांचे प्रमोशन करण्यासाठी येतात. कपिल शर्मा याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर (Social media) बघायला मिळते. कपिल शर्मा याने काॅमेडी सोबतच बाॅलिवूड चित्रपटांमध्येही पदार्पण केले आहे. काही दिवसांपूर्वीच कपिल शर्मा याचा झिगाटो हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, कपिल शर्मा याच्या या चित्रपटाला म्हणाला तसा प्रतिसाद हा प्रेक्षकांचा अजिबात मिळाला नाही. भारती सिंह (Bharti Singh) ही कपिल शर्मा याच्या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसली होती.

काॅमेडियन भारती सिंह ही गेल्या कित्येक वर्षांपासून चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसत आहे. भारती सिंह ही द कपिल शर्मा याच्या शोमधून प्रेक्षकांना पोट धरून हसवण्याचे काम करत होती. भारती सिंह ही सोशल मीडियाच्या माध्यामातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात आहे. विशेष म्हणजे आपल्या पर्सनल आयुष्यात काय सुरू आहे हे सांगताना देखील अनेकदा भारती सिंह ही दिसते.

भारती सिंह ही ब्लाॅगच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात आहे. भारती सिंह हिचा मुलगा लक्ष म्हणजे गोला हा एक वर्षांचा झाला आहे. गोला चाहत्यांचे आकर्षण आहे. गोला याचे देखील अनेक चाहते आहेत. जय श्रीकृष्णा म्हणताच हात जोडताना गोला दिसतो. कपिल शर्मा याची देखील मुलगी अनायरा ही कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी आलिया हिने अनायरा हिच्यासाठी खास गिफ्ट पाठवले होते.

नुकताच भारती सिंह आणि कपिल शर्मा यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे यांच्या या व्हिडीओमध्ये त्यांचे मुले देखील आहेत. भारती सिंह ही एका कार्यक्रमात मुलगा गोला याच्यासोबत चक्क रॅम्प वॉक करताना दिसली आहे. व्हिडीओमध्ये भारती सिंह आणि गोला यांच्यासोबत कृष्णा अभिषेक हा देखील दिसत आहे.

सुरूवातीला भारती सिंह आणि गोला रॅम्प वॉक करतात. विशेष म्हणजे यावेळी गोला हा उपस्थित लोकांना बाय बाय करताना देखील दिसला. रॅम्प वॉकच्या वेळी कृष्णा अभिषेककडून भारती गोला याला आपल्या कडेवर घेते. भारती सिंह हिच्यानंतर लगेचच कपिल शर्मा आणि त्याची मुलगी अनायरा हे दोघे येतात. अत्यंत खास लूकमध्ये कपिल शर्मा आणि अनायरा दिसत आहे.

अनायरा आणि कपिल शर्मा यांनी काळ्या रंगाचे कपडे घातले आहेत. विशेष म्हणजे रॅम्प वॉक करताना कपिल शर्मा याची लेक उपस्थित लोकांना किस करताना देखील दिसली. यावेळी सर्वांना पाहून स्माईल देताना देखील कपिल शर्मा याची मुलगी दिसली. आता सोशल मीडियावर हे दोन्ही व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. गोला आणि अनायरा यांना रॅम्प वॉक करताना पाहून चाहते देखील आनंदी झाले आहेत.