Bigg Boss 16 | करण कुंद्रा आणि जन्नत जुबेर बिग बाॅसमध्ये करणार वाइल्डकार्ड एन्ट्री

अर्चना आणि विकास यांच्यामध्ये तर जोरदार भांडणे सुरू असल्याने एक वेगळेच वातावरण बघायला मिळतंय.

Bigg Boss 16 | करण कुंद्रा आणि जन्नत जुबेर बिग बाॅसमध्ये करणार वाइल्डकार्ड एन्ट्री
| Updated on: Dec 29, 2022 | 5:35 PM

मुंबई : बिग बाॅसच्या घरात हंगामा होताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसांपासून प्रेक्षकांचे जबरदस्त मनोरंजन घरातील सदस्य करताना दिसत आहेत. अर्चना आणि विकास यांच्यामध्ये तर जोरदार भांडणे सुरू असल्याने एक वेगळेच वातावरण बघायला मिळतंय. विकास आणि अर्चना यांच्या वादामध्ये थेट विकास याच्या पत्नीने उडी घेतली असून आपला पती किती संयमाने गेम खेळत आहे हे गुंजन हिने सांगून टाकले. आता बिग बाॅसच्या घरात दोन नवे सदस्य एन्ट्री घेणार आहेत.

बिग बाॅस सीजन 15 पूर्णपणे फ्लाॅप गेल्यानंतर निर्मात्यांनी बिग बाॅस सीजन 16 कसे खास करता येईल. यावर भर दिला होता. यामुळे घरात त्याच पध्दतीचे स्पर्धेक यंदाच्या सीजनमध्ये घेण्यात आले आहेत.

सुरूवातीला बिग बाॅस 16 साजिद खान याच्यामुळे चर्चेत आले होते. साजिद खान हा बिग बाॅसमध्ये सहभागी होणार म्हटल्यावर अनेकांनी याला विरोध केला होता. साजिद खान याचे खरे रूप पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक होते.

बिग बाॅस 16 टीआरपीमध्ये धमाका करत असतानाच आता शोमध्ये दोन नवे चेहरे लवकरच सहभागी होणार आहेत. प्रेक्षकांना जोडून ठेवण्यासाठी निर्माते सतत प्रयत्न करताना दिसत आहेत.

करण कुंद्रा आणि जन्नत जुबेर हे दोघे बिग बाॅसमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. करण कुंद्रा हा बिग बाॅस 15 मध्येही सहभागी झाला होता. आता या सीजनमध्ये करण काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

नुकताच सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर आलाय. यामध्ये शालिन भनोट आणि सुंबुल ताैकीर यांच्यामध्ये वाद होताना दिसत आहे. शालिनमुळे सुंबुल रडताना देखील दिसत आहे.