Ratris Khel Chale 3: ‘रात्रीस खेळ चाले 3’मध्ये येणार मोठा ट्विस्ट; माईंवर पडणारी काळी सावली कोणाची?

झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'रात्रीस खेळ चाले'ची तिनही पर्व तुफान गाजली. रात्रीस खेळ चाले ३ (Ratris Khel Chale 3) ही मालिका आता एका विलक्षण वळणावर आली असून मालिकेत पुढे काय घडणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.

Ratris Khel Chale 3: रात्रीस खेळ चाले 3मध्ये येणार मोठा ट्विस्ट; माईंवर पडणारी काळी सावली कोणाची?
Ratris Khel Chale 3
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 31, 2022 | 12:20 PM

झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘रात्रीस खेळ चाले’ची तिनही पर्व तुफान गाजली. रात्रीस खेळ चाले ३ (Ratris Khel Chale 3) ही मालिका आता एका विलक्षण वळणावर आली असून मालिकेत पुढे काय घडणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. अण्णा नाईकांच्या पापामुळे त्यांना आणि त्यांच्या पुढच्या पिढीला अत्रुप्त आत्म्यांनी दिलेले शाप भोगावे लागले. अण्णा नाईकांच्या (Anna Naik) पुढच्या पिढीची वाताहत झाली. अतृप्त आत्म्यांनी नाईक वाड्याचा ताबा घेतला. एक नांदतं घर बघता बघता रसातळाला गेलं. पण या आलेल्या वादळात अण्णा नाईकांची बायको ईंदू म्हणजेच माई घराण्याच्या मूळ पुरुषावर आणि कुलदैवतेवर भार टाकून सगळ्या संकटांशी शेवटपर्यंत लढते. आपल्या उध्वस्त झालेल्या घराण्याला शाप मुक्त होण्यासाठी उ:शाप मिळवते.

एक अशिक्षित स्त्री सुद्धा आपला स्वाभिमान जपून, संपूर्ण घराला पुन्हा उभं करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगते आणि त्यात जिंकून दाखवते. आता लवकरच नाईकांचा वाडा शापमुक्त होणार आहे. नुकतंच मालिकेत पाहिलं की अण्णा वच्छीला सांगतात की अण्णांनी मारलेली माणसं पण अतृप्त भूतं झाली आणि ती आता नाईकांचा बळी मागत आहेत. त्यावेळी वच्छी अण्णाला दोन पर्याय देते – मुक्ती किंवा शेवंता. पण शेवंता वाड्याबाहेरील अतृप्त भूतांना वाडा पेटवून द्यायला सांगते. तेव्हा वच्छी अण्णाला एक बळी द्यायचं कबूल करते.

मालिकेचा उत्कंठावर्धक प्रोमो

अण्णांच्या मागणीसाठी नाईकांच्या वाड्यावर घरातील बळी कोण जाणार याबद्दल भीती निर्माण होते. माई देवघरात जाऊन कुटुंबासाठी बळी जायला मी तयार असल्याचं सांगते. पण माई बळी जाण्यासाठी जाते तेव्हा तिच्यावर काळी सावली येते. ही काळी सावली कोणाची? ही सावली माईंचं रक्षण करणार की घात? अतृप्त भुतांसाठी माईंचा बळी जाणार का? हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल.

हेही वाचा:

बूट घालून हनुमान चालिसावर नृत्य केल्याने सुखविंदर वादाच्या भोवऱ्यात; टीका होताच म्हणाले…

सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडची धमकी; ‘एके दिवशी तुझाही पर्दाफाश होईल’