AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आशुतोष मालिकेत नसणार हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का…; अनिरूद्धने व्यक्त केल्या भावना

Actor Milind Gawali Shared New Post Omkar Gowardhan Aai Kuthe Kay Karte Serial : आई कुठे काय करते मालिकेतील अनिरुद्ध देशमुखने आशुतोष केळकरला शुभेच्छा दिल्यात. अभिनेते मिलिंद गवळी यांनी अभिनेता ओंकार गोवर्धनसाठी खास पोस्ट लिहिली आहे. वाचा सविस्तर.....

आशुतोष मालिकेत नसणार हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का...; अनिरूद्धने व्यक्त केल्या भावना
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Mar 16, 2024 | 9:54 PM
Share

मुंबई | 16 मार्च 2024 : एखादी मालिका सुरु होते तेव्हा त्याच्यातली पात्र घरातील सदस्य होऊन जातात. अशीच एक लोकप्रिय मालिका म्हणजे आई कुठे काय करते… ही मालिका यातील पात्र प्रेक्षकांना आपलीशी वाटतात. या मालिकेतील आशुतोष या पात्राने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. आशुतोषचं निधन झाल्याचं मालिकेत दाखवण्यात आलं आहे. याबाबत अनिरुद्ध देशमुख ही भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी यांनी भावनिक पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी आशुतोष केळकर ही भूमिका साकारणाऱ्या ओंकार गोवर्धन यांच्यासोबतचे क्षण लिहिले आहेत. आता आशुतोष केळकर मालिकेत नसणार याचा मला स्वतःलाच खूप मोठा धक्का बसला आहे. मला माहितीये मी त्याला खूप खूप मिस करणार आहे!, असं मिलिंद गवळी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मिलिंद गवळी यांची खास पोस्ट जशीच्या तशी

“ओंकार गोवर्धन”

याने आशुतोष केळकर या भूमिकेची कात टाकली !

तीन साडे- तीन वर्षांपूर्वी “आईकुठेकायकरते”या मालिकेमध्ये अरुंधती दुसरं लग्न करणार तिच्या आयुष्यामध्ये एक नवीन कॅरेक्टर इंट्रोड्युस होणार याची उत्सुकता होती, अचानक एक दिवस ओंकार गोवर्धन आणि माझी गाठ आमच्या आई कुठे काय करते च्या सेटवर जिन्यामध्ये झाली , मी ओमकार ला पाहिल्या पाहिल्या म्हटलं अरे आपण तर आधी भेटलो आहोत, गजेंद्र अहिरे यांनी मला एकदा त्याच्या सिनेमाच्या ट्रायल शोसाठी बोलावलं होतं तो सिनेमा होता निळकंठ मास्तर त्या निळकंठ मास्तर च्या भूमिकेमध्ये ओमकार गोवर्धन होता आणि मला त्याचं काम अतिशय आवडलं होतं तोच मुलगा आता माझ्यासमोर आशुतोष केळकर च्या भूमिकेसाठी आई कुठे काय करते मध्ये आला होता , मला त्याला बघून आनंद झाला, कारण माझा नमितावर खूप विश्वास आहे, तिचं कास्टिंग कधी चुकत नाही, मी ओमकार ला शुभेच्छा दिल्या, आणि त्याला म्हटलं “वा मजा येणार आता , मला खात्री आहे तू छानच काम करशील !

अगदी तसंच झालं ओमकार ने इतक्या प्रामाणिकपणे, इतक्या छान पद्धतीने आशुतोष केळकर ही भूमिका निभावली, की तो सगळ्यांचा लाडका झाला ! मी आणि आप्पा ज्या मेकअप रूम मध्ये होतो त्याच मेकअप रूम मध्येच ओमकार ची सोय करण्यात आली, आणि ओमकार आल्या दिवसापासून त्या मेकअप रूममध्ये फक्त कला मस्ती आणि हास्य रसाचा वर्षाव झाला , humour काय असतं हे ओमकार कडून शिकावं , सतत प्रसन्न राहणे , हसत राहणे आणि समोरच्याला हसवत राहणे हा त्याचा हातखंडा, पण एकदा का स्क्रिप्ट हातात आली की ती पाठ करायची, त्याच्यावर म्हणून चिंतन करत राहायचं, डोक्यात जितके प्रश्न येतात ते Director ला विचारून त्याचा निरसन करायचं, एखाद्याचं वाक्य चुकलं,शब्द चुकला किंवा त्याचा अर्थ बदलला, तर प्रथम त्याला ते लक्षात यायचं.

पाठांतराच्या बाबतीत त्याचा हात कोणीच धरू शकत नव्हतं, त्याची तर असंख्य सिनेमांची गाणी सुद्धा तोंड पाठ असायची , कधी कधी मेकअप रूम मध्ये आप्पा ,अनीश आणि त्याच्या त्या गाण्यांच्या मैफिली व्हायच्या बरेचदा मी पण त्यात सामील व्हायचो, आता आशुतोष केळकर मालिकेत नसणार याचा मला स्वतःलाच खूप मोठा धक्का बसला आहे, मला माहितीये मी त्याला खूप खूप miss करणार !

जसा लहानाचे एकत्र मोठे झालेले दोन भाऊ अचानक एक अमेरिकेला शिफ्ट व्हायला निघाला की त्या दुसऱ्या भावाची जी अवस्था होत असेल, तसंच काहीस feeling आहे, पण त्याचं भाषेवरचं प्रभुत्व , त्याची अभिनयाची जाण , आणि त्याचं professionalism , त्याला आयुष्यामध्ये अजून खूप मोठं करणार अशी माझी खात्री आहे!

ओंकारला माझ्या खूप खूप शुभेच्छा

Follow Us
सोलापूरात करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
Solapur | काजू-बदाम नको, शेतकऱ्यांना मदत हवी; करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण....
Mira Road | फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण जखमी, पण घटनास्थळी वेगळंच सत्य समोर
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; पटेलांची टीका...
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; प्रफुल्ल पटेलांची टीका, सतेज पाटलांचा पलटवार
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर...
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर... महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना भावनिक पत्र, पार्थ सावध...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना लिहिलेलं भावनिक पत्र, पार्थ सावध...
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीस
Girish Mahajan | महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीसांचे तातडीचे आदेश
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?