Video | नेहा कक्करचा पंजाबी गाण्यावर धमाल ‘भांगडा’, पती रोहनप्रीत कौतुक करत म्हणाला…

सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर (Neha kakkar) हिच्या आवाजाचे अनेक चाहते दिवाने आहेत. तिच्या गाण्यांबरोबरच तिच्या डान्सच्या व्हिडीओंनी देखील सोशल मीडियावर मोठी वाहवा मिळवली आहे. आजकाल इंटरनेटवरील नेहा कक्करचे व्हिडीओ खूप चर्चेत आहेत.

Video | नेहा कक्करचा पंजाबी गाण्यावर धमाल ‘भांगडा’, पती रोहनप्रीत कौतुक करत म्हणाला...
नेहा कक्कर

मुंबई : सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर (Neha kakkar) हिच्या आवाजाचे अनेक चाहते दिवाने आहेत. तिच्या गाण्यांबरोबरच तिच्या डान्सच्या व्हिडीओंनी देखील सोशल मीडियावर मोठी वाहवा मिळवली आहे. आजकाल इंटरनेटवरील नेहा कक्करचे व्हिडीओ खूप चर्चेत आहेत. तिची पंजाबी गाणी इंटरनेटवर खूपच लोकप्रिय आहेत. काही दिवसांपूर्वी नेहा कक्कर आपल्या चाहत्यांसाठी आणखी एक पंजाबी गाणे ‘ Khad Tainu Main Dassa ‘ घेऊन आली आहे. तिचे हे गाणे बरेच सुपरहिट ठरले आहे. या गाण्यावर नाचतानाचा तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे (Neha kakkar Share Cutest Bhangda Video on social media).

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘ Khad Tainu Main Dassa’ या पंजाबी गाण्यावर नेहा कक्कर भांगडा करताना दिसली होती. तिने हा भांगडा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. व्हिडीओमध्ये नेहाने पर्पल कलर टॉप आणि ब्लॅक कलरचा प्लाझो परिधान केला आहे. कॅप्शनमध्ये तिने ‘बोट रॉकर्ससह मी माझी आवडती गाणी ऐकत आहे’, असे लिहिले आहे.

पाहा व्हिडीओ :

(Neha kakkar Share Cutest Bhangda Video on social media)

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, नेहा या व्हिडीओमध्ये एका कंपनीची जाहिरात करत आहे. तिच्या या व्हिडीओवर आतापर्यंत 3 लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. यासह तिचा पती रोहनप्रीतने याने देखील तिच्या भांगडा व्हिडीओवर कमेंट केली आहे आणि त्याचे कौतुक केले आहे. त्याने लिहिले ‘हाहाहा.. आय लव्ह यू एंड यू क्युटेस्ट भांगडा’, असे या कमेंटमध्ये लिहिले आहे.

नेहाच्या नव्या गाण्याची चर्चा!

नेहा कक्कर यांचे ‘खद तैनु में दसा’ हे गाणे नुकतेच रिलीज झाले आहे, ज्यामध्ये ती तिचा पती रोहनप्रीत सिंगसोबत दिसली आहे. नेहाचे हे गाणे तिच्या चाहत्यांना खूप आवडत आहे. या गाण्यामुळे इंटरनेटवर धमाकेदार वातावरण निर्माण झाले आहे. सध्या नेहा कक्कर या दिवसांत उत्तराखंडमध्ये सुट्ट्यांच्या घेत आहेत, तिथून तिने आपले काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

(Neha kakkar Share Cutest Bhangda Video on social media)

हेही वाचा :

नचिकेतचं गाणं ऐकून प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध! पुन्हा एकदा Indian Idol 12वर केला हल्लाबोल

तुम्हाला माहित आहे का 71 गाणी असलेला हिंदी चित्रपट? अनेक महत्त्वाच्या परीक्षेतही आलाय हा प्रश्न!

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI