Priyank Sharma: ‘बिग बॉस’ फेम प्रियांक शर्मावर अज्ञात व्यक्तीकडून हल्ला; म्हणाला “तो अचानक मला..”

या हल्ल्यात तो किरकोळ जखमी झाला होता. हे प्रकरण गाझियाबादमधील आहे. प्रियांक त्याच्या आई-वडिलांसोबत हॉस्पिटलमध्ये गेला होता, तेव्हा एका व्यक्तीने त्याच्यावर हल्ला केला.

Priyank Sharma: बिग बॉस फेम प्रियांक शर्मावर अज्ञात व्यक्तीकडून हल्ला; म्हणाला तो अचानक मला..
Priyank Sharma: 'बिग बॉस' फेम प्रियांक शर्मावर अज्ञात व्यक्तीकडून हल्ला
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Aug 03, 2022 | 2:03 PM

बिग बॉस 11′ फेम अभिनेता प्रियांक शर्माने (Priyank Sharma) नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. त्याने सांगितलं की, 30 जुलै रोजी गाझियाबाद (Ghaziabad) इथल्या रुग्णालयात (Hospital) एका अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात तो किरकोळ जखमी झाला होता. हे प्रकरण गाझियाबादमधील आहे. प्रियांक त्याच्या आई-वडिलांसोबत हॉस्पिटलमध्ये गेला होता, तेव्हा एका व्यक्तीने त्याच्यावर हल्ला केला. प्रियांकने सांगितलं की, तो त्याच्या आईच्या तपासणीसाठी रुग्णालयात गेला होता आणि त्याच्यासोबत त्याचे वडीलही होते. रुग्णालयाच्या आवारातून बाहेर पडत असताना त्याच्यावर हल्ला करण्यात आला.

या घटनेबद्दल बोलताना प्रियांकने एका मुलाखतीत सांगितलं की, “अचानक कुठूनतरी एक व्यक्ती आली आणि त्याने माझ्यावर हल्ला केला. तो मला मारायला लागला. यादरम्यान मी त्याचा हात धरून त्याला मागे ढकललं. बराच गदारोळ झाला. रुग्णालय प्रशासनातील दोन लोक माझ्या मदतीसाठी आले, मी त्यांचा खरोखर आभारी आहे. ज्याने माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तो पळून गेला. ही भीतीदायक परिस्थिती होती.’

इन्स्टा पोस्ट-

याप्रकरणी प्रियांकने कौशांबी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. “आम्ही नंतर रुग्णालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना सोपवता येईल. परंतु रुग्णालयाच्या सुरक्षाव्यवस्थेने ते आम्हाला दिलं नाही,” असंही तो म्हणाला. याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 323 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रियांकला बिग बॉस 11 मुळे खूप प्रसिद्धी मिळाली. रोडीज रायझिंग आणि स्प्लिट्सविला 10 सारख्या इतर रिअॅलिटी शोमध्येही त्याने भाग घेतला होता. दिव्या अग्रवाल आणि बेनाफ्शा सूनावाला यांच्यासोबतच्या नात्यामुळेही त्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती. याशिवाय विकास गुप्तासोबतच्या वादामुळेही तो चर्चेत आला होता.