‘रामायणा’तील आणखी एका पात्राने घेतला जगाचा निरोप, ‘निषाद’ साकारणाऱ्या चंद्रकांत पंड्यांचे निधन

| Updated on: Oct 21, 2021 | 3:12 PM

रामनंद सागर यांच्या लोकप्रिय ‘रामायण’ (Ramayana) या मालिकेतील आणखी एक प्रसिद्ध पात्राने जगाचा निरोप घेतला आहे. या मालिकेत ‘निषाद राजा’ची भूमिका साकारणारे अभिनेते चंद्रकांत पंड्या (Chandrkant Pandya) यांनी आज म्हणजेच गुरुवारी (21 ऑक्टोबर) अखेरचा श्वास घेतला.

‘रामायणा’तील आणखी एका पात्राने घेतला जगाचा निरोप, ‘निषाद’ साकारणाऱ्या चंद्रकांत पंड्यांचे निधन
Chandrakant Pandya
Follow us on

मुंबई : रामनंद सागर यांच्या लोकप्रिय ‘रामायण’ (Ramayana) या मालिकेतील आणखी एक प्रसिद्ध पात्राने जगाचा निरोप घेतला आहे. रामानंद सागर यांचा पौराणिक शो ‘रामायण’मधील ‘रावण’ साकारणारे अरविंद त्रिवेदी यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. या मालिकेत ‘निषाद राजा’ची भूमिका साकारणारे अभिनेते चंद्रकांत पंड्या (Chandrkant Pandya) यांनी आज म्हणजेच गुरुवारी (21 ऑक्टोबर) अखेरचा श्वास घेतला. चंद्रकांत पंड्या 78 वर्षांचे होते आणि त्यांना अनेक आजारांनी ग्रासले होते. त्यांच्या मृत्यूचे कारण हेच आजार सांगितले जात आहे.

चंद्रकांत यांच्या मृत्यूची पुष्टी रामायणात सीतेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी केली आहे. दीपिका चिखलियाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरील एका पोस्टमध्ये चंद्रकांत पंड्याच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. चंद्रकांत यांचा एक फोटो शेअर करत दीपिकाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘चंद्रकांत पंड्या, रामायणातील ‘निषाद राजा’ तुमच्या आत्म्याला शांती लाभो.’ अरुण गोविल यांनीही चंद्रकांत यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

चंद्रकांत यांची ओळख

चंद्रकांत हे गुजरातचे रहिवासी होते. त्यांचा जन्म 1 जानेवारी 1946 रोजी राज्यातील बनासकांठा येथे झाला. येथे ते भिल्डी गावात राहत होते. चंद्रकांत यांचे कुटुंब, जे व्यावसायिकाचे होते, ते फार पूर्वी गुजरातमधून मुंबईत स्थायिक झाले होते. चंद्रकांत यांचे शिक्षण आणि लेखन कारकीर्द हे सर्व मुंबईतच झाले आहे. यानंतर त्यांनी छोट्या भूमिकांपासून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी नाटकांमध्येही काम केले. ते ‘रावण’ साकारणाऱ्या अरविंद त्रिवेदींसोबत थिएटर करायचे.

निषाद राजाने दिली ओळख

मात्र, चंद्रकांत यांना त्यांची खरी ओळख फक्त रामानंद सागर यांच्या रामायणातून मिळाली. ‘निषाद राजा’ या व्यक्तिरेखेला या शोमध्ये चांगलीच पसंती मिळाली. हे पात्र श्री रामाच्या अगदी जवळचे होते. रामायण व्यतिरिक्त त्यांनी महाभारत, विक्रम बेताल, होते होते प्यार हो गया, पाटली परमार सारख्या शो मध्ये काम केले होते.

त्यांनी अनेक मालिकांमध्ये तसेच अनेक चित्रपटांमध्ये काम केले. ‘कडू मकरानी’ नावाचा त्यांचा पहिला चित्रपट गुजराती होता. त्यांना या चित्रपटातून बरीच ओळख मिळाली आणि ते गुजराती चित्रपट उद्योगाचे सुपरस्टार बनले. त्यांनी सुमारे 100 टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केले. आम्ही तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू की, चंद्रकांत हे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमजद खान यांचे खास मित्र होते. दोघेही कॉलेजच्या दिवसांपासूनचे मित्र होते. दोघे एकाच महाविद्यालयात शिकत असत.

हेही वाचा :

Ananya Panday | प्रसिद्ध अभिनेत्याची लेक अनन्या पांडे, अभिनयामुळे कौतुक तर कधी वक्तव्यांमुळे झालीये ट्रोल!

Video | शॉर्ट फिल्मसाठी देबिना बनर्जीने केले मुंडन, सोशल मीडियावर शेअर केला लूक, पाहा व्हिडीओ…

Ananya Panday : अनन्या पांडेला NCB चं समन्स; दुपारी चौकशीला हजर राहण्याचे आदेश, सुहाना खानवरही चौकशीची टांगती तलवार!