Ananya Panday | प्रसिद्ध अभिनेत्याची लेक अनन्या पांडे, अभिनयामुळे कौतुक तर कधी वक्तव्यांमुळे झालीये ट्रोल!

अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) ही सध्या खूप चर्चेत आली आहे. ड्रग्ज प्रकरणी नाव समोर आल्याने तिला चौकशीसाठी समन्स देण्यात आला आहे. बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हिचा जन्म 30 ऑक्टोबर 1998 रोजी झाला. अनन्या ही अभिनेता चंकी पांडेची मुलगी आहे.

Ananya Panday | प्रसिद्ध अभिनेत्याची लेक अनन्या पांडे, अभिनयामुळे कौतुक तर कधी वक्तव्यांमुळे झालीये ट्रोल!
ananya panday

मुंबई : अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) ही सध्या खूप चर्चेत आली आहे. ड्रग्ज प्रकरणी नाव समोर आल्याने तिला चौकशीसाठी समन्स देण्यात आला आहे. बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हिचा जन्म 30 ऑक्टोबर 1998 रोजी झाला. अनन्या ही अभिनेता चंकी पांडेची मुलगी आहे.

अनन्याने धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून पदवी पूर्ण केली आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनन्याने करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्याच्यासोबत टायगर श्रॉफ आणि तारा सुतारिया मुख्य भूमिकेत दिसले होते.

सोशल मीडियावरही अभिनेत्रीचे वर्चस्व!

अनन्या पांडे चित्रपटांमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच सोशल मीडियावर खूप सक्रिय होती. ती दररोज तिचे नवीन फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत राहते. अनन्याच्या व्यावसायिक जीवनाबद्दल बोलायचे झाले, तर तिने इंडस्ट्रीमध्ये आपला ठसा उमटवला आणि खूप कमी वेळात लोकप्रियता मिळवली. तिने ‘पती पत्नी और वो’ आणि ‘खाली पीली’ सारख्या चित्रपटांमध्ये विविध पात्र साकारून आपली अभिनय क्षमता सिद्ध केली आहे.

‘इनसायडर’ म्हणून झाली ट्रोल

अनन्या पांडेला अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. गेल्या काही दिवसांपासून तिला ‘इनसायडर’ व्यक्ती म्हणून ट्रोल केले जात होते. त्याच वेळी, जेव्हा ती नेपोटिझमवर विधान करते, तेव्हा देखील ती त्रोल होत असते. अनन्या करण जोहरच्या लोकप्रिय चॅट शो ‘कॉफी विथ करण’ मध्ये म्हणाली होती की, करणसोबत काम करणे लोक म्हणतात तितके सोपे नाही. माझ्या मते, हा प्रत्येकाचा स्वतःचा प्रवास आहे. माझे वडील कधीही धर्मा फिल्म्सचा भाग बनले नाहीत आणि ‘कॉफी विथ करण’ वर कधीच आले नाहीत. या वक्तव्यानंतर तिला जबरदस्त ट्रोलिंगला बळी पडावे लागले होते.

ड्रग्ज प्रकरणात नाव!

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी पोहोचले आहेत. ड्रग्स प्रकरणाच्या चौकशीसाठीचे समन्स देण्यासाठी एनसीबीचे अधिकारी अनन्या पांडे यांच्या घरी पोहोचले होते. अधिकाऱ्यांनी अनन्या पांडेच्या घरी जाऊन तिला हे समन्स दिले आहेत.  असे बोलले जाते आहे की, ज्या बॉलिवूड अभिनेत्रीबद्दल आर्यन खानच्या ड्रग्स चॅटमध्ये बोलले जात होते, ती अनन्या पांडे होती. मात्र, अद्याप याची पुष्टी झालेली नाही. सध्या एनसीबीने अनन्या पांडेला आज (21 ऑक्टोबर) दुपारी 2 वाजता ड्रग्ज प्रकरणात चौकशीसाठी बोलावले आहे.

रिपोर्ट्सनुसार, अनन्या पांडे सोबत, ड्रग्स चॅटमध्ये आर्यन खानची बहीण सुहाना खानचे नावही समोर आले आहे. अनन्या पांडेच्या घरून बाहेर आल्यानंतर एनसीबीची एक टीम शाहरुख खानच्या मन्नतच्या घरी पोहोचली, जिथे सर्च ऑपरेशन सुरू आहे.

हेही वाचा :

Aryan Khan Drugs Case | आर्यन खानच्या जामिनासाठी हायकोर्टात धाव, आता NCB ची पुढची पावलं काय?

VIDEO | आर्यनच्या भेटीसाठी शाहरुख खान आर्थर रोड तुरुंगात, बाप-लेकाची भेट किती मिनिटं?

Shahrukh Khan : 15 मिनिटांचा वेळ, दोघांमध्ये काचेची भिंत; आर्यन खानला कसा भेटला शाहरुख खान, वाचा आर्थर रोड जेलमध्ये नेमकं काय घडलं

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI