Aryan Khan Drugs Case | आर्यन खानच्या जामिनासाठी हायकोर्टात धाव, आता NCB ची पुढची पावलं काय?

अभिनेता शाहरुख खान मुलगा आर्यन खानला भेटण्यासाठी आर्थर रोड तुरुंगात गेला होता. जवळपास तीन आठवड्यांनंतर बाप-लेकाची भेट झाली. मात्र केवळ दहा मिनिटांत दोघांना भेट आटोपती घ्यावी लागली

Aryan Khan Drugs Case | आर्यन खानच्या जामिनासाठी हायकोर्टात धाव, आता NCB ची पुढची पावलं काय?
Aryan-Shah Rukh Khan


मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानच्या (Aryan Khan) जामीन अर्जावर बुधवारी सत्र न्यायालयाने निर्णय दिला. 20 ऑक्टोबरला मुंबईतील एनडीपीएसच्या विशेष न्यायालयाने आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला आणि त्याला पुन्हा एकदा तुरुंगात पाठवले. यामुळे आर्यन खूप अस्वस्थ असून कोणाशीही बोलत नसल्याचं सांगितलं जात आहे.

आर्यन खानच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर आता NCB चे पुढचे पाऊल काय असेल, हा प्रश्न निर्माण झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार एनसीबीचे संपूर्ण लक्ष उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे आहे. आर्यन खान आणि उर्वरित आरोपींनी उच्च न्यायालयात नव्याने जामीन अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो उत्तर देण्याची तयारी करत आहे.

सूत्रानुसार, एनडीपीएस न्यायालयाचा आदेशही एनसीबीच्या उत्तराचा भाग असेल. सर्व आरोपींची न्यायालयीन कोठडी उद्या संपत आहे. ती वाढवण्याची मागणी होईल. जेव्हा एनसीबीला चौकशीची गरज असेल तेव्हा ती आरोपींची कोठडी घेईल. अशा परिस्थितीत आर्यन खानला लवकर दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे.

शाहरुख आर्यनच्या भेटीला तुरुंगात

दरम्यान, अभिनेता शाहरुख खान मुलगा आर्यन खानला भेटण्यासाठी आर्थर रोड तुरुंगात गेला होता. जवळपास तीन आठवड्यांनंतर बाप-लेकाची भेट झाली. मात्र केवळ दहा मिनिटांत दोघांना भेट आटोपती घ्यावी लागली. आर्यनचा जामीन अर्ज काल एनडीपीएसच्या विशेष न्यायालयाने फेटाळल्यामुळे शाहरुखसह खान कुटुंबाला पुन्हा मोठा झटका बसला आहे. आर्यनचा तुरुंगातील मुक्काम पुन्हा काही दिवसांनी वाढला आहे. मुंबईतील क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खान तीन ऑक्टोबरपासून एनसीबीच्या कोठडीत आहे.

तीन आठवड्यांनी दहा मिनिटांची भेट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेलमधील कैद्यांना कोणालाही भेटण्याची परवानगी दिली जात नव्हती. मात्र प्रादुर्भाव कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शाहरुख खानला लेकाला भेटण्याची परवानगी मिळाली. गुरुवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास शाहरुख आर्थर रोड जेलमध्ये दाखल झाला. यावेळी जवळपास दहा मिनिटं दोघांमध्ये बोलणं झालं. बापलेकात नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, वडिलांच्या भेटीनंतर आर्यनच्या काय भावना होत्या, याचा तपशील मिळालेला नाही. तसंच शाहरुखनेही भेटीनंतर कुठलीही प्रतिक्रिया देणं टाळलं.

पाहा व्हिडीओ

संबंधित बातम्या :

VIDEO | आर्यनच्या भेटीसाठी शाहरुख खान आर्थर रोड तुरुंगात, बाप-लेकाची भेट किती मिनिटं?

आर्यन खानची केस फेक, मुंबईत दहशत माजवण्याचा-खंडणीचा धंदा सुरुय, सर्वांचे पुरावे देणार : नवाब मलिक

Aryan Khan Drugs Case | शाहरुखला पुन्हा झटका, ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानचा जामीन फेटाळला

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI