आर्यन खानची केस फेक, मुंबईत दहशत माजवण्याचा-खंडणीचा धंदा सुरुय, सर्वांचे पुरावे देणार : नवाब मलिक

आर्यन खानची केस ही फेक आहे. तसेच एनसीबीने गेल्या वर्षभरात केलेल्या कारवायांपैकी 90 टक्के कारवाया फेक आहेत. लोकांमध्ये दहशत आणि खंडणी मागण्यासाठी या कारवाया केल्या जात असल्याचा गंभीर आरोप नवाब मलिकांनी केला आहे.

आर्यन खानची केस फेक, मुंबईत दहशत माजवण्याचा-खंडणीचा धंदा सुरुय, सर्वांचे पुरावे देणार : नवाब मलिक
नवाब मलिक, समीर वानखेडे


मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज (20 ऑक्टोबर) पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन एनसीबीवर निशाणा साधला. खरंतर एनडीपीसी कोर्टाने आज अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्ज फेटाळला. आर्यन सह त्याचे अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचाही जामीन अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत एनसीबीवर सडकून टीका केली. आर्यन खानची केस ही फेक आहे. तसेच एनसीबीने गेल्या वर्षभरात केलेल्या कारवायांपैकी 90 टक्के कारवाया फेक आहेत. लोकांमध्ये दहशत आणि खंडणी मागण्यासाठी या कारवाया केल्या जात असल्याचा गंभीर आरोप नवाब मलिकांनी केला आहे.

नवाब मलिक नेमकं काय म्हणाले?

“मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचा मोबाईल चेक करा, असं मी आवाहन करतो. त्यांचे व्हाट्सअॅप चॅट, फोन रेकॉर्डिंग रिव्हील झाले तर सगळे केसेस फेक आहे, ते स्पष्ट होईल. तसेच त्यांनी काय-काय फेक काम केलंय ते सिद्ध होईल. भाजप, एनसीबी आणि काही गुन्हेगार मिळून मुंबईत दहशत माजवत आहेत. आम्ही त्याचे पुरावे पुढच्या आठवड्या देऊ. मुंबईत खंडणीचा मोठा धंदा सुरुय. लोकांमध्ये दहशत निर्माण झालीय. लोकांना बदनाम करण्याचं कटकारस्थान सुरुय. प्रसिद्धीसाठी कुणालाही अडकविण्याचा उद्योग एनसीबीच्या माध्यमातून सुरु आहे. एनसीबीने गेल्या वर्षभरात ज्या कारवाया केल्या आहेत त्याचा तपास करावा. त्यासाठी केंद्र सरकारने आयोग नेमावा”, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

‘एनसीबीचा प्रत्येक केसमध्ये युक्तीवाद बदलत जातोय’

“या केसमध्ये परराष्ट्र मंत्रालयाचा हवाला देवून ड्रग्जचं आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे. बिटकॉईन, क्रिप्टोकरन्सीचा उल्लेख कुठेतरी मीडियातून करण्यात आला. एनसीबीचा प्रत्येक केसमध्ये युक्तीवाद बदलत जातोय आणि लोकांचा जामीन कसा थांबवता येईल हे टेक्टिस एनसीबीचं आहे. बरेचसे उदाहरणं माझ्याकडे आहेत. आमच्या केसमध्ये जेव्हा एनडीपीसी न्यायालयात जामीनासाठी गेलो तेव्हा एक चॅट दाखवण्यात आलं, त्यामध्ये 5 लाख रुपयांच्या देवाणघेवाण्याचे पुरावे आमच्याकडे आहेत, असं सांगण्यात आलं. पण आमच्या घरातील छोट्या जावायांनी मोठ्या जावायाला कर्ज देण्याबाबतचे ते चॅट होते. पण जेव्हा चार्जशीट दाखल करण्यात आलं त्या चार्जशीटमध्ये त्याचा कुठलाही उल्लेख नव्हता. लोकांना त्रास कसा द्यायचा तेवढंच आहे. जामीन मिळू नये यासाठी सर्व प्रयत्न असतात”, असा आरोप मलिकांनी केला.

‘एनसीबीने जे पुरावे सादर केले ते खोटे’

“सिलेक्टीव लोकांचा विरोध करायचा, काही लोकांना जामीन मिळवून देण्यासाठी मदत करायची, अशी पद्धत एनसीबीची आहे. आर्यन खानशी संबंधित केस ही फेक आहे. आता आरोपींचे वकील जामीनासाठी हायकोर्टात जातील. काय निर्णय घ्यायचा तो त्यांचा अधिकार आहे. मी पहिल्या दिवसांपासून सांगतोय, एनसीबी कोर्टात जे फोटो, औषधे दाखवत आहेत ते सर्व मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्ट समीर वानखेडे यांच्या कार्यालयातले आहेत. एनसीबीला क्रूझवर काहीच सापडलेलं नाही. जर एखादा कोर्ट कमिश्नर बसवला तर जे खरंय ते स्पष्टपणे समोर येईल. बनावट फोटो जारी करुन ते केस दाखवत आहेत. त्याबाबत जर चौकशी केली तर ती केस फेक आहे हे सिद्ध होईल”, असा दावा मलिकांनी केला.

“आरोपीचे वकिलांना आमच्याकडून पुराव्यांची गरज असेल तर निश्चितपणे आमची त्यांना मदतीची भावना असेल. एनसीबीने गेल्या एक वर्षात ज्या काही कारवाया केल्या त्यातील 90 कारवाया या फेक आहेत. त्याचे पुरावे आम्ही गोळा करतोय. आज ना उद्या काही लोक कोर्टात फेक केसेबद्दल PIL दाखल करतील. ते सिद्ध देखील होईल”, असंदेखील नवाब मलिक यावेळी म्हणाले.

‘समीर वानखेडे यांच्या नावाने पैशांची मागणी’

“राजकीय हेतून काही विशेष लोकांना त्रास देण्यासाठी एनसीबीचा वापर होतोय. एनसीबीच्या माध्यमातून दहशत निर्माण करुन पैसे उकळण्याचं काम सुरु आहे. वर्सोवा पोलीस ठाण्यात एका व्यक्तीने तक्रार केली आहे. समीर वानखेडे यांच्या नावाने आमच्याकडून पैशांची मागणी केली जाते, अशी तक्रार एका व्यक्तीने एप्रिल महिन्यात केली आहे. जे पैसे खंडणीच्या रुपाने वसूल करण्याचा प्रयत्न सुरुय त्याचा भंडाफोड नक्की होईल”, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.

‘एनसीबीने आरोपींचा ब्लड आणि युरीन सॅम्पल घेतलाच नाही’

“यापूर्वी रेव्ह पार्टी जेव्हा झालीय. त्यामध्ये जी लोकं सापडली त्यांची युरीन, ब्लड सॅम्पल घेण्यात आले. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलं. कोर्टासमोर हजर करण्यात आलं. अशाप्रकारे केसेस चालल्या. पण गेल्या वर्षभरात एनसीबीने प्रत्येक व्यक्तीवर ड्रग्ज सेवन केल्याचा आरोप केला. पण कुठल्याही आरोपीचा ब्लड आणि युरीन सॅम्पल घेत नाही. तुम्हाला ते सॅम्पल सापडत नाहीत. मग तुम्ही व्हाट्सअॅप चॅटच्या आधारावर सांगतात”, असं नवाब मलिक म्हणाले.

नवाब मलिक नेमकं काय म्हणाले ते बघा :

हेही वाचा :

परमबीर सिंहांना अटकेपासून संरक्षण देण्यास राज्य सरकारचा नकार, ठाणे प्रकरणी नेमकं काय होणार?

शाहरुखला पुन्हा झटका, ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानचा जामीन फेटाळला

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI