Video | शॉर्ट फिल्मसाठी देबिना बनर्जीने केले मुंडन, सोशल मीडियावर शेअर केला लूक, पाहा व्हिडीओ…

अभिनेत्री देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. लग्नाला अनेक वर्षे झाली तरी दोघांचे प्रेम अबाधित आहे, तर दोघांची केमिस्ट्रीही अप्रतिम आहे. गुरमीत आणि देबिनाने 'रामायण' या मालिकेत एकत्र काम करून लोकप्रियता मिळवली.

Video | शॉर्ट फिल्मसाठी देबिना बनर्जीने केले मुंडन, सोशल मीडियावर शेअर केला लूक, पाहा व्हिडीओ...
Debina

मुंबई : अभिनेत्री देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. लग्नाला अनेक वर्षे झाली तरी दोघांचे प्रेम अबाधित आहे, तर दोघांची केमिस्ट्रीही अप्रतिम आहे. गुरमीत आणि देबिनाने ‘रामायण’ या मालिकेत एकत्र काम करून लोकप्रियता मिळवली. 2008 च्या या शोने दोघांनाही प्रेक्षकांची पसंती मिळवून दिली. आता दोघे पुन्हा एकदा एकत्र दिसले आहेत.

देबिनाने केले मुंडन

देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी यांनी ‘शुभ बिजॉय’ नावाच्या लघुपटात एकत्र काम केले आहे. दोघांनी ही शॉर्ट फिल्म बिग बँग नावाच्या OTT प्लॅटफॉर्मसाठी बनवली आहे. चित्रपटाची कथा एका मुली आणि मुलाची आहे, जे प्रेमात पडतात आणि आनंदाने जगत असतात, परंतु अपघातामुळे त्यांच्या आयुष्यात सर्व काही बदलते.

या लघुपटातून देबिनाने तिचा लूकही शेअर केला आहे. देबिना बॅनर्जी तिच्या व्यक्तिरेखेसाठी डोके मुंडण करताना दिसत आहे. मात्र, तिने हे प्रत्यक्षात केले नाही, परंतु मेकअपच्या मदतीने तिने स्वतःला ‘ब्लाड’ दाखवले आहे. त्याचबरोबर अपघातानंतर गुरमीतचे पात्र आंधळे होते.

पाहा व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Debina Bonnerjee (@debinabon)

गुरमीत-देबिना जोडी ‘शुभ बिजॉय’ या शॉर्ट फिल्मद्वारे जवळजवळ 11 वर्षांनंतर एकत्र पडद्यावर परतली आहे. या दोघांनी पुन्हा एकदा चित्रपटाच्या शूटिंगमध्ये त्यांच्या लग्नाचे दिवस पुन्हा अनुभवले. या चित्रपटासाठी एक बंगाली विधी विवाह सीन शूट करण्यात आला. हा लघुपट राम कमल मुखर्जी यांनी बनवला आहे.

गुरमीत आणि देबिना यांनी ‘रामायण’ या मालिकेत एकत्र काम करून लोकप्रियता मिळवली होती. 2008 मध्ये टीव्हीवर आलेल्या या शोने दोघांनाही प्रेक्षकांची पसंती मिळवून दिली होती. आता 11 वर्षांनंतर दोघे पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत.

काय म्हणाले देबिना आणि गुरमीत…

देबिना म्हणते, “गुरमीत आणि मी 11 वर्षांनंतर पडद्यावर परतलो आहोत एक शुभ फिल्म ‘शुभ बिजोया’, जी आमच्या हृदयाच्या अगदी जवळ आहे. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान राम कमलने घेतलेल्या छोट्या छोट्या मेहनतीमुळे मी प्रभावित झाले. ज्या प्रकारचे हावभाव आणि अतिरिक्त काम आम्हाला देण्यात आले ते गुरु आणि माझ्यासाठी खूप खास होते. हे एक मुख्य कारण आहे की ‘शुभो बिजॉय’ हा माझ्या हृदयाच्या जवळचा चित्रपट आहे.’

‘चित्रपटाचे शूटिंग हा एक आत्यंतिक अनुभव होता आणि आम्ही या शॉर्ट फिल्ममधून प्रचंड आठवणी टिपल्या आहेत. मी खूप आनंदी आहे की, देबिना आणि मी एकत्र मनोरंजनाच्या जगात आमचा प्रवास सुरू केला आणि आता आमचा OTTवरील प्रवास देखील एकमेकांसोबत सुरु झाला आहे, ते माझ्यासाठी खूप खास आहे’, असे देबिना म्हणाली.

लघुपटाचे एकंदरीत चित्रीकरण हा कलाकार म्हणून आमच्यासाठी एक अद्भुत आणि समृद्ध अनुभव आहे. त्यात आणखी काय भर पडते, ते म्हणजे देबिना आणि मी एका दशकाहून अधिक काळानंतर एकत्र काम करत आहोत. रामायणानंतर, आम्ही आता राम कमलच्या ‘शुभ बिजॉय’ साठी ऑनस्क्रीन असणार आहोत आणि यामुळे ते आणखी रोमांचक बनले आहे.

हेही वाचा :

Aryan Khan Drugs Case | आर्यन खानच्या जामिनासाठी हायकोर्टात धाव, आता NCB ची पुढची पावलं काय?

VIDEO | आर्यनच्या भेटीसाठी शाहरुख खान आर्थर रोड तुरुंगात, बाप-लेकाची भेट किती मिनिटं?

Shahrukh Khan : 15 मिनिटांचा वेळ, दोघांमध्ये काचेची भिंत; आर्यन खानला कसा भेटला शाहरुख खान, वाचा आर्थर रोड जेलमध्ये नेमकं काय घडलं

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI