AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Me Honar Superstar: लोककलेचे शिलेदार ठरले ‘मी होणार सुपरस्टार’चे महाविजेते; मुंबईचा राम पंडित ठरला उपविजेता

मुंबईचा राम पंडीत, संगमनेरची वर्षा एखंडे, सांगलीचा लोककलेचे शिलेदार ग्रुप आणि गोव्याच्या जिग्यासा ग्रुपमध्ये महाअंतिम लढत रंगली. अटीतटीच्या या लढतीत सांगलीच्या लोककलेचे शिलेदार ग्रुपने बाजी मारत विजेतेपदावर मोहोर उमटवली.

Me Honar Superstar: लोककलेचे शिलेदार ठरले ‘मी होणार सुपरस्टार'चे महाविजेते; मुंबईचा राम पंडित ठरला उपविजेता
Me Honar SuperstarImage Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: Aug 22, 2022 | 9:28 AM
Share

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील ‘मी होणार सुपरस्टार आवाज कुणाचा महाराष्ट्राचा’ (Mi Honar Superstar) कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा (Grand Finale) नुकताच पार पडला. मुंबईचा राम पंडीत, संगमनेरची वर्षा एखंडे, सांगलीचा लोककलेचे शिलेदार ग्रुप आणि गोव्याच्या जिग्यासा ग्रुपमध्ये महाअंतिम लढत रंगली. अटीतटीच्या या लढतीत सांगलीच्या लोककलेचे शिलेदार ग्रुपने बाजी मारत विजेतेपदावर मोहोर उमटवली. तर उपविजेता ठरला मुंबईचा राम पंडीत. जिग्यासा ग्रुपने तृतीय क्रमांक पटकावला तर संगमनेरच्या वर्षा एखंडेला उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल गौरवण्यात आलं. लोककलेचे शिलेदार या विजेत्या ग्रुपला तीन लाख आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं. या कार्यक्रमांचं वेगळेपण म्हणजे लोककला, शास्त्रीय संगीत, ग्रुप सॉंग अशी संगीतातली विविधता या मंचावर पाहायला मिळाली.

विजेतेपदाचा आनंद व्यक्त करताना हा दिवस स्वप्नवत असल्याची भावना लोककलेचे शिलेदार ग्रुपने व्यक्त केली. “जिंकल्याचा आनंद तर नक्कीच आहे मात्र ही लोककला महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचावी ही इच्छा होती. स्टार प्रवाहच्या मी होणार सुपरस्टार आवाज कुणाचा महाराष्ट्राचा कार्यक्रमामुळे हे शक्य झालं. या मंचाने खूप गोष्टी शिकवल्या. पारंपारिकतेला आधुनिकतेची जोड देत आम्ही नवनवे प्रयोग केले. सलील कुलकर्णी, आदर्श शिंदे, बेला शेंडे यांसारखे गुरु लाभले याचा अतिशय आनंद आणि अभिमान आहे,” अशी भावना लोककलेचे शिलेदार ग्रुपची प्रतिनिधी माधवी माळीने व्यक्त केली.’

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

लोककलेचे शिलेदार जरी या पर्वाचे विजेते असले तरी महाअंतिम फेरीतील सर्वच स्पर्धकांनी या पर्वात आपली चमकदार कामगिरी दाखवली आहे. या सर्व स्पर्धकांच्या पुढील वाटचालीसाठी नेटकऱ्यांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सलील कुलकर्णी, बेला शेंडे, आदर्श शिंदे यांनी या कार्यक्रमाच्या परीक्षणाची धुरा सांभाळली. तर अभिनेता पुष्कर श्रोत्री याने सूत्रसंचालनाची भूमिका पार पाडली. या कार्यक्रमाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवड चाचणी घेण्यात आली. या निवड चाचणीलाही भरघोस प्रतिसाद मिळाला होता. महाराष्ट्राभरातून आधी 71 स्पर्धकांची निवड करण्यात आली. या 71 जणांमधून 26 स्पर्धक मेगा ऑडिशनसाठी निवडण्यात आले होते. त्यापैकी आता दोन सर्वोत्तम गायक आणि दोन ग्रुप्सनी आता महाअंतिम फेरी गाठली होती.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...