AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्यापेक्षा बंद करा मालिका’; ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील ट्विस्टवर भडकले नेटकरी

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेच्या कथानकात मोठा ट्विस्ट प्रेक्षकांना पहायला मिळाला. आता गौरीसारखी हुबेहूब दिसणारी व्यक्ती शिर्केपाटील कुटुंबात दाखल झाली आहे.

'त्यापेक्षा बंद करा मालिका'; 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील ट्विस्टवर भडकले नेटकरी
Sukh Mhanje Nakki Kay Asta actress Girija PrabhuImage Credit source: Tv9
| Updated on: Mar 04, 2022 | 1:47 PM
Share

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेच्या कथानकात मोठा ट्विस्ट प्रेक्षकांना पहायला मिळाला. जयदीपने गौरीला (Gauri) कड्यावरून ढकलून दिल्यानंतर तिने या जगाचा निरोप घेतला असं वाटत असतानाच आता गौरीसारखी हुबेहूब दिसणारी व्यक्ती शिर्केपाटील कुटुंबात दाखल झाली आहे. ती गौरीसारखी दिसत असली तरी तिचा अंदाज मात्र निराळा आहे. गौरी साधीभोळी असली तरी ही पाहुणी मात्र अरे ला कारे करणारी आहे. आता ही नवीन पाहुणी गौरीच्या जीवावर उठलेल्या प्रत्येकाला पळता भुई थोडं करणार आहे. नव्या गौरीचा लूक आणि मालिकेचा नवीन प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. मात्र मालिकेच्या कथानकातील या ट्विस्टमुळे प्रेक्षक नाराज झाले आहेत. अनेकांनी गौरीच्या नव्या लूकला ट्रोल केलं असून काहींनी थेट मालिकाच बंद करण्याची मागणी केली आहे.

नेटकऱ्यांची गौरीच्या या नव्या लूकची तुलना आलिया भटट्च्या ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटातील लूकशी केली आहे. ‘गौराबाई काठियावाडी’ अशी कमेंट नेटकऱ्यांनी केली आहे. एकाने मालिकेच्या स्क्रिप्टबाबत मोठी कमेंट केली. ‘हा कार्यक्रम आम्ही खूप दिवसांपासून न चुकता पाहतोय. आवडतोय पण, सध्या कार्यक्रमाची स्क्रिप्ट कुठे तरी गडबडली आहे असं वाटत आहे. उगाच काहीपण सुरू केलं आहे. अख्खा इंटरेस्ट निघून गेला आहे’, असं त्यात लिहिलं आहे. ‘एवढी फालतूगिरी एका कुटुंबात होऊ शकते का’, असाही प्रश्न संतप्त नेटकऱ्याने उपस्थित केला आहे. एका युजरने गौरीच्या लूकवरून निर्मात्यांना प्रश्न विचारला आहे. “गौरीचा लूक मालिकेत नेमका किती वेळा बदलणार आहात”, असं त्याने म्हटलंय.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

या मालिकेत अभिनेत्री गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव मुख्य भूमिका साकारत आहेत. आपण आई-बाबा होऊ शकणार नाही ही गोष्ट लक्षात येताच जयदीप गौरीने सरोगसीद्वारे मुलाला जन्म देण्याचं ठरवलं. यासाठी मानसीने पुढाकारही दाखवला. मात्र मानसीचा खरा डाव गौरीला समजतो. गौरी आई होऊ शकत नाही असे खोटे रिपोर्ट्स मानसीने शालिनीच्या मदतीने तयार केले. गौरीसमोर हे सारं सत्य उघड झालं. शालिनी आणि मानसीचं षडयंत्र गौरी जयदीपला सांगण्याचा प्रयत्न करत असताना त्याने मात्र तिचं म्हणणं ऐकून न घेता तिला उंच कड्यावरून ढकलून दिलं आहे.

हेही वाचा :

नागराजमुळे त्या पठ्ठ्याचं आयुष्यच बदललं; 20 वर्षीय मुलाचं स्वप्न साकार

‘अमिताभ बोलतो का रे सेटवर, समोरच्याला घाबरवत असेल ना तो’; किशोर कदम म्हणतात..

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून परीने का घेतला ब्रेक? अखेर कारण आलं समोर

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.