Mithun Chakraborty : ‘चीकू की मम्मी दूर की’ मधील मिथुन चक्रवर्तींशी संबंधित ही बातमी तुम्हाला नक्कीच देईल आश्चर्याचा धक्का!

या दिग्गज अभिनेत्याने या मालिकेच्या प्रोमोचा भाग होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्यांचे वैयक्तिक स्वरूप. मिथुन दांच्या स्ट्रगलप्रमाणेच मेहनत आणि यश मिळवण्याची इच्छा असलेल्या चीकूच्या संघर्षमय प्रवासाचं वर्णन या मालिकेत आहे. (This news related to Mithun Chakraborty in 'Chiku Ki Mummy Door Kei' will definitely give you a shock!)

Mithun Chakraborty : 'चीकू की मम्मी दूर की' मधील मिथुन चक्रवर्तींशी संबंधित ही बातमी तुम्हाला नक्कीच देईल आश्चर्याचा धक्का!

मुंबई : ‘चीकू की मम्मी दूर की’ (Chikoo Ki Mummy Durr Kei ) या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाल्यापासून, चाहते स्टार प्लसच्या (Star Plus) या नवीन मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत. सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांच्यासोबत अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या या मालिकेच्या प्रोमोनं मालिकेबाबत सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.

आपण सगळेच या गोष्टीशी सहमत होवू की, मोठे मोठे अभिनेते सहसा चित्रपट किंवा इतर प्रकल्पांमध्ये अतिशय व्यस्त असतात आणि ते त्याच्यासाठी मानधन म्हणून भली मोठी रक्कम आकारत असतात. मात्र, कधीकधी ते त्यांच्या मानधनात मोठ्या प्रमाणात कपात देखील करतात, विशेषत: एखादा प्रकल्प जेव्हा त्यांच्या हृदयाच्या जवळ असेल किंवा ते त्याच्याशी भावनिकरित्या जोडले गेलेले असतील. याचं ताजं उदाहरण म्हणजे प्रसिद्ध डिस्को डान्सर मिथुन चक्रवर्ती.

प्रसिद्ध डिस्को डान्सर मिथुन चक्रवर्ती यांना त्यांच्या रोलर-कोस्टर प्रवासाचा फ्लॅशबॅक

मिथुन चक्रवर्ती, जे नुकतंच ‘चीकू की मम्मी दूर की’ च्या नव्या प्रोमोमध्ये दिसले आणि त्यांच्या सहभागानं त्यांनी आपल्या चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं. मालिकेच्या नजीकच्या सूत्राच्या म्हणण्यानुसार, “प्रोमोची स्क्रिप्ट वाचल्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांना त्यांच्या रोलर-कोस्टर प्रवासाच्या फ्लॅशबॅकची आठवण झाली. ते चीकूशी खूप भावनिकपणे जोडले गेले असल्याचं त्यांना जाणवलं आणि याच वैयक्तिक कारणास्तव त्यांनी या प्रोमोसाठी आपल्या मानधनात कपात करण्याचा निर्णय घेतला. मिथुन सर हे असेच प्रकल्प करण्यासाठी ओळखले जातात ज्यांच्याशी ते भावनिकरीत्या खरोखर जोडलेले असतात आणि या प्रोमोसाठी त्यांनी घेतलेला निर्णय हा खरोखर उदार भाव आहे.”

या दिग्गज अभिनेत्याने या मालिकेच्या प्रोमोचा भाग होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्यांचे वैयक्तिक स्वरूप. मिथुन दांच्या स्ट्रगलप्रमाणेच मेहनत आणि यश मिळवण्याची इच्छा असलेल्या चीकूच्या संघर्षमय प्रवासाचं वर्णन या मालिकेत आहे.

‘चिकू की मम्मी दूर की’ मालिकेसाठी ‘मम्मी’ची खास तयारी

मालिकांचे अनेक प्रोमो आपण पाहिले आहेत, पण अलीकडच्या ‘चिकू की मम्मी दूर की’च्या प्रोमोमध्ये लिजेंड मिथुन चक्रवर्ती यांच्या उपस्थितीमुळे चार चांद लागले असून प्रेक्षक आता चीकू आणि त्याची आई पुन्हा एकत्र कसे येतील याबद्दल अंदाज बांधत आहेत. या मालिकेत परिधी शर्मा आईची भूमिका साकारताना दिसणार आहे आणि नेहमीप्रमाणे, ती तिचे ऑन-स्क्रीन पात्र नुपूर साकारण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे.

Chikoo Ki Mummy Durr Kei 

परिधीचे या मालिकेसोबत वेगळे नाते आहे कारण ती एक रिअल लाईफ आई देखील आहे. चाहत्यांना तिचे हे रूप नक्कीच आवडेल कारण तिने या भूमिकेच्या तयारीसाठी कोणतीही कसर सोडलेली नाही. तिच्या व्यक्तिरेखेच्या तयारीबद्दल विस्ताराने, सांगताना परिधीने स्पष्ट केले की, “या भूमिकेसाठी शास्त्रीय नृत्य शिकणे माझ्यासाठी एक कठीण पाऊल होते! विशेषतः मुद्रा. कारण त्यात तुम्ही चूक करूच शकत नाही. आणि यासाठी माझ्या बालपणातील मेंटरचे मी आभार मानते. जी माझी तारणहार बनली आणि मला योग्य मुद्रांसह उत्कृष्ट शास्त्रीय नृत्य करण्याचा आत्मविश्वास दिला. तिच्या माझ्यावरील विश्वासाने मला माझ्या मुलीबरोबर शास्त्रीय नृत्याचा सराव करण्यास प्रोत्साहित केले. मी खरोखरच धन्य झाले आहे आणि आमच्या ‘चीकू की मम्मी दूर की’ या मालिकेबाबतच्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आतुर आहे.”

संबंधित बातम्या

Money Heist | अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर अल्वारोला मिळाली ‘प्रोफेसर’ची भूमिका, जाणून घ्या अभिनेत्याच्या खास गोष्टी

Nora Fatehi : ब्लॅक ड्रेस अँड क्लासी लूक, नोराचा तोरा पाहून फॅन्स म्हणाले, ब्लॅक क्वीन!

साहस को सलाम; ‘मुंबई डायरी 26/11’च्या रिलीजच्या आधी मोहित रैनाकडून फ्रंटलाईन कामगारांना काव्यात्मक श्रद्धांजली

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI