AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणात शीजान खान याच्या वकिलाने केले अभिनेत्रीच्या मामावर गंभीर आरोप

तुनिशा शर्मा हिने आत्महत्या करण्याच्या 15 दिवस अगोदरच शीजान आणि तुनिशा यांच्यामध्ये ब्रेकअप झाले होते. यामुळेच तुनिशा तणावामध्ये होती.

तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणात शीजान खान याच्या वकिलाने केले अभिनेत्रीच्या मामावर गंभीर आरोप
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 01, 2023 | 3:31 PM
Share

मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर अभिनेता शीजान खान याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. तुनिशा शर्मा हिचे मामा पवन शर्मा यांनी तर हे सर्व प्रकरण लव्ह जिहादचे असल्याचे म्हटले होते. आता शीजान खान याच्या वकिलाने तर थेट तुनिशा शर्मा हिच्या मामावरच अनेक आरोप केले आहेत. तुनिशाच्या आत्महत्येनंतर आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले. 24 डिसेंबरला मालिकेच्या सेटवर गळफास घेत तुनिशा शर्मा हिने आत्महत्या केली. तुनिशा आणि शीजान खान हे एकाच मालिकेत काम करत होते आणि दोघे रिलेशनशिपमध्ये देखील होते.

तुनिशा शर्मा हिने आत्महत्या करण्याच्या 15 दिवस अगोदरच शीजान आणि तुनिशा यांच्यामध्ये ब्रेकअप झाले होते. यामुळेच तुनिशा तणावामध्ये होती. तुनिशाच्या आत्महत्येनंतर तुनिशाच्या आईने शीजान खान याच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

काल शीजान खान याच्या बहिणीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हे कलियुग असल्याचे म्हटले होते. आता शीजान खान याच्या वकिलाने देखील तुनिशा शर्माच्या मामावर आणि आईवर मोठे आरोप केले आहेत.

शीजान खान याच्या वकिलाने म्हटले की, शीजान खान याने कोणताच गुन्हा केला नाहीये. तरीही तो आज जेलमध्ये आहे. तपास यंत्रनेला चुकीच्या गोष्टी सांगितल्या जात आहेत. काहीही गुन्हा नसताना आज शीजान जेलमध्ये आहे.

यासर्व गोष्टींमुळे शीजान खान हा आत्महत्या देखील करू शकतो. ज्या मुलाने त्याच्या आयुष्यामध्ये कधी पोलिस स्टेशन आणि न्यायालय बघितले नव्हते तो थेट आता जेलमध्ये आहे.

पवन शर्मा हे या प्रकरणात धर्म घेऊन आले आहेत. मुळात म्हणजे पवन शर्मा हे तुनिशाचे मामाच नाहीयेत. त्यांचे आणि तुनिशाच्या कुटुंबाचे काहीच नाते नाहीये. आम्ही सोमवारी एक पत्रकार परिषद घेऊन यासर्व गोष्टींवर खुलासा करणार आहोत.

शीजान खान हा तुनिशा शर्मा हिला दबाव आणून दरगाहमध्ये घेऊन जात होता असे सांगितले जात आहे. परंतू मुळात म्हणजे शीजान खान हाच कधी दरग्यामध्ये जात नव्हता, तो तुनिशाला घेऊन जाण्याचा संबंधच येत नाही.

तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणात काहीच गुन्हा केलेला नसताना देखील जेलमध्ये राहवे लागत असल्याने शीजान खान याची मानसिक स्थिती चांगली नसल्याचे देखील वकिलांनी म्हटले आहे.

तुनिशाच्या आईने केलेल्या गंभीर आरोपांनंतर आता शीजान खान याच्या कुटुंबियांनी देखील पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. आता उद्या पत्रकार परिषदेमध्ये काय खुलासे होतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?