AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tunisha Sharma Funeral | आत्महत्येच्या तीन दिवसांनी तुनिषा शर्मावर अंत्यसंस्कार, लेकीला पाहून आई…

तुनिशा हिच्या अंत्यसंस्कारसाठी शीजान खान याचे कुटुंबिय देखील पोहचले होते. यावेळी शीजानची आई आणि बहिणी देखील रडताना दिसल्या.

Tunisha Sharma Funeral | आत्महत्येच्या तीन दिवसांनी तुनिषा शर्मावर अंत्यसंस्कार, लेकीला पाहून आई...
| Updated on: Dec 27, 2022 | 6:18 PM
Share

मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा हिने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरूवात केली. अत्यंत कमी वेळामध्ये तुनिशा शर्मा हिने एक खास ओळख टीव्ही इंडस्ट्रीमध्ये निर्माण केली. परंतू कोणालाच वाटले नाही की, तुनिशा ही वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी अशाप्रकारे जगाचा निरोप घेईल. तुनिशा हिच्या जाण्याने अनेकांनाच मोठा धक्का बसला आहे. आत्महत्येच्या तीन दिवसानंतर आज मुंबईमधील भाईंदर पूर्वकडील स्मशान भूमीमध्ये तुनिशा शर्माच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तुनिशा हिचे नातेवाईक आणि मित्र परिवार उपस्थित होता.

तुनिशा हिच्या अशाप्रकारे जाण्याने तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तुनिशा हिने 24 डिसेंबरला दास्तान-ए-काबुल मालिकेच्या सेटवर मेकअप रूममध्ये गळफास घेत आत्महत्या केली होती.

तुनिशा हिच्या अंत्यसंस्कारसाठी शीजान खान याचे कुटुंबिय देखील पोहचले होते. यावेळी शीजानची आई आणि बहिणी देखील रडताना दिसल्या. तुनिशाच्या आत्महत्येनंतर शीजानवर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आलेत.

तुनिशा शर्मा हिच्या आईच्या डोळ्यातील अश्रू थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. इतकेच नाहीतर मुलीच्या अंत्यसंस्कारवेळी तुनिशाची आई बेशुध्द झाली. यावेळी सर्वांच्याच डोळ्यांमधून अश्रू येत होते.

मुलीच्या अशाप्रकारे जाण्याने तुनिशाची आई पुर्णपणे तुटलेली दिसत आहे. शीजानसोबत आपले ब्रेकअप झाल्याचे काही दिवसांपूर्वीच तुनिशा शर्मा हिने तिच्या आईला सांगितले होते. ब्रेकअपमुळेच तुनिशा ही तणावात होती, असे सांगितले जात आहे.

तुनिशा शर्मा आणि शीजान खान यांची मैत्री दास्तान-ए-काबुल मालिकेच्या सेटवर झाली होती. त्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमामध्ये झाले. परंतू पंधरा दिवसांपूर्वीच ब्रेकअप झाले होते. ब्रेकअपमुळेच तुनिशा ही तणावामध्ये होती आणि यामध्ये तिने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.

तुनिशा शर्मा हिच्या जवळच्या नातेवाईकांनी सांगितले की, तुनिशा हिने आईला तिला धोका मिळाला असल्याचे सांगितले होते. अशी एक चर्चा आहे की, शीजान हा दुसऱ्या मुलीसोबत रिलेशनमध्ये होता, जे तुनिशा हिला कळाले होते.

तुनिशाच्या आत्महत्येनंतर तुनिशाच्या आईने शीजानवर अनेक गंभीर आरोप केले असून पोलिसांनी शीजानला अटक केलीये. आता सध्या तो कोठडीमध्ये आहे. त्याचा फोनही पोलिसांनी जप्त केला आहे.

28 डिसेंबरपर्यंत शीजान खान हा कोठडीमध्ये असणार आहे. पोलिस सध्या शीजानची चाैकशी करत आहेत. या प्रकरणात अजून काही महत्वाचे खुलासे होण्याची दाट शक्यता देखील आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?