AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uorfi Javed | उर्फी जावेद हिची मोठी पलटी, या बाॅलिवूड अभिनेत्याला घाबरते फॅशन क्वीन?, अभिनेत्रीने केला हा मोठा दावा

उर्फी जावेद ही तिच्या फॅनमुळे चर्चेत असते. उर्फी जावेद ही कधी कोणते कपडे घालेल याचा अजिबात नेम नाही. उर्फी जावेद हिच्यावर अनेकदा तिच्या कपड्यांमुळे टिका केली जाते. मात्र, टिका करणाऱ्यांकडे कायमच उर्फी जावेद ही दुर्लक्ष करते. यावेळी थोड्या वेगळ्या कारणामुळे उर्फी जावेद चर्चेत आहे.

Uorfi Javed | उर्फी जावेद हिची मोठी पलटी, या बाॅलिवूड अभिनेत्याला घाबरते फॅशन क्वीन?, अभिनेत्रीने केला हा मोठा दावा
| Updated on: Apr 11, 2023 | 2:58 PM
Share

मुंबई : उर्फी जावेद ही कायमच चर्चेत असते. आपल्या अतरंगी कपड्यांमुळे तिला खास ओळख मिळालीये. उर्फी जावेद (Uorfi Javed) हिने आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र, उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीपासूनच मिळालीये. उर्फी जावेद हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग (Fan following) सोशल मीडियावर बघायला मिळते. विशेष म्हणजे उर्फी जावेद ही कायम आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर खास फोटो (Photo) शेअर करताना देखील दिसते. काही दिवसांपूर्वी उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे थेट बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी ही देण्यात आली होती. त्यानंतर त्या व्यक्तीला पोलिसांनी बिहारमधून अटक केली.

काही दिवसांपूर्वी रणबीर कपूर याने उर्फी जावेद हिच्याबद्दल धक्कादायक विधान केले होते. रणबीर कपूर याने उर्फी जावेद हिला बॅड टेस्ट असल्याचे म्हटले होते. मात्र, दुसरीकडे करीना कपूर हिने उर्फी जावेद हिचे काैतुक केले होते. मुलाखतीमध्ये बोलताना उर्फी जावेद हिने देखील रणबीर कपूर याच्याबद्दल मोठे विधान केले.

एका मुलाखतीमध्ये उर्फी जावेद हिने थेट रणबीर कपूर याला भाडमध्ये जाण्याचे म्हटले होते. उर्फी जावेद म्हणाली होती की, करीना कपूर हिने माझे काैतुक केले आहे. बाकी रणबीर कपूर हा भाडमध्ये जावो…आता उर्फी जावेद हिने मोठी पलटी मारल्याचे दिसत आहे. कारण मी हे सर्व फक्त आणि फक्त मजाकमध्ये म्हटल्याचे उर्फी जावेद हिने म्हटले आहे.

उर्फी जावेद हिने नेमकी का पलटी मारली याची चर्चा रंगताना दिसत आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत उर्फी जावेद हिने आपण फक्त मजाक करत असल्याचे म्हटले आहे. यासोबतच उर्फी जावेद हिने अजून एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये. उर्फी जावेद हिची ही पोस्ट पाहून अनेकांना मोठा धक्का बसलाय.

उर्फी जावेद हिने इन्स्टा स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि म्हटले आहे की, माझ्या मजाकमुळे मला कधीतरी मारहाण होईल… एखाद्या दिवशी मला कोणीतरी मारेल…माझ्या कपड्यांमुळे किंवा माझ्या बोलण्यामुळे….आता उर्फी जावेद हिची ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. उर्फी जावेद हिला कोण मारहाण करणार यावरही जोरदार चर्चा रंगत आहे. आपल्याला मुंबईमध्ये कोणी घर देत नसल्याचे देखील उर्फी जावेद हिने स्पष्ट केले आहे.

Follow Us
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत...
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत राहुल गांधींचा धक्कादायक दावा
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे...
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे भोपाळ शहरात तणाव, नेमकं प्रकरण काय?
तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता विना परवाना शाळांमध्ये...
Tukaram Mundhe | तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता परवाना नसेल तर शाळांमध्ये अन्न पुरवठा करता येणार नाही; 50 मीटर परिसरात...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन म्हणत केलं वादग्रस्त वक्तव्य!
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside...
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside Story समोर
हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
Abhijeet Dipke | हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच अभिजीत दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट?दावा...
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट? दिल्लीतील हालचालीमागे... बड्या व्यक्तीच्या दाव्याने खळबळ
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... अभिजीत दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात...
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात घडामोडींना वेग