AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सूरज चव्हाणच्या आयुष्यातील खरा ‘बिग बॉस’ कोण?; अंकिताच्या व्हीडिओनंतर चाहत्यांना प्रश्न

Suraj Chavan Ankita Prabhu Walawalkar Dispute : 'बिग बॉस मराठी' चा विजेता आणि कोकण हार्टेड गर्ल- अंकिता प्रभू वालावलकर यांच्यात मागच्या काही दिवसांपासून सारं काही अलबेल नसल्याचं चित्र आहे. अशातच सूरज चव्हाणच्या आयुष्यातील खरा 'बिग बॉस' कोण? असा प्रश्न विचारला जात आहे. वाचा...

सूरज चव्हाणच्या आयुष्यातील खरा 'बिग बॉस' कोण?; अंकिताच्या व्हीडिओनंतर चाहत्यांना प्रश्न
सूरज चव्हाण, बिग बॉस मराठीचा विेजेताImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 14, 2024 | 12:02 PM
Share

घरात कुणीही उच्च शिक्षित नसताना, सिनेसृष्ठीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना बारामतीचा सूरज चव्हाण ‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोचा विजेता ठरला. त्याचा साधेपणा प्रेक्षकांना भावला. प्रेक्षकांनी त्याला भरघोस मतं देत रिअॅलिटी शोचा विजेता केलं.  ‘बिग बॉस मराठी’ संपल्यानंतर ‘बिग बॉस’मधील सदस्यांनी सूरजच्या घरी जात त्याची भेट घेतली. कोकण हार्टेड गर्ल- अंकिता प्रभू वालावलकर हिनेही सूरज चव्हाणच्या बारामतीतील घरी जात त्याची भेट घेतली. त्यानंतर अंकिताने काही फोटो आणि व्हीडिओ पोस्ट केले. त्यानंतर एका नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे.

अंकिता- सूरजची भेट

बारामतीतील मोढवे गावात जात अंकिताने सूरजची भेट घेतली. या भेटीचे फोटो अंकिताने इन्स्टाग्रामवर शेअर केले. या फोटोंचं तिने सूरजच्या अकाऊंटसोबतदेखील कोलॅब्रेशन केलं. मात्र नंतर काही तासांनी हे कोलॅब्रेशन सूरजच्या अकाऊंटवरून हटवण्यात आलं. ही बाब एका चाहत्याने अंकिताच्या लक्षात आणून दिली. मग थँक यू, तुम्ही ही गोष्ट लक्षात आणून दिली. पण एक शेवटचं सांगते सूरज त्याचं इन्स्टाग्राम अकाऊंट हँडल करत नाही. सूरजच्या आजूबाजूला त्यांना मी नको असल्या कारणास्तव मी ह्यातून काढता पाय घेत आहे. यापुढे माझ्याकडून अपेक्षा नसाव्यात, धन्यवाद, असं अंकिता वालावलकर म्हणाली. त्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं.

अंकिता काय म्हणाली?

अंकिताने तिच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हीडिओ शेअर केला आहे. यातून तिने काही मुद्द्यांवर प्रकाश टाकला आहे. सूरज खूप भोळा आहे आणि त्याच्या आजूबाजूचे लोक या भोळेपणाचा फायदा घेत आहेत. तो गणपतीच्या मूर्तीच्या मातीसारखा आहे. त्याला जसा आकार द्याल तसा तो घडेल. तो स्वत:चं मत मांडत नाही. त्याच्या आजूबाजूचे लोक चुकीच्या पद्धतीने त्याला मार्गदर्शन करत आहेत. कारण ते त्यांच्या पद्धतीने त्याला मार्गदर्शन करत आहेत. त्याला मोबाईल दुसऱ्या व्यक्तीकडे असतो, तिसरी व्यक्ती त्यावर व्हीडीओ एडिट करत असते, असं अंकिताने म्हटलं आहे.

सूरजचा खरा ‘बिग बॉस’ कोण?

अंकिता वालवलकरने हा व्हीडिओ शेअर केल्यानंतर आता सूरजबद्दल सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळतेय. सूरज चव्हाणच्या आयुष्यातील खरा ‘बिग बॉस’ कोण? त्याचं इन्स्टग्राम अकाऊंट, त्याचा सोशल मीडिया कोण हँडल करतं? त्याच्या साधेपणाचा फायदा नेमकं कोण घेत आहे? असा सवाल नेटकरी सोशल मीडियावर विचारत आहेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.