AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यापुढे माझ्याकडून अपेक्षा नसाव्यात…; अखेर अंकिताने तोडले सूरजसोबतचे सर्व संबंध?

Ankita Prabhu Walawalkar and Suraj Chavan Dispute : कोकण हार्टेड गर्ल आणि सूरज चव्हाण यांच्यात वाद निर्माण झाला आहे. दोन दिवसांआधी अंकिता वालवलकर सूरज चव्हाणला भेटायला गेली होती. त्यानंतर शेअर केलेल्या पोस्टमुळे या दोघांमध्ये मतभेद झालेत. वाचा सविस्तर....

यापुढे माझ्याकडून अपेक्षा नसाव्यात...; अखेर अंकिताने तोडले सूरजसोबतचे सर्व संबंध?
अंकिता वालावलकर, सूरज चव्हाणImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 12, 2024 | 10:03 AM
Share

‘बिग बॉस मराठी’ मधील यंदाचा सिझन गाजला तो स्पर्धकांमुळे, त्यांच्यातील बॉन्डमुळे. ‘बिग बॉस’ संपल्यानंतरही हे स्पर्धक एकमेकांच्या संपर्कात असतात. ‘बिग बॉस’मधील हे स्पर्धक एकमेकांच्या भेटी घेताना दिसतात. नुकतंच ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालवलकर हिने ‘बिग बॉस मराठी’चा विजेता सूरज चव्हाण याच्या बारामतीतील मोढवे गावातील घरी जात त्याची भेट घेतली. त्यानंतर अंकिताने सूरज आणि त्याच्या कुटुंबियांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. पण इन्स्टाग्रामवर या भेटीचे फोटो शेअर करण्यात आल्यानंतर अंकिता आणि सूरज यांच्यात वाद निर्माण झाला आहे.

अंकिता आणि सूरजची भेट

अंकिता वालावलकर तिचा होणारा पती संगीतकार कुणाल भगतसोबत बारामतीतील सूरज चव्हाणच्या घरी गेली. तिथे जात अंकिता सूरज आणि त्याच्या कुटुंबियांना भेटली. तेव्हा साधेपणाने चव्हाण कुटुबियांनी अंकिताचं स्वागत केलं. बाजरीची भाकरी, बटाट्याची भाजी, ठेचा असं साधं जेवण सूरजच्या घरच्यांनी अंकितासाठी बनवलं होतं. या भेटीचे फोटो अंकिताने इन्स्टाग्रामवर शेअर केले. यावेळी तिने सूरज चव्हाणसोबत इन्स्ट्राग्राम कोलॅब्रेशन केलं. तेव्हा सूरजने ते अॅक्सेप्ट केलं. पण नंतर मात्र अंकिताची पोस्ट सूरजच्या अकाऊंटवर दिसणं बंद झालं. ही गोष्ट अंकिताच्या चाहत्यांनी तिच्या लक्षात आणून दिली.

अंकिता काय म्हणाली?

12 तासांच्या आत अंकिताची पोस्ट सूरजच्या अकाऊंटवरून रिमुव्ह करण्यात आलीय, अशी कमेंट अंकिताच्या पोस्टवर तिच्या चाहत्याने केली. यावर अंकितानेही प्रतिक्रिया दिली आहे. थँक यू, तुम्ही ही गोष्ट लक्षात आणून दिली. पण एक शेवटचं सांगते सूरज त्याचं इन्स्टाग्राम अकाऊंट हँडल करत नाही. सूरजच्या आजूबाजूला त्यांना मी नको असल्या कारणास्तव मी ह्यातून काढता पाय घेत आहे. यापुढे माझ्याकडून अपेक्षा नसाव्यात, धन्यवाद, असं अंकिता म्हणाली आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरात असताना चांगले मित्र असणारे अंकिता आणि सूरज यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आहे.

बिग बॉसच्या घरात असताना सूरज आणि अंकिता हे दोघे एकमेकांसोबत पाहायला मिळाले. अंकिता सूरजला तिचा भाऊ मानत होती. या दोघांनी हे बहीण भावाचं नातं बिग बॉसच्या संपल्यानंतरही या दोघांनी हे नातं जपलं. सूरजच्या वाढदिवसाला अंकिताने व्हीडिओ कॉल केला होता. त्याचा व्हीडिओ तिने इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केला होता. पण तेव्हाही अनेकदा फोन करून देखील त्याच्या आजूबाजूचे लोक सूरजशी बोलणं होऊ देत नाहीत, अशी तक्रार अंकिताने सूरजकडे केली होती.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.