AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘धर्मेंद्र ज्या प्रकारे डोक्यावर हात ठेवतात, वाटतं…’ क्रिती सनॉन हिचं मोठं वक्तव्य

Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya : अभिनेत्री क्रिती सनॉन हिने अनेक सेलिब्रिटींसोबत स्क्रिन शेअर केली आहे. अभिनेत्री लवकरच 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. त्याआधी क्रिती हिने अभिनेते धर्मेंद्र यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त क्रिती हिची चर्चा...

'धर्मेंद्र ज्या प्रकारे डोक्यावर हात ठेवतात, वाटतं...' क्रिती सनॉन हिचं मोठं वक्तव्य
| Updated on: Feb 02, 2024 | 9:39 AM
Share

मुंबई | 2 फेब्रुवारी 2024 : अभिनेत्री क्रिती सनॉन हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन करतात. क्रिती हिला ‘मिमी’ सिनेमासाठी सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळाला. क्रिती सध्या तिचा आगामी ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ सिनेमामुळे चर्चेत आहे. क्रिती सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सिनेमात अभिनेते धर्मेंद्र देखील मुख्य भूमिकेत आहेत. दरम्यान, क्रिती हिने धर्मेंद्र यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त क्रिती आणि तिने धर्मेंद्र यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत क्रिती हिला धर्मेंद्र यांच्यासोबत काम करताना आलेल्या अनुभवाबद्दल विचारण्यात आलं. अभिनेत्री म्हणाली, ‘धर्मेंद्रजी प्रचंड उत्तम व्यक्ती आहेत. ते ज्याप्रमाणे प्रेमाने भेटतात आणि प्रेमाने डोक्यावर हात ठेवतात, एक प्रकारचा आपलेपणा वाटतो.. शुटिंगमध्ये जेव्हा ते चांगले कपडे घालतात, तेव्हा स्वतःचे अनेक फोटो काढतात आणि त्यांच्या मुलांना पाठवतात…’

पुढे क्रिती म्हणाली, ‘धर्मेंद्र यांच्या फोटोवर त्यांची मुलं देखील प्रतिक्रिया देतात… बाबा तुम्ही किती छान दिसता… अशी कमेंट धर्मेंद्र यांची मुलं वडिलांच्या फोटोवर करतात. धर्मेंद्र त्यांच्या कुटुंबाच्या फार जवळ आहेत… ते कायम लोकांमध्ये प्रेम वाटत असतात. सिनेमात डिंपल आणि शाहिद कपूर याच्यासोबत अधिक सीन आहेत. धर्मेंद्र यांच्यासोबत अधिक सीन नाहीत…’ सध्या सर्वत्र क्रिती हिची चर्चा रंगली आहे.

‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ सिनेमात धर्मेंद्र आणि क्रिती यांच्यासोबत अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री डिंपल कपाडिया देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. सिनेमात क्रिती एका रोबॉटच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमा 9 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चाहते देखील सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.

क्रिती कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. ‘आदिपुरुष’ आणि ‘गणपत’ सिनेमा फ्लॉप ठरल्यानंतर अभिनेत्रीचा आगामी सिनेमा प्रेक्षकांना आवडतो की नाही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

क्रिती सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांना सांगत असते.

Follow Us
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला...
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला....
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर...
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर....
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video.
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव....
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार.
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?.
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल.....
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल......
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ..
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ...
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार.
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको.