शहीदाची लेक प्रसिद्ध अभिनेत्री; म्हणते, दहशतवाद्यांनी माझ्या वडिलांचं अपहरण केलं आणि…

दहशतवाद्यांनी मझ्या वडिलांचं अपहरण केलं आणि..., देशासाठी शहीद झालेल्या वडिलांच्या आठवणी सांगत अभिनेत्री भावूक, 12 वर्षांची असताना हरपलं वडिलांचा छत्र

शहीदाची लेक प्रसिद्ध अभिनेत्री; म्हणते, दहशतवाद्यांनी माझ्या वडिलांचं अपहरण केलं आणि...
| Updated on: May 11, 2025 | 9:06 AM

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहे, ज्यांचे वडील देशासाठी लढले आहेत. तर काहींनी देशासाठी आपले प्राण देखील दिले आहेत. अशाच अभिनेत्रीपैकी एक म्हणजे अभिनेत्री निमरत कौर. निमरत हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. निमरत हिचा जन्म राजस्थान येथील एका शीख कुटुंबात झाला. निमरत शहीद भुपेंद्र सिंग यांची लेक आहे. अभिनेत्री फक्त 12 वर्षांची असताना तिचे वडील देशासाठी शहीद झाले.

सांगायचं झालं तर, 1994 मध्ये झालेल्या युद्धात काश्मीर येथे दहशतवाद्यांनी भुपेंद्र सिंग यांचं अपहरण केलं आणि त्यांची हत्या केली. तेव्हा निमरत फक्त 12 वर्षांची होती. एका मुलाखतीत निमरत हिने वडिलांबद्दल भावना व्यक्त केल्या होत्या. शिवाय शहीद वडिलांचा पार्थीव कधी पाहिलं यावर देखील अभिनेत्रीने मोठा खुलासा केलेला.

वडिलांबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘ते एक यंग आर्मी मेजर होते. एक इंजिनियर होते, जे वेरीगान याठिकाणी देशासाठी तैनात होते. काश्मीरमध्ये आमचं घर नव्हतं. त्यामुळे वडील जेव्हा काश्मीरमध्ये गेले तेव्हा आम्ही पटियाला येथेच होतो. 1994 मध्ये सुट्ट्या होत्या म्हणून आम्ही वडिलांना भेटण्यासाठी काश्मीरला गेलो.’

 

 

‘तेव्हा दहशतवादी हिज्ब-उल-मुजाहिदीनने माझ्या वडिलांचं अपहरण केलं होतं. जवळपास 1 आठवडा त्यांना बंदी करून ठेवलं. वडिलांच्या सोडण्याच्या बदल्यात दहशतवाद्यांची त्यांच्या काही सहकार्यांना सोडण्याची मागणी केली. पण त्यांनी मागणी मान्य केली नाही. ज्यामुळे दहशतवाद्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली.’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘वडील शहीद झाले तेव्हा ते फक्त 44 वर्षांचे होते. आम्ही त्यांच्या मृतदेहासोबत दिल्लीत आलो. तेव्हा मी पहिल्यांचा माझ्या वडिलांचा मृतदेह दिल्लीत पाहिला. वडिलांनंतर आमचं आयुष्य एका रात्रीत बदललं. पण कठीण काळात भारतीय सेना आमच्यासोबत होती.’ सध्या सर्वत्र निमरत कौर हिची चर्चा सुरु आहे.

निमरत कौर हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने आतापर्यंत अनेक वेबसीरिज आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण ‘लंचबॉक्स’मुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीत मोठी वाढ झाली. निमरत हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.