25 वर्षापूर्वीचं स्वप्न पूर्ण झालंय… उमेश कुमावत यांच्या ‘थक गया मैं साला’ची तरुणाईंमध्ये क्रेझ

थक गया मैं साला हे गाणे धमाका करताना दिसतंय. या गाण्याची तरूणाईमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळतंय. विशेष म्हणजे हे एक ब्रेकअप साँग आहे. या गाण्याने धमाका करण्यास सुरूवात केलीये. अत्यंत खास असे हे रॅप साँग आहे.

25 वर्षापूर्वीचं स्वप्न पूर्ण झालंय... उमेश कुमावत यांच्या थक गया मैं सालाची तरुणाईंमध्ये क्रेझ
| Edited By: | Updated on: Feb 11, 2024 | 4:34 PM

मुंबई : tv9 मराठीचे संपादक उमेश कुमावत यांचे रॅप साँग ‘थक गया मैं साला’ हे आज लॉन्च करण्यात आलंय. tv9 मराठीच्या कार्यालयात शानदार सोहळ्यात हे गाणं रिलीज करण्यात आलंय. या रॅप साँगसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या. हे गाणं युट्यूबवर रिलीज होताच त्यावर लाइक्सचा पाऊस पडत आहे. केवळ युट्यूबवरच नाही तर इतरही प्लॅटफॉर्मवर हे गाणं उपलब्ध असून जगभरात हे गाणं पाहता येणार आहे. हे गाणं रिलीज झाल्यानंतर 25 वर्षापूर्वी पाहिलेलं एक स्वप्न पूर्ण झालंय, असं गाण्याचे गीतकार, गायक, अभिनेते उमेश कुमावत यांनी सांगितलं.

उमेश कुमावत यांच्या गाण्याचा #TGMS हा हॅशटॅग म्हणजेच थक गया मैं साला. गाण्याच्या प्रॉड्यूसर उमेश कुमावत यांच्या पत्नी हिना कुमावत या आहेत. या रॅप साँग रिलीजच्या वेळी उमेश कुमावत यांनी त्यांच्या भावना या मांडल्या. हे गाणं करण्यास उशीर झाला. आपलंही गाणं यावं हे माझं 25 वर्षांपूर्वीचं स्वप्न होतं. प्रत्येकाचा एक छंद असतो आणि तो छंद प्रत्येकाने जोपासायला हवा. हा माझा छंद होता. संगीत क्षेत्रात आपण काहीतरी करायला हवे. असं मनापासून वाटायचं. माझ्या काही जवळच्या मित्रांना ही इच्छा बोलूनही दाखवली होती. आज ती पूर्ण होत आहे, असं उमेश कुमावत म्हणाले.

गाण्यात तरुणाईंचं भावविश्व

चांगले आयुष्य जगण्यासाठी संगीताची गरज असते. थक गया मैं साला हे तरुणाईचं आहे. तरुण आणि तरुणींचं भावविश्व त्या अधोरेखित करण्यात आलं आहे. ब्रेकअप झाल्यानंतर त्यांना काय वाटतं, ते या गाण्यात आलं आहे. या गाण्यात त्यांच्या तक्रारी आहेत. मला खूप दिवसांपासून असे वाटत होते की, एक चांगल या रॅप साँग यावे. मी देखील गाणे बघत असतो. त्यामध्येच काहीतरी नवीन द्यावे ही माझी कल्पना होती. या गाण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांनी मेहनत घेतली आणि आज ते गाणं आलंय, अशी भावना उमेश कुमावत याांनी व्यक्त केली.

Umesh Kumawat

गाण्याचा किस्सा काय?

मुळात म्हणजे प्रत्येक तरुण- तरुणींमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने वाद होतात. तू तू मैं मैं होते. त्यावेळी दोघांपैकी एकाच्या ओठी एकच वाक्य असतं. ते म्हणजे थक गया मैं साला… तरुण सळसळत्या रक्ताचे असतात. अँग्री यंगपणा त्यांच्या रक्तातच असतो. अशावेळी ते जी उत्स्फूर्त प्रतिक्रिया देता ती म्हणजे थक गया मैं साला… हे वाक्य परवलीचं आहे. ते वाक्य मला क्लिक झालं आणि त्यातून गाणं सूचलं. व्हॅलेंटाईन डे तीन दिवसांवर आहे. अशावेळी तरुणाईसाठी हे गाणं येणं अत्यंत महत्त्वाचं आहे, असंही त्यांनी सांगितलं.

तेव्हा मित्राला म्हणालो अन्…

जेव्हा मी रिपोर्टिंग करत होतो, त्यावेळी माझे मित्र जितेंद्र दीक्षित यांना सांगत होतो की, मी नक्कीच माझे गाणे येऊन येईल. आज ते येऊन आलोय. मी माझी आवड जोपासली आणि आता ती पूर्ण होतेय, असंही त्यांनी सांगितलं. या नेत्रदीपक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदिका आणि टीव्ही9 च्या एडिटर अँकर निखिला म्हात्रे यांनी केलं. तर, ‘टीव्ही ९’ ग्रुपचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांच्या हस्ते या गाण्याचं लॉन्चिंग करण्यात आलं.