AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तरुणाईला वेड लावणारं ‘थक गया मैं साला…’ रॅप साँग रिलीज, उमेश कुमावत नव्या गाण्यावर दोन तासांत लाइक्सचा पाऊस

thak gaya mai sala | उमेश कुमावत यांचे 'थक गया मैं साला' हे गाणे लॉन्च झाल्यावर लाईकचा पाऊस पडला. अवघ्या दोन तासांत तीन हजारांपेक्षा जास्त जाणांनी लाईक केल्या. अनेकांनी आपल्या कॉमेंट व्यक्त केल्या. गाणे खूप जोरदार असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावरील युजर्सने दिल्या.

तरुणाईला वेड लावणारं 'थक गया मैं साला...' रॅप साँग रिलीज, उमेश कुमावत नव्या गाण्यावर दोन तासांत लाइक्सचा पाऊस
उमेश कुमावत यांचे 'थक गया मैं साला' हे रॅप साँग लॉन्च करताना 'टीव्ही ९' ग्रुपचे एमडी आणि सीईओ बरुण दास.Image Credit source: tv9 Marathi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Edited By: | Updated on: Feb 11, 2024 | 4:36 PM
Share

मुंबई, दि. 11 फेब्रुवारी 2024 | ‘टीव्ही ९ मराठी’चे संपादक उमेश कुमावत यांचे रॅप साँग शुक्रवारी (११ फेब्रुवारी) लॉन्च झाले. मुंबईत ‘टीव्ही ९ मराठी’च्या कार्यालयात ‘थक गया मैं साला’ हे गाणे उत्साहात लॉन्च करण्यात आले. ‘टीव्ही ९’ ग्रुपचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांनी हे गाणे लॉन्च केले. उमेश कुमावत यांच्या पत्नी हिना कुमावत या गाण्याच्या प्रॉड्यूसर आहेत. कार्यक्रमाला ‘टीव्ही ९ मराठी’चे सहकारी आणि उमेश कुमावत यांचा मित्र परिवार उपस्थित होता. उमेश कुमावत यांचे हे पहिले गाणे https://www.youtube.com/@umeshkumawatsong या युट्यूब चॅनलवर लॉन्च करण्यात आले आहे.

काय आहे हॅशटॅग #TGMS

उमेश कुमावत यांच्या गाण्याचा हॅशटॅग #TGMS आहे. म्हणजेच ‘थक गया मैं साला’ होय. रॅप साँग यंग जनरेशनचे गाणे असते. यंग जनरेशनचे रक्त गरम असते. यामुळे या जनरेशनचा शब्द ‘थक गया मैं साला’, असल्याचे उमेश कुमावत यांनी सांगितले. आजच्या युवक-युवतींच्या परिस्थितीपासून प्रेरणा घेऊन आपण हे गाणे लिहिले आहे. आता “व्हॅलेंटाईन डे” अवघ्या तीन दिवसांवर आला आहे. त्यापूर्वी हे ब्रेकअप साँग आले आहे. तरुण आणि तरुणींचं नातं आणि त्यांच्या भावभावनांवर हे गाणं आधारित आहे. गाण्याचे चित्रीकरण खंडाळा परिसरात झाले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी केले कौतूक

गाण्याच्या लॉन्चिंग प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांनी म्हटले की, बातमीदारी करताना आपला छंद जोपासणे गरजेचा आहे. उमेश कुमावत यांनी संपादकपदाची पदाची जबाबदारी सांभाळताना आपला छंद जोपासला. त्यांनी गाणे लिहिले. त्यात अभिनय केला. तसेच गाण्याचे गायकही तेच आहेत. मी उमेश कुमावत यांचे अभिनंदन करतो. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांना त्यासाठी मी शुभेच्छा देतो. त्यांनी स्वत:सोबत इतरांचे आयुष्य समुद्ध करावे, हीच सदिच्छा.

अनेक वर्षांची इच्छा पूर्ण – उमेश कुमावत

गाण्यासंदर्भात बोलताना उमेश कुमावत यांनी म्हटले की, २०-२५ वर्षांपासून गाणे लिहिणे हे माझे स्वप्न होते. ते पूर्ण झाले आहे. या गाण्यावर मागील वर्षांपासून काम सुरु केले होते. आज हे गाणे आल्यानंतर संगीत क्षेत्रात काम करण्याच्या माझ्या महत्वाकांक्षेला सुरुवात झाली आहे. नक्कीच हे गाणे येण्यास उशीर झाला, परंतु खूप दिवसांपासून असलेली इच्छा यानिमित्ताने पूर्ण झाली, असे उमेश कुमावत यांनी म्हटले.

Umesh Kumawat

Umesh Kumawat

दोन तासांत तीन हजार लाईक

उमेश कुमावत यांचे ‘थक गया मैं साला’ हे गाणे लॉन्च झाल्यावर लाईकचा पाऊस पडला. अवघ्या दोन तासांत तीन हजारांपेक्षा जास्त जाणांनी लाईक केल्या. अनेकांनी आपल्या कॉमेंट व्यक्त केल्या. गाणे खूप जोरदार असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावरील युजर्सने दिल्या.

Follow Us
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं