AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thalapathy Vijay : आईवडिलांच्या लग्नात 6 वर्षांचा थलपती विजय उपस्थित; हा फोटो पाहून म्हणाला..

Thalapathy Vijay : माजी अभिनेते थलपती विजय यांनी दोन वर्षांपूर्वी पक्षाची स्थापना केली आणि आज त्यांचा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. आता विजय यांच्या आईवडिलांच्या लग्नाचा एक फोटो व्हायरल होत आहे, जेव्हा विजय 6 वर्षांचे होते.

Thalapathy Vijay : आईवडिलांच्या लग्नात 6 वर्षांचा थलपती विजय उपस्थित; हा फोटो पाहून म्हणाला..
Thalapathy Vijay
| Updated on: May 05, 2026 | 12:06 PM
Share

तामिळनाडू येथे डीएमके आणि एआयडीएमके दबदबा होता, पण 4 मे रोजी लागलेल्या निकालात थलपती विजय यांचा TVK पक्ष मोठा ठरला आहे, जो फक्त दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेला. 107 जागांवर TVK पक्षाचा विजय झाला आहे. राजकारणात मोठी भरारी घेतल्यामुळे विजय यांच्या खासगी आयुष्याच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे… सध्या विजय यांच्या आई – वडिलांच्या लग्नातील एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विजय देखील उपस्थित होते आणि फक्त 6 वर्षांचे होते. जाणून घ्या विजय यांच्या आई – वडिलांच्या नात्याबद्दल…

दिग्दर्शक एस. ए. चंद्रशेखर आणि त्यांची पत्नी शोभा चंद्रशेखर यांच्या मुलाचं नाव थलपती विजय… हे नाव त्यांना तामिळच्या जनतेने प्रेमाने दिलं. वडील फिल्म इंडस्ट्रीमधील असल्यामुळे विजय यांनी लहानपणापासून सिनेमांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. विजय यांच्या वडिलांबद्दल सांगायचं झालं तर, ते प्रचंड महत्वकांशी होती. करियरच्या सुरुवातीला त्यांनी दिग्दर्शक राजेंद्र प्रसाद यांच्यासोबत सहाय्यक म्हणून काम केलं. तर विजय यांच्या आई लोकप्रिय गायिका होत्या. त्यांनी अनेक सिनेमांमध्ये देखील पार्श्वगायन केलं… अशात हळूहळू चंद्रशेखर आणि शोभा यांच्या प्रेम बहरलं.

एकदा चंद्रशेखर यांनी तामिळ अभिनेते शिवाजी गणेशन यांना मनातील भावना सांगितल्या आणि म्हणाले, ‘मला शोभा सोबत लग्न करायचं आहे.’ शिवाजी गणेशन आणि त्यांच्या कुटुंबियांनी देखील त्यांच्या नात्याचा स्वीकार केला. 1973 मध्ये चंद्रशेखर आणि शोभा यांनी कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न केलं आणि 1974 मध्ये थलपती विजय यांचा जन्म झाला.

सांगायचं झालं तर, चंद्रशेखर ख्रिश्चन होते, तर शोभा हिंदू होत्या. दोघांनी आंतरधर्मीय विवाह केला होता, पण धर्म त्यांच्या नात्यात कधीच आड आला नाही. रिपोर्टनुसार जेव्हा विजय सहा वर्षांचे झाले, तेव्हा शोभा यांच्या विनंतीवरून त्यांनी चर्चमध्ये दुसऱ्यांदा लग्न केलं. त्यावेळचा एक फोटो आजही सोशल मीडियावर व्हायरल होतो. या अनोख्या लग्नात त्यांचा मुलगा विजयदेखील उपस्थित होता.

आई – वडिलांप्रमाणे वियज यांनी देखील संगीता नावाच्या हिंदू मुलीसोबत लग्न केलं. त्यांच्या नात्यामध्ये देखील धर्म कधीच आहला नाही. पण 27 वर्षांनंतर विजय आणि संगीता यांच्या वैवाहिक आयुष्यात मोठं संकट आलं आहे… संगीता हिने कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. विजय यांचे दुसऱ्या महिलेसोबत अफेअर असल्याचं संगीता यांनी सांगितलं आहे. अशात राजकारणात यश मिळालं असलं तरी, विजय यांच्या खासगी आयुष्यात मोठं वादळ आलं आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी