तारक मेहता मालिकेच्या सेटवर नेमके काय घडायचे याबद्दल अभिनेत्रीने केला मोठा खुलासा, म्हणाली, सेटवर कधीच ‘हा’ प्रकार

तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. तारक मेहता मालिकेचे निर्माता असित कुमार मोदी हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. असित कुमार मोदी यांच्यावर अनेक अभिनेत्रींनी गंभीर आरोप हे केले आहेत. हे आरोप ऐकून अनेकांना मोठा धक्का बसलाय.

तारक मेहता मालिकेच्या सेटवर नेमके काय घडायचे याबद्दल अभिनेत्रीने केला मोठा खुलासा, म्हणाली, सेटवर कधीच 'हा' प्रकार
Follow us
| Updated on: May 23, 2023 | 6:44 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून तारक मेहता का उल्टा चश्मा हा शो प्रचंड चर्चेत आहे. तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) हा शो 15 वर्षांपासून चाहत्यांचे जबरदस्त असे मनोरंजन करताना दिसत आहे. विशेष म्हणजे मालिकेमधील प्रत्येक कलाकाराची जोरदार फॅन फाॅलोइंग (Fan following) ही सोशल मीडियावर बघायला मिळते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून अनेक कलाकारांनी मालिकेला कामयच रामराम करत सोडचिठ्ठी दिलीये. विशेष म्हणजे हे कलाकार सुरूवातीपासूनच मालिकेसोबत जोडलेले होते. आता काही महिला कलाकारांनी तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी (Asit Kumarr Modi) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यानंतर चाहत्यांना मोठा धक्का देखील बसला.

काही दिवसांपूर्वीच तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत मिसेस सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बंसिवाल हिने असित कुमार मोदीवर थेट लैंगिक शोषणाचा आरोप केला. यानंतर अनेक चर्चांना उधाण फुटले. त्यानंतर लगेचच मालिकेत बावरीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने देखील काही गंभीर आरोप केले.

प्रिया आहुजा हिने नुकताच मोठा खुलासा केला आहे. मालिकेच्या सेटवर नेमके काय चालते हे देखील सांगताना प्रिया आहुजा ही दिली आहे. प्रिया आहुजा हिने सांगितले की, तिने मालिका सोडल्यानंतर परत कधीच मालिकेच्या टिमने तिच्यासोबत संपर्क साधला नाही. प्रियाने सांगितले की, सेटवर तिला कधीही गैरवर्तनाचा सामना करावा लागला नाही.

प्रिया पुढे म्हणाली की, कधीच मालिकेच्या सेटवर माझा कधीही छळ झाला नाही. शैलेश लोढा आणि राज यांचे मालिका सोडण्याचे कारण वेगळे आहे. कारण मालिकेसोबतच त्यांची इतरही काही कामे सुरू होती, ज्यामुळे तारखेची समस्या निर्माण व्हायची. राज याच्याकडे काही गाण्याच्या आॅफर होत्या. तर शैलेश लोढा हे कवि संमेलनामध्ये बिझी होते.

जेनिफर मिस्त्री बंसिवाल हिने असित मोदी यांच्यावर आरोप केल्यानंतर म्हटले होते की, माझ्या बॅंक अकाऊंटमध्ये आता फक्त 80 हजार रूपये आहेत. माझ्या फॅमिलीमध्ये सात मुली असून त्यांची सर्व जबाबदारी ही फक्त माझ्यावरच आहे. मात्र, आता मी फार काही या गोष्टींचा विचार करत नाही. कारण देवाने तोंड दिले आहे तर अन्नही देईलच. मी या सर्व गोष्टींना फार जास्त थकले होते. मला माझ्या देवावर विश्वास आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.