‘Toxic’मध्ये यशसोबत कारमध्ये बोल्ड सीन देणारी अभिनेत्री कोण? जिच्या बोल्ड सीनची होतेय प्रचंड चर्चा
यशच्या Toxic चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून यामध्ये यशसोबत बोल्ड सीन देणारी ही अभिनेत्री कोण? जिच्या बोल्ड सीनने घातलाय सोशल मीडियावर धुमाकूळ.

Toxic Car Scene Actress : सुपरस्टार यशच्या आगामी चित्रपट ‘टॉक्सिक’चा टीझर रिलीज झाल्यापासून तो प्रचंड चर्चेत आला आहे. यामधील त्याचा पहिला लूक सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यासोबत या टीझरमधील एका बोल्ड सीनने आता चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. सध्या या टीझरमध्ये यशसोबत कारमध्ये दिसणाऱ्या सीनने धुमाकूळ घातला असून त्याची प्रचंड चर्चा सुरू झाली आहे. ‘केजीएफ’ स्टार यशच्या चाहत्यांपासून ते सामान्य प्रेक्षकांपर्यंत सगळेच या बोल्ड सीनमधील अभिनेत्रीबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक झाले आहेत.
या टीझरमध्ये यश म्हणजेच राया आपल्या शत्रूसोबत लढण्यापूर्वी कारमध्ये काही बोल्ड सीन करताना दिसतो आहे. या सीनमध्ये झळकलेली अभिनेत्री काही सेकंदांसाठीच दिसते आहे. मात्र, तिच्या तेवढ्यातच सीनने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘टॉक्सिक गर्ल’ म्हणून ओळख मिळालेल्या या अभिनेत्रीबद्दल सोशल मीडियावर विविध तर्कवितर्क देखील लावले जात आहेत.
टीझरला 20 कोटींहून अधिक व्ह्यूज
‘टॉक्सिक’च्या टीझरने सर्वच डिजिटल प्लॅटफॉर्मवर अवघ्या काही तासांमध्येच 20 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळवले आहेत. टीझर प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला की कारमध्ये बोल्ड सीन देणारी अभिनेत्री ही हॉलीवूड अभिनेत्री नताली बर्न आहे. या बातम्यांनंतर नताली बर्न सोशल मीडियावर अचानक चर्चेत आली आणि काही तासांमध्येच तिच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली.
मात्र, या सर्व चर्चांनंतर ‘टॉक्सिक’च्या दिग्दर्शिका गीतू मोहनदास यांनी स्वतः पुढे येत खऱ्या ‘टॉक्सिक गर्ल’चा खुलासा केला आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये चुकीची माहिती पसरत असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे खरी माहिती समोर आणली.
View this post on Instagram
गीतू मोहनदास यांनी अभिनेत्री बीट्रिज टौफेनबैक हिचा फोटो शेअर केला. या स्टोरीमध्ये त्यांनी लिहिले, ‘This beauty is my cemetery Girl @beatrizbach’ या पोस्टनंतर सोशल मीडियावर सुरू असलेल्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला.
कोण आहे बीट्रिज टौफेनबैक?
बीट्रिज टौफेनबैक ही अभिनेत्री सोशल मीडियावर फारशी सक्रिय नाही. तिने आपलं इंस्टाग्राम अकाउंट प्रायव्हेट ठेवलं आहे. तिच्या इन्स्टाग्रामवर सध्या सुमारे 1,855 फॉलोअर्स असून ती 1,825 लोकांना फॉलो करते.
‘टॉक्सिक’ हा चित्रपट 19 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून त्याच दिवशी रणवीर सिंगचा ‘धुरंधर पार्ट 2: रिव्हेंज’ हा चित्रपटही रिलीज होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर मोठी चुरस पाहायला मिळणार यात शंका नाही.
