AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Big ComeBack | बाॅलिवूडचे ‘हे’ कलाकार करणार 2021 मध्ये पुनरागमन…

2021 हे वर्ष प्रेक्षकांसाठी तसेच बाॅलिवूडमधील कलाकारांसाठीही विशेष ठरणार आहे.

Big ComeBack | बाॅलिवूडचे 'हे' कलाकार करणार 2021 मध्ये पुनरागमन...
| Updated on: Jan 10, 2021 | 4:56 PM
Share

मुंबई : 2021 हे वर्ष प्रेक्षकांसाठी तसेच बाॅलिवूडमधील कलाकारांसाठीही विशेष ठरणार आहे. बाॅलिवूडमधील असे बरेच अभिनेता आणि अभिनेत्री आहेत की, यावर्षी चित्रपटाच्या पडद्यावर पुनरागमन करणार आहेत. 2020 मध्ये कोरोनामुळे बरेच चित्रपट प्रदर्शित होऊ शकले नाही तर काही चित्रपटांच्या शूटिंग मध्यच बंद पडल्या होत्या. आणि आता हे सर्वजण पुनरागमन करण्याच्या तयारीत आहेत. (The artist will make a comeback in 2021)

शाहरुख खान बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने नुकताच ‘पठाण’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. हा चित्रपट यंदा रिलीज होणार आहे. ज्यामध्ये शाहरुख खान जबरदस्त लुकमध्ये दिसणार आहे. शाहरुखचे चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

राणी मुखर्जी मर्दानी 2 (2019) मध्ये मुख्य भूमिका साकारल्यानंतर, राणी मुखर्जी यावर्षी बंटी आणि बबली 2 च्या माध्यमातून पडद्यावर पुनरागमन करणार आहे. या चित्रपटात सैफ अली खान, सिद्धांत चतुर्वेदी आणि शारदारी वाघही आहेत. 2005 मध्ये बंटी आणि बबली या चित्रपटात अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांनीसोबत काम केले होते.

शिल्पा शेट्टी कुंद्रा शिल्पा शेट्टी कुंद्राने 2021 मध्ये आपल्या हंगामा 2 या चित्रपटाद्वारे पुनरागमण करणार आहे. शिल्पाने नुकताच या चित्रपटाचे शूटिंग सुरु केले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शन करीत आहेत. या चित्रपटात परेश रावल, मीजन जाफरी आणि प्रणिता सुभाषदेखील दिसणार आहेत.

आमिर खान आमिर खान लवकरच ‘लालसिंग चड्ढा’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात आमिर खान एका पंजाबी व्यक्तीची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट अगोदर 25 डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. पण कोरोनामुळे चित्रपटाचे शूटिंग थांबवावे लागले होते. यावर्षी 25 डिसेंबरला चित्रपट प्रदर्शित होण्याची चर्चा आहे. या चित्रपटात आमिर खानसोबत अभिनेत्री करीना कपूर देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

रणबीर कपूर रणबीर कपूर 2021 मध्ये शमशेरा आणि ब्रह्मास्त्र या दोन चित्रपटात दिसणार आहे. वायआरएफ निर्मित शमशेरा हा एक पीरियड ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटात रणबीर कपूर अभिनेता संजय दत्तसोबत काम करणार आहेत, तर करण जोहरच्या ब्रह्मास्त्र चित्रपटात रणबीर सुपरहीरोच्या भूमिकेत दिसणार आहे.

नीतू कपूर यावर्षी रणबीर कपूरची आई नीतू कपूरसुद्धा आपल्या ‘जुग जुग जिओ’ चित्रपटासह मोठ्या पडद्यावर परतण्यासाठी तयार आहे. या चित्रपटात नीतू कपूर, अनिल कपूर, वरुण धवन आणि कियारा अडवाणी मुख्ये भूमिकेत दिसणार आहेत.

जॉन अब्राहम 2018 मध्ये रिलीज झालेला जॉन अब्राहम, आयशा शर्मा, मनोज बाजपेयी, अमृता खानविलकर यांचा ‘सत्यमेव जयते’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. ज्यानंतर आता मेकर्स त्याच्या दुसर्‍या भागाची शूटिंग करत आहेत. या चित्रपटाचे शूटिंग सध्या लखनऊमध्ये सुरू आहे.

संबंधित बातम्या : 

Fighter | अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली, हृतिकने ‘या’ चित्रपटाची केली घोषणा!

Self Obsessed | कंगना रनौतने स्वतःची तुलना केली अमिताभ बच्चन यांच्याशी, म्हणते तापसी माझी मोठी फॅन!

(The artist will make a comeback in 2021)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.