गजेंद्र अहिरे यांच्या ‘पप्याच्या पिंकीची लव्हस्टोरी’ चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज….

राष्ट्रीय पारितोषिक विजेते लेखक, दिग्दर्शक, गीतकार गजेंद्र अहिरे यांच्या आगामी चित्रपटाचे शीर्षकही रसिकांची उत्कंठा वाढविणारे आहे. 'पप्याच्या पिंकीची लव्हस्टोरी' निमित्त ते प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.

गजेंद्र अहिरे यांच्या पप्याच्या पिंकीची लव्हस्टोरी चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज....
'Pappyachya Pinkichi Love Story' first poster released
| Edited By: | Updated on: Dec 15, 2025 | 6:28 PM

‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’ सारखा मराठी चित्रपट काढून प्रसिद्धीच्या झोतात आलेले दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांचा आगामी चित्रपट ‘पप्याच्या पिंकीची लव्हस्टोरी’ चे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे. नावाप्रमाणे हा चित्रपट एका प्रेमकथेवर बेतलेला आहे. या चित्रपटाच्या हटके नावामुळे उत्सुकता निर्माण झाली आहे. राष्ट्रीय पारितोषिक विजेते लेखक, दिग्दर्शक, गीतकार गजेंद्र अहिरे यांच्या या चित्रपटाचे शीर्षकही रसिकांची उत्कंठा वाढविणारे नक्कीच आहे. आशयघन विषय मनोरंजनाच्या सहाय्याने प्रेक्षकांसमोर मांडण्याची हातोटी असणाऱ्या गजेंद्र अहिरे यांच्या चित्रपटांची कथा नेहमीच हटके असते.

एक वेगळ्या धाटणीचे चित्रपट काढणारे हरहुन्नरी दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्या ‘पप्याच्या पिंकीची लव्हस्टोरी’चे पहिले पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.शीर्षकावरून या चित्रपटात एक प्रेमकथा पाहायला मिळणार असल्याचे अगदी सहजपणे लक्षात येते, पण या प्रेमकथेतील नाट्यमय वळणे प्रेक्षकांना अखेरपर्यंत खिळवून ठेवतील अशी आहेत.

‘नीळकंठ मास्तर” या मराठी चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या अक्षर फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखाली निर्मात्या पायल पठारे आणि मेघमाला पठारे यांनी ‘पप्याच्या पिंकीची लव्हस्टोरी’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. गजेंद्र अहिरे यांच्यासारख्या सर्जनशील दिग्दर्शकाच्या हाती या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सोपविण्यात आली होती. हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. ‘पप्याच्या पिंकीची लव्हस्टोरी’चे पहिले पोस्टर नुकतेच एनसीपीएमध्ये प्रदर्शित करण्यात आले. पोस्टर प्रकाशन सोहळ्याला अभिनेत्री, दिग्दर्शिका, लेखिका मृणाल कुलकर्णी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. याखेरीज दिग्दर्शक, निर्माते व कलाकार-तंत्रज्ञांची संपूर्ण टिम उपस्थित होती.

नवी कोरी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला

प्रेम, मैत्री, गुन्हा आणि त्यागाची आगळीवेगळी गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळेल. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि गीतलेखन ही सर्व जबाबदारी एकहाती गजेंद्र अहिरे यांनी सांभाळली असून, चित्रपटातील गीतांना संगीतसाजही त्यांनीच चढवला आहे. गजेंद्र अहिरे यांनी नेहमीच आपल्या चित्रपटांद्वारे नवनवीन विषय प्रेक्षकांसमोर आणले आहेत. ‘पप्याच्या पिंकीची लव्हस्टोरी’च्या माध्यमातून ते एक अनोखी प्रेमकथा घेऊन ते आले आहेत. प्रेमकथेला सुमधूर गीत-संगीताची किनारही जोडली आहे. या चित्रपटाद्वारे एक नवी कोरी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्यांची केमिस्ट्री लक्ष वेधणार आहे.

ऋषिकेश वांबूरकर, कश्मिरा, अमित रेखी, रिषी आणि अभिजीत दळवी यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. पं. शौनक अभिषेकी, आदर्श शिंदे आणि आनंदी जोशी यांनी ‘पप्याच्या पिंकीची लव्हस्टोरी’मधील गाणी गायली आहेत. कृष्णा सोरेन यांनी या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी केली असून, ओमकार आर. परदेशी यांनी संकलन केले आहे. प्रशांत जठार आणि मंगेश जोंधळे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते असून, लाइन प्रोड्युसर सूर्यकांत वड्डेपेल्ली आहेत. दिप्ती जोशी आणि कश्मिरा यांनी नृत्य दिग्दर्शन, तर नाना मोरे आणि राजू येमूल यांनी कला दिग्दर्शन केले आहे. रंगभूषा निकिता निमसे यांनी केली असून, पार्श्वसंगीत चैतन्य आडकर यांनी दिले आहे.