
Monalisa : गेल्या काही दवसांपासून महाकुंभमधून व्हायरल झालेल्या मोनालिसा हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. ‘द डायरी ऑफ मणिपूर’ सिनेमाचा दिग्दर्शक सनोज मिश्रा आणि मोनालिसा भोसले यांच्यात चांगली जुंपली आहे. महाकुंभमधून एका रात्रीत प्रसिद्धी झोतात आलेल्या मोनालिसा हिने सनोज यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एक पत्रकार परिषद घेत मोनालिसा हिने कुटुंबिय आणि सनोज याच्यावर अनेक आरोप केले. आता सनोज मिश्रा याने एक व्हिडीओ पोस्ट करत माझ्याविरोधात मोठ कट रचला जात आहे असं सांगितलं… सध्या सनोज याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सनोज मिश्राचा भावूक मेसेज
दिग्दर्शक सनोज मिक्षा याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला, ज्यामुळे इंटरनेटवर खळबळ माजली आहे… सनोज यांनी केलेल्या दाव्यानुसार, संपूर्ण कुटुंबियांचे प्राण धोक्यात आहे.. ‘कदाचित हा माझा शेवटचा व्हिडीओ असू शकतो… धर्मांतर आणि लव्ह जिहाद विरोधात आवज उठवल्यामुळे मला शिक्षा मिळाली आहे. केरळमधील जिहादी शक्ती आणि ख्रिश्चन धर्मप्रचारक पूर्ण ताकदीनिशी माझ्या मागे लागले आहेत.’ एवढंच नाही तर, मोनालिसा हिने केलेल्या छेडछाडीच्या आरोपांवर देखील सनोज याने मोठं वक्तव्य केलं आहे. सर्व आरोप फेटाळत म्हणाले, ‘मी कायम तिला माझी बहीण आणि मुलीसारखं मानलं आहे.’
सनोज मिश्रा याने सांगितल्यानुसार, ‘मोनालिसा स्वतः हे सर्वकाही बोलत नाहीये, तिचं ब्रेनवॉश करण्यात आलं आहे… मोनालिसाच्या मागे अशा शक्ती आहेत ज्यांना सनातन धर्माची बदनामी करायची आहे.’ सानोज मिश्रा यांनी या प्रकरणाचा केरळशी संबंध असल्याचा आरोप करून खळबळ उडवली आहे. त्याचा दावा आहे की, मोनालिसाला गुपचूप केरळला नेण्यात आलं, जिथे कोणाच्याही नकळत फरमान खानसोबत तिचा विवाह लावून देण्यात आला. सानोज याचा आरोप आहे की, या संपूर्ण प्रक्रियेला केरळमधील काही प्रमुख राजकारण्यांचा आणि मंत्र्यांचा पाठिंबा आहे, जे अशा विवाहांना आणि धर्मांतरांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहेत.
समोज मिश्रा याच्या जीवाला धोका…
सानोज मिश्रा याने जनतेला भावनिक आवाहन केले आहे, जर त्याला किंवा त्याच्या कुटुंबियांसोबत काही अनुचित घटना घडली तर समाजाने त्यांना पाठिंबा द्यावा. सानोज मिश्रा मोठा खुलासा करत म्हणाला, त्याने महाकुंभमेळ्यातील मोनालिसाला सिनेमात अभिनेत्री म्हणून घेतलं असून, त्यासाठी अंदाजे 10 कोटी रुपये खर्च केले आहेत.
सिनेमा अद्याप प्रदर्शित देखील झालेला नाही. तर दुसरीकडे मोनालिसा हिच्या लग्नामुळे अनेक वाद निर्माण होत आहे. त्यामुळे सिनेमा देखील वादाच्या भोवऱ्यात अडकू शकतो. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मोनालिसा हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.