AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunetra Pawar | उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र, पत्रामुळे तटकरे, पटेलांच्या वर्चस्वाला धक्का?

Sunetra Pawar | उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र, पत्रामुळे तटकरे, पटेलांच्या वर्चस्वाला धक्का?

| Updated on: Mar 25, 2026 | 5:32 PM
Share

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामुळे राज्याच्या राजकारणात नवा चर्चेचा विषय निर्माण झाला आहे. या पत्रामध्ये त्यांनी राष्ट्रवादी पक्षासंदर्भात महत्त्वाची मागणी केली असून त्याचे विविध अर्थ काढले जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांनी आयोगाला विनंती केली आहे की, 28 जानेवारी 2026 नंतर पक्षाच्या नावाने झालेला कोणताही पत्रव्यवहार वैध धरू नये. विशेष म्हणजे, याच दिवशी अजित पवार यांचा विमान अपघात झाला होता. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर पक्षाच्या वतीने झालेल्या निर्णयांवर आणि कागदपत्रांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण होण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, त्या प्रत्यक्षात आल्या नाहीत. त्याचदरम्यान, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांचे पत्र समोर आल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पत्रामुळे संबंधित नेत्यांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे का?, असा सवालही उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणाला कोणते वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Mar 25, 2026 05:32 PM
Follow Us