AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काही ठिकाणी ‘नो स्टॉक’चे बोर्ड, राज्यातील अनेक भागात पेट्रोल पंपावर मोठ्या रांगा, प्रत्येक जिल्हा प्रशासनाकडून काय सूचना…

इराण आणि अमेरिका युद्ध सुरू आहे. या युद्धाच अनेक देशात पेट्रोल आणि डिझेल तुटवडा निर्माण झाला. यादरम्यानच राज्यात अफवा पसरवली जात आहे की, पेट्रोल आणि डिझेल मिळणार नाही. यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावर रांगा लावल्या आहेत.

काही ठिकाणी 'नो स्टॉक'चे बोर्ड, राज्यातील अनेक भागात पेट्रोल पंपावर मोठ्या रांगा, प्रत्येक जिल्हा प्रशासनाकडून काय सूचना…
petrol pumps since
| Updated on: Mar 26, 2026 | 9:41 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्ध पेटले आहे. या युद्धाचा परिणाम फक्त दोन किंवा तीन देशांपुरता मर्यादित राहिला नाही तर जगभरात कच्चे तेल आणि गॅसची मोठी समस्या निर्माण झाली. भारतात एलपीजी गॅसचा तुटवडा आहे. पण पेट्रोल डिझेलचा तेवढा तुटवडा नाही. पण काही अफवा पसरवला जात असल्याने पेट्रोल पंपावर सकाळपासूनच वाहनधारकांनी मोठी गर्दी केल्याची वस्तूस्थिती आहे. राज्यातील विविध शहरांमध्ये पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी मोठ्या रांगा लावल्या आहेत. पेट्रोल मिळणार नसल्याची भीती त्यांच्या मनात आहे. जालना, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, सांगली, सातारा, ठाणे, कल्याण, परभणी, बीड, नांदेड या शहरांमधील पेट्रोल पंपावर मोठ्या रांगा बघायला मिळत आहेत. सरकारकडून अगोदरच स्पष्ट करण्यात आले की, पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नाही. देशात पुरेसा साठा उपलब्ध आहे. फक्त राज्यच नाही तर देशभरातील विविध शहरांमध्ये हीच स्थिती कायम आहे.

पेट्रोल-डिझेल संपल्याच्या अफवेने राजभरात खळबळ उडाली. ठाणे-कल्याण -डोंबिवलीत इंधनासाठी नागरिकांची झुंबड उडाली. अनेक पंपांवर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने ‘नो स्टॉक’चे फलक लावण्यात आले.  राज्यात गोंधळ आहे, पण मुंबईत शांतता दिसत आहे. मार्बल हिल, देसाई रोड परिसरात पंपांवर शुकशुकाट. यादरम्यानच प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले की, इंधनाचा साठा पुरेसा आहे, नागरिकांनी अफवांना बळी पडू नका.

सोलापुरातील ऑटो एलपीजी गॅस पंप बंद अवस्थेत आहेत. गॅस तुटवड्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील ऑटो एलपीजी गॅस पंप बंद ठेवण्यात आले. शहरातील प्राईम फ्युएल ऑटो एलपीजी पंप बंद करण्यात आलाय. मागील जवळपास 10 दिवसांपासून एलपीजी गॅस पंप आहे बंद. हा एलपीजी पंप बंद असल्याने ऑटो रिक्षा चालकांचे हाल होत आहेत.

नांदेड जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेल तुटवड्याबाबत मोठी बातमी समोर येत आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्पष्ट केलं आहे की, नांदेड शहरात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणारे मेसेज हे केवळ अफवा असून नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. अनेक भागात अशाचप्रकारेच मेसेज व्हायरल होत असल्याने नागरिकांनी धास्ती घेतली आहे.

Follow Us
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं?
2018चे बदल आयोगाला कळवले, पोचपावतीही आहे; सिब्बलांचा कोर्टात दावा
Shivsena Supreme Court Hearing | 2018चे बदल आयोगाला कळवले, पोचपावतीही आहे; कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा दावा
शिवसेनेचं धनुष्यबाण नेमकं कुणाचं? कपिल सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर..
शिवसेनेचं धनुष्यबाण नेमकं कुणाचं? कपिल सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तीवाद; म्हणाले, आमच्याकडे आयोगाची पोचपावती...
अखेर भेटूही दिलं नाही अन्...पाकिस्तानचे माजी PM इमरान खान यांचा मृत्यू
अखेर भेटूही दिलं नाही अन्... पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांचा तुरूंगातच मृत्यू; काय घडलं?
CM फडणवीस आणि राज ठाकरे भेटीची इनसाईड स्टोरी; मनसे नेत्यानेच सांगितलं
CM फडणवीस आणि राज ठाकरे भेटीची इनसाईड स्टोरी; मनसे नेत्यानेच सांगितलं भेटीचं नेमकं कारण