AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टायगर श्रॉफ दिसला जबरदस्त लूकमध्ये, ‘गणपत’ करणार धमाका? चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ

बाॅलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ हा कायमच चर्चेत असतो. टायगर श्रॉफ याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. टायगर श्रॉफ त्याच्या आगामी चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे.

टायगर श्रॉफ दिसला जबरदस्त लूकमध्ये, 'गणपत' करणार धमाका? चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ
| Updated on: Sep 29, 2023 | 9:28 PM
Share

मुंबई : टायगर श्रॉफ हा त्याच्या फिटनेसमुळे जोरदार चर्चेत राहतो. टायगर श्रॉफ (Tiger Shroff) हा सोशल मीडियावरही तेवढाच सक्रिय दिसतो. आपल्या चाहत्यांसाठी कायमच टायगर श्रॉफ हा सोशल मीडियावर व्यायाम करतानाचे खास फोटो आणि व्हिडीओ (Video) शेअर करताना दिसतो. आपल्या बाॅडीवर टायगर श्रॉफ याने खूप जास्त मेहनत घेतलीये. टायगर श्रॉफ हा त्याच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी टायगर श्रॉफ याचे नाव दिशा पटानी हिच्यासोबत जोडले गेले. इतकेच नाही तर अनेकदा हे एकसोबत स्पाॅट झाले.

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी हे एकमेकांना काही दिवस डेट करताना दिसले. इतकेच नाही तर टायगर श्रॉफ याच्या कुटुंबियांसोबत देखील खास वेळ घालताना दिशा पटानी ही दिसली. मध्यंतरी काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की, हे दोघे लवकरच साखरपुडा करणार आहेत. मात्र, त्यानंतर यांच्या ब्रेकअपच्या जोरदार चर्चा या रंगताना दिसल्या.

दिशा पटानी एका माॅडेलला डेट करत असल्याचे सांगितले गेले. आता टायगर श्रॉफ हा त्याच्या आगामी गणपत या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. गणपत चित्रपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आले. आता नुकताच टायगर श्रॉफ याच्या गणपत या चित्रपटाचे धमाकेदार असे टीझर रिलीज करण्यात आलाय. विशेष म्हणजे हा टीझर चाहत्यांना प्रचंड आवडल्याचे दिसतंय.

टीझर व्हिडीओमध्ये टायगर श्रॉफ हा धमाकेदार लूकमध्ये दिसतोय. हा टीझर व्हिडीओने मोठा धुमाकूळ नक्कीच घातलाय. डायरेक्टर विकास बहल यांचा हा गणपत चित्रपट आहे. 1 मिनिट 45 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये टायगर श्रॉफ आणि क्रिती सनॉन यांची धमाकेदार अॅक्शन  बघायला मिळतंय. चाहत्यांना हा टीझर व्हिडीओ जबरदस्त आवडलाय.

या चित्रपटात टायगर श्रॉफ हा एका बॉक्सरच्या भूमिकेत असल्याचे टीझर व्हिडीओमधून स्पष्ट होतंय. अगोदर हा चित्रपट 27 सप्टेंबर रोजी रिलीज होणार होता. मात्र, निर्मात्यांनी काही मोठे बदल करून हा चित्रपट 20 आॅक्टोबरला रिलीज करण्याचा निर्णय घेतला. टायगर श्रॉफ याचा हा चित्रपट थिएटरमध्ये धमाका करताना दिसणार आहे.

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?