दिशा पटानी को ‘पटाना’ औकात के बाहर : टायगर श्रॉफ

तू दिशा पटानीला डेट करत आहेस का? असा प्रश्न टायगर श्रॉफला इन्स्टाग्रामवर विचारण्यात आला होता. यावर ती माझ्या लायकीबाहेर आहे, असं उत्तर टायगरने दिलं.

दिशा पटानी को 'पटाना' औकात के बाहर : टायगर श्रॉफ

मुंबई : बॉलिवूडमध्ये दररोज नवनव्या जोड्या जुळतात, आणि तुटतातही. अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आणि अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) यांच्या कथित अफेअरच्या चर्चा सध्या जोरावर आहेत. मात्र टायगरने पुन्हा एकदा या चर्चा धुडकावल्या आहेत. दिशाला पटवण्याची आपली लायकी नाही, असं टायगर म्हणतो.

टायगर आणि दिशा यांना अनेकदा लंच किंवा डिनरवर जाताना फोटोग्राफर्सनी आपल्या कॅमेरात कैद केलं आहे. त्यामुळे दोघंही एकमेकांना डेट करत असल्याची अटकळ चाहते बांधतात. दिशा-टायगर मात्र ‘जस्ट फ्रेण्ड्स’च्या मोडमधून बाहेर येताना दिसत नाहीत.

टायगरने शनिवारी आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरुन ‘आस्क मी एनिथिंग’ फीचर वापरत फॉलोअर्सना कोणताही प्रश्न विचारण्याचं आवाहन केलं. ही संधी सोडतील, तर त्याचे फॅन्स कसले. टायगरच्या आतापर्यंतच्या गर्लफ्रेण्ड्सच्या संख्येपासून फिटनेस फंडा, आगामी चित्रपट असे अनेक प्रश्न चाहते विचारते झाले. मात्र यापैकी एक ठळक प्रश्न होता तो दिशासंबंधी.

‘तू दिशाला डेट करत आहेस का?’ असा प्रश्न एका फॉलोअरने विचारला. चाहत्याचा प्रश्न न टाळता ‘माझी तितकी लायकी नाही’ असं उत्तर टायगरने दिलं. म्हणजेच टायगरच्या मनात दिशाविषयी प्रेम आहे, मात्र तो विचारायला कचरतो का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

ट्विटरवर एका चाहत्याने दिशाला यापूर्वी टायगरबाबत छेडलं होतं. ‘तुम्ही रिलेशनशीपमध्ये असल्याचं कबूल का नाही करत? आम्हाला तुमची जोडी खूप आवडते’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. दिशाने आढेवेढे न घेता मनमोकळेपणाने याचं उत्तर दिलं.

‘मी किती दिवसांपासून प्रयत्न करत आहे. खूप वर्ष झाली आणि त्याला इम्प्रेस करण्याचे माझे प्रयत्न सुरुच आहेत. आता मी भारत सिनेमात स्टंट केले. मला वाटलं, तो खुश होईल, पण कसलं काय? हो, आम्ही जेवायला बाहेर जातो, पण याचा अर्थ तो इम्प्रेस झाला असा होत नाही. म्हणजे क्रश इम्प्रेस होतो, तसं नाही हे. तुम्ही त्यालाच विचारा ना. कदाचित आम्ही दोघंही इतके लाजाळू आहोत, की कोणीच पुढाकार घेत नाही’ असं दिशा म्हणाली होती.

विशेष म्हणजे, दिशा पटानीचं नाव युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत जोडलं जात होतं. दोघांना डिनरवर जाताना पाहिलं गेलं होतं. योगायोगाची गोष्ट ही, की आदित्य आणि दिशा यांचा वाढदिवस एकाच दिवशी येतो. मात्र त्यावेळीही दिशाने आपण केवळ मित्र असल्याचं सांगत अफेअरच्या चर्चा उडवून लावल्या होत्या.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI