Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’ सिनेमा पाहण्याची 5 मोठी कारणं, सलमानच्या कॅमिओसह रितेशच्या सिनेमा बनवतायेत अधिक प्रभावी

Raja Shivaji : सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त 'राजा शिवाजी' सिनेमाची चर्चा रंगली आहे. पहिल्याच दिवशी सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी जमली... तर अशी कोणती पाच कारणं आहेत, ज्यामुळे सिनेमा अधिक प्रभावी ठरत आहे... घ्या जाणून...

Raja Shivaji : राजा शिवाजी सिनेमा पाहण्याची 5 मोठी कारणं, सलमानच्या कॅमिओसह रितेशच्या सिनेमा बनवतायेत अधिक प्रभावी
Raja Shivaji
| Updated on: May 02, 2026 | 7:56 AM

अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया डिसूडा स्टारर ‘राजा शिवाजी’ सिनेमा प्रदर्शित होताच, फक्त चित्रपटगृहातच नाही तर, बॉक्स ऑफिसवर देखील सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. रितेश याने सिनेमात फक्त अभिनयच केला नाही तर, दिग्दर्शनाची जबाबदारी देखील सांभाळली आहे… अशात सोशल मीडियावर देखील रितेश याचं कौतुक होत आहे. चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर फक्त आणि फक्त ‘राजा शिवाजी’ सिनेमाची चर्चा रंगली आहे, याचाच परिणाम बॉक्स ऑफिसवर देखील पाहायला मिळत आहे… तर जाणून अशी पाच कारणं ज्यामुळे सिनेमा अधिक प्रभावी ठरत आहे.

रितेश देशमुख याची दमदार भूमिका

‘राजा शिवाजी’ सिनेमात रितेश देशमुख याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेला न्याय दिला आहे. अभिनेत्याने साकारलेली भूमिका चाहत्यांना प्रचंड आवडली असून रितेश देशमुखने यापूर्वी हटके भूमिका केल्या आहेत, पण छत्रपती शिवाजी महाराजांसारखी गंभीर भूमिका त्याने पहिल्यांदाच साकारली असून, त्याचा लूक आणि चेहऱ्यावरील गांभीर्य अप्रतिम दिसत आहे.

अभिनेता सलमान खानचा कॅमिओ

‘राजा शिवाजी’ सिनेमात सलमान खान याची फार छोटी भूमिका आहे. सिनेमात भाईजानने जीवा महाला यांची भूमिका साकारली आहे. सिनेमातील अभिनेत्याचा दमदार लूक पाहायला मिळत आहे… डोक्यावर फेटा, चेहऱ्यावरील हावभाव यांमुळे त्याची एन्ट्री होताच, टाळ्यांचा कडकडाट होतो. सिनेमात सलमान खान याची फार छोटी भूमिका आहे, पण त्याच भूमिकेमुळे सिनेमा एका वेगळ्या उंचीवर पोहोचला आहे.

90 च्या दशकाचा तडका आणि कलाकारांचा दमदार अभिनय

सलमान खान, रितेश आणि जेनेलिया देशमुख यांच्यासोबत संजय दत्त, अभिषेक बच्चन, भाग्यश्री, विद्या बालन आणि फरदीन खान यांसारच्या 90 च्या दशकातील कलाकारांनी सिनेमावा चारचांद लावले आहेत. सध्याच्या काळात 90 च्या दशकातील कलाकारांना एका सिनेमात एकत्र पाहणं अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनंही जिंकली आहेत.

रितेश देशमुख आणि जिनिलिया यांची जोडी

‘राजा शिवाजी’मधील रितेश देशमुख आणि जेनेलिया यांची जोडी पाहण्यासारखी आहे. रितेश आणि जेनेलिया ही इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय जोडी आहे. त्यांनी यापूर्वी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे आणि चाहत्यांनी देखील दोघांना डोक्यावर घेतलं, त्यामुळे, ‘राजा शिवाजी’मध्ये त्यांची केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते आणखी उत्सुक आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जिनिलिया अभिनेत्री असण्यासोबतच या सिनेमाची निर्मातीसुद्धा आहे, तर रितेश देशमुखने याने दिग्दर्शन केलं आहे.

मनालं भिडणारं संगीत आणि व्हीएफएक्स

‘राजा शिवाजी’ या सिनेमाचं संगीतही उत्कृष्ट असून ते प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करत आहे. संगीत हा या सिनेमाचा आत्मा आहे असं म्हणायला हरकत नाही. सिनेमातील व्हीएफएक्स आणि व्हिज्युअल इफेक्ट्ससुद्धा दमदार आहेत. लढाईची दृश्ये भव्य प्रमाणात चित्रित केली असून ती आश्चर्यकारकपणे वास्तववादी वाटतात.

Follow Us