टायगर श्रॉफ प्रकरणात अत्यंत मोठी अपडेट, थेट मुंबई पोलिसांकडून..
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणात मोठी माहिती पुढे येत आहे. टायगर श्रॉफ याच्यावर गोळीबार झाला, ज्यात तो थोडक्यात वाचला. या प्रकरणात पोलिस तपास करत असून गेल्या काही महिन्यांपासून हा कट रचला जात असल्याची माहिती मिळतंय.

अभिनेता टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणात शस्त्र पुरवठादाराचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांची धडपड सुरू आहे. टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणात वापरण्यात आलेले पिस्तूल खरेदी करण्यासाठी 2.5 लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले. तुर्की बनावटीचे झिगाना पिस्तूल आणि 20 जिवंत काडतुसे खरेदी केल्याचा संशय आहे. हा व्यवहार QR कोडद्वारे करण्यात आला असून पैसे एका बनावट कागदपत्रांवर उघडलेल्या म्यूल बँक खात्यात जमा झाल्याची माहिती मिळाली आहे. फरार आरोपी अनिल पंडित याच्या सांगण्यावरून अमृतसरमधून शस्त्र खरेदी केल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यानुसार, पोलिसांकडून तपास हा केला जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून याचे सर्व नियोजन सुरू होते. पूर्ण कट आखण्यात आला. अनिलचा भाऊ अभिषेक पंडित याला शस्त्र पुरवठादाराकडून QR कोड मिळाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
अभिषेकची पत्नी सुनेहा हिने कर्नालमधील SBI खात्यातून 2.5 लाख रुपये ट्रान्सफर केल्याची माहिती मिळतंय. बनावट सिमकार्ड आणि कागदपत्रांच्या आधारे म्यूल अकाउंट उघडण्यात आल्याने शस्त्र पुरवठादाराची ओळख पटवण्यात अडचणी येत आहेत. अभिषेक पंडितला या प्रकरणात आरोपी घोषित करण्यात आले असून, तो देशाबाहेर गेल्याचा पोलिसांना संशय व्यक्त केला जात आहे.
पोलिस अभिषेक पंडित याच्या शोधात आहेत, पण त्याच्या ठिकाणाचा पत्ता लागत नाहीये. त्यानुसार, अभिषेक पंडित हा विदेशात गेल्याचा संशय आहे. या प्रकरणातील 13 वी आरोपी सुनेहा हिच्या आर्थिक व्यवहारांचीही गुन्हे शाखेकडून तपासणी केली जात आहे. सुमारे 47 लाख रुपयांचे व्यवहार, परदेशी ट्रान्सफर, क्रिप्टोकरन्सी चॅट्स आणि QR पेमेंट्स पोलिसांच्या रडारवर आहेत.
संशयास्पद व्यवहारांपैकी 57 हजार रुपये सुनेहाच्या खात्यात जमा झाले तर तिने ऑक्टोबरच्या पहिल्या 18 दिवसांत मुंबईत 28 हजार रुपये पाठवले. फायरिंगसाठी या पैशांचा वापर नेमका कसा झाला, आरोपींनी लॉजिस्टिक आणि राहण्याची व्यवस्था केली का, याचा तपास सुरू. मुख्य आरोपी अनिल पंडित अद्याप फरार असून शस्त्र खरेदी आणि हल्ल्याच्या नियोजनात त्याची महत्त्वाची भूमिका असल्याचा पोलिसांचा संशय आहे.