Bollywood : बंद क्लासरुम, प्रसिद्ध अभिनेत्री आणि ‘तो’ मुलगा; अनुभव कधीही न विसरता येणारा

Bollywood : बंद क्लासरुम, प्रसिद्ध अभिनेत्री आणि 'तो' मुलगा... तेव्हा असं काय घडलं होतं, जे क्षण प्रसिद्ध अभिनेत्री आज देखील विसरु शकणार नाही...., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीने सांगितलेल्या 'त्या' क्षणाची चर्चा....

Bollywood : बंद क्लासरुम, प्रसिद्ध अभिनेत्री आणि 'तो' मुलगा; अनुभव कधीही न विसरता येणारा
Follow us
| Updated on: Dec 30, 2023 | 8:39 AM

मुंबई | 30 डिसेंबर 2023 : शाळेतील काही आठवणी अशा असतात ज्या कधीही विसरता येत नाहीत. एवढंच नाही तर, अनेकदा अशी वेळ येते जेव्हा शाळेतील चांगल्या – वाईट आठवणी ताज्या होतात. सेलिब्रिटी देखील त्यांच्या शाळेतील आठवणी कायम सांगत असतात. आता बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शाळेतील दिवसांची चर्चा रंगत आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री ट्विंकल खन्ना आहे. ट्विंकल आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, अनेक कारणांमुळे चर्चेत असते. एका मुलाखतीत ट्विंकल हिने शाळेतील एक आठवण सांगितली होती.

ट्विंकल खन्ना हिने शाळातील तिच्या पहिल्या प्रेमाबद्दल सांगितलं होतं. एक हॅडसम मुलाच्या प्रेमात ट्विंकल होती. शाळेतील क्रशबद्दल सांगत अभिनेत्री म्हणाली, ‘तो माझ्या शेजारी बसला होता. तो शेजारी असल्यामुळे माझ्या मनावर दडपण होतं. तो खूप हॅडसम दिसत होता… देवाने त्याला आरामात वेळ घेऊन बनवलं होतं…’

‘संध्याकाळपर्यंत आम्ही क्लासरुममध्ये बसलो होतो. क्लासरुममध्ये चॉक आणि त्याच्या च्युइंगमचा वास येत होता. अखेर मी त्याला किती वाजले आहेत असं विचारलं. कारण मला रात्रीचं जेवण करायचं होतं. तर तो मुलगा म्हणाला, माझ्या घरी आज पिंक कस्टर्ड बनलं आहे…’

अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘गप्पा मारून झाल्यानंतर आम्ही दोघे शाळेच्या मेन गेटवर पोहोचलो. पण तोपर्यंत गेट बंद झाले होते. तो उडी मारुन बाहेर पडला. मला उडी मारायला भीती वाटत होती. तेव्हा तो मुलगा म्हणाला, ‘तू उडी मार मी तूला पकडून घेईल….’ अशा प्रकारे ट्विंकल त्या मुलासोबत शाळेच्या बाहेर पडली…

शाळेतील ‘त्या’ मुलाबद्दल सांगताना अभिनेत्री म्हणाली, ‘आज जर आमची रस्त्यात भेट झाली तर, कदाचित मी त्याला ओळखू देखील शकणार नाही…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ट्विंकल खन्ना हिची चर्चा रंगली आहे. ट्विंकल आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ट्विंकल कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. अभिनेत्री लेकीसोबत देखील फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

Non Stop LIVE Update
शिवकालीन वाघनखं लंडनहून महाराष्ट्रात दाखल, कधी-कुठे पाहता येणार?
शिवकालीन वाघनखं लंडनहून महाराष्ट्रात दाखल, कधी-कुठे पाहता येणार?.
आता तरूणांसाठी शिंदेंकडून मोठी घोषणा, दरमहा कोणाला किती पैसे मिळणार?
आता तरूणांसाठी शिंदेंकडून मोठी घोषणा, दरमहा कोणाला किती पैसे मिळणार?.
नोकऱ्यांमध्ये 100% आरक्षण, खासगी कंपन्यांमधील 'या' पदांसाठी प्राधान्य
नोकऱ्यांमध्ये 100% आरक्षण, खासगी कंपन्यांमधील 'या' पदांसाठी प्राधान्य.
विठुरायाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना...राज ठाकरे याचं साकडं काय?
विठुरायाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना...राज ठाकरे याचं साकडं काय?.
तुम्ही वारकरी नाही, पाठीत वार करणारे... अरविंद सावंतांचा रोख कोणावर?
तुम्ही वारकरी नाही, पाठीत वार करणारे... अरविंद सावंतांचा रोख कोणावर?.
हेलिकॉप्टर भरकटल तरी फडणवीसांच्या निवांत गप्पा;दादांनी सांगितला किस्सा
हेलिकॉप्टर भरकटल तरी फडणवीसांच्या निवांत गप्पा;दादांनी सांगितला किस्सा.
मराठा समाजाला फसवणारा सर्वांत बेईमान नेता शरद पवार; कोणाची जहरी टीका?
मराठा समाजाला फसवणारा सर्वांत बेईमान नेता शरद पवार; कोणाची जहरी टीका?.
हे दुर्मिळ हेमाडपंथी विठ्ठलमंदिर पाहिलय? तब्बल 46 वर्षांनी पाण्याबाहेर
हे दुर्मिळ हेमाडपंथी विठ्ठलमंदिर पाहिलय? तब्बल 46 वर्षांनी पाण्याबाहेर.
कोकणात 4 दिवस धुव्वाधार,मुंबई पुण्यात कसा पाऊस? हवामान खात्याचा अंदाज?
कोकणात 4 दिवस धुव्वाधार,मुंबई पुण्यात कसा पाऊस? हवामान खात्याचा अंदाज?.
स्वच्छ, नितळ चंद्रभागेत स्नान करण्यास तीरावर वारकऱ्यांची तुफान गर्दी..
स्वच्छ, नितळ चंद्रभागेत स्नान करण्यास तीरावर वारकऱ्यांची तुफान गर्दी...